दुष्काळाच्या मरणकळा
लेखनविषय:
आस लागली पाण्याची ती
कणकण उरात भरली काही
पेरलेले जाळून गेले
मयत झाली जमीन सारी
होरपळलेल्या मयतावरती
लाल उन्हाचा कपडा भारी
उघडे चोच एखादा दाणा
कोरडा घास त्याच्या दारी
किती हरपले किती करपले
कोण कोणास ना तारी
थरथरना-या काळजावरती
जमीनीवर आल्या मरणाच्या धाडी
उन्मळलेले मूळ उठले
हंबरडा फोडी नभाच्या कानी
नभानेही मग सूर लावला
मरणकळाच्या सोडून तानी
वाचने
1127
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
जरा टायमिंग चुकले....