मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

" बया आज माझी नसे वात द्याया .."

विदेश · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
. (चाल : प्रिया आज माझी नसे साथ द्याया -) बया आज माझी नसे वात द्याया असो बंद डोळे मिटो पापण्या या.. नको गाणी आता जरा झोपतो मी सुरांची तिच्या आज ती हूल नाही बयेवीण ना त्रास होईल आता.. किती छान म्हटले तरी त्रास होतो जरी कान बंदी तरी बोल येतो शिरा त्या गळ्याच्या फुगाव्या किती त्या.. न भांडी धुवाया,न कामा उशीर कसा आज हातास येईल जोर मुखी यातना रात्र जागेल गाया.. किती आठवू मी अशा भांडणांसी पुरे लाटण्यावीण शब्दांस खाशी कशाला उभी ती मनीं महामाया..! .

वाचने 2769 वाचनखूण प्रतिक्रिया 11

चौकटराजा Sat, 07/13/2013 - 09:36
आपले हे मिपावर पहिलेच काव्य आहे बहुदा ! सुरूवात मस्त ! जरा जोडू का...? आमची अशीच माहेरी गेली असताना-स्वैपाकाची पाळी आली मग तिचा सय आली. नको शेंगदाणे नको त्याच लाह्या जाया आज माझी नसे भात द्याया ....असे काहीसे सुचले त्यावेळी !

बॅटमॅन Sat, 07/13/2013 - 23:56
बया आज तूझी नसे वात द्याया, नपेक्षा पहा भांडणे कत्तल | बोला हवे ते, परी काव्य हे तो पुरे नेटके आणि हो उज्ज्वल | जी जीवनाच्या पुर्‍या यातनांची, पहा बांधिली पूर्ण मोठी खरी | मंदारमालाचि साता त-कारी, तिच्या वर्णिते सर्व नाना परी ||

सूड Mon, 07/15/2013 - 11:03
बर्‍याच दिवसांनी चांगलं विडंबन वाचलं मिपावर. नायतर विडंबनाच्या नावाखाली जी काही काशी करतात एखाद्या गाण्याची त्याला तोड नाही. मनापासून आवडलं.

बाळ सप्रे Mon, 07/15/2013 - 15:28
याच चालीवर.. नसतेस घरी तू जेव्हा, जीव सुटका सुटका होतो| जगण्याचे जुळती धागे, संसार नेटका होतो :-)