पाऊस
लेखनविषय:
आज पहाटे लाजत मुरकत,
बरसून गेला पाउस नवथर
तहानलेल्या धरतीला या
स्पर्शून गेली एक खुळी सर
मातीवरती हलकी नक्षी,
पानांवरती रंग ओलसर
मिटलेल्या पंखात अजूनही
नाजूक ओली हळवी थरथर
पागोळ्यांचे पैंजण छुन छुन,
टपटपणार्या ओल्या वेली
हिरवाईची खूण जागवीत
पाऊस येई सोनपावली
मेघ अजूनही विस्कटलेले,
चंद्रकोर ही ओली अजुनी
अन्कुरातले स्वप्न फुलविते
हसरी गंधित मोहक अवनी
वाचने
2276
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
पागोळ्यांचे पैंजण छुन छुन ,टपटपणार्या ओल्या वेली हिरवाईची खूण जागवीत पाऊस येई सोनपावलीया ओळी आवडल्या. पुलेशु.
येलकम अगेन. लै दिवसानी अवतरलात फुलवा बै.
कविता मस्त आहे. सातार्याचा पाऊस बराच मिस करतोय
कविता आवडली.
वा!आत्ता इथं पाऊस नसतानाही पावसाची अनुभूती देणारे शब्द :-)
मेघ अजूनही विस्कटलेले,
चंद्रकोर ही ओली अजुनी
अन्कुरातले स्वप्न फुलविते
हसरी गंधित मोहक अवनी
ओळी आवडल्या.
सुरेख लिहिलेस फुलवा.
छान!
अतिशय सुंदर कविता. विशेष काय आवडलं, असं विचाराल तर म्हणेन-
''आज पहाटे लाजत मुरकत,
बरसून गेला पाउस नवथर''
मिटलेल्या पंखात अजूनही
नाजूक ओली हळवी थरथर
आणि
''पागोळ्यांचे पैंजण छुन छुन,
टपटपणार्या ओल्या वेली
हिरवाईची खूण जागवीत
पाऊस येई सोनपावली''
किती सुंदर.....!
-दिलीप बिरुटे
फारच सुंदर आहे रचना. सलग ३-४ वेळा वाचली. आवडली. :)
खूप आवडली कविता.
सुंदर झाली आहे कविता.
किती छान!
लयदार ओळी.
In reply to किती छान! लयदार ओळी. by स्पंदना
असेच म्हणतो. लय अन शब्दयोजना मस्त जमली आहे!
सुदंर झलिये कविता.
तहानलेल्या धरतीला या
स्पर्शून गेली एक खुळी सर ........मास्तच.
मस्त वाटले वाचून.
छान