मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शेवटी कळले आयुष्य न उलघडणारे कोडे आहे........

वैभव कुलकर्नि · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
थोडे कोपरे खणून बघितले. खोलीला उथळ मानून बघितले. मनाला चपळ करून बघितले. चपळतेला थोडा लगाम लावून बघितले. चंद्राला भाऊ मानून बघितले . नि पिंडाला चाहूल देऊन बघितले. पण शेवटी कळले आयुष्य न उलघडणारे कोडे आहे........ स्वतःला थोडे शांत करून बघितले रागाला थोडे प्रांत देऊन बघितले निळ्या आकाशी भ्रमंत करून बघितले पैसा बाळगून थोडे श्रीमंत होऊन बघितले समईला वात देऊन बघितले तर देवाला शाप देऊन बघितले पण शेवटी कळले आयुष्य न उलघडणारे कोडे आहे........ बघताना स्वतःला शून्य देऊन बघितले तर कोणाला पुण्य देऊन बघितले स्वतःला थोडे दुस-यात ठेऊन बघितले दुस-याला स्वतःच्यात घेऊन बघितले गंगेतील पाणी थोडे चाटून बघितले अस्थीला नदींऐवजी ओढ्यात टाकून बघितले पण शेवटी कळले आयुष्य न उलघडणारे कोडे आहे........ रक्त थोडे विकूनही बघितले. दुस-याचे रक्त चाखुनही बघितले. स्वतःच्यात थोडे वाकून बघितले दु:खात न्हाऊ माखुनही बघितले बघता-बघता डोळे मिटूनही बघितले सरणावर थोडे खेटूनही बघितले. पण शेवटी कळले आयुष्य न उलघडणारेकोडे आहे........

वाचने 1643 वाचनखूण प्रतिक्रिया 7

In reply to by स्पा

कवितानागेश गुरुवार, 07/11/2013 - 13:15
"उलगडणारे" असे हवे . रचना चांगलीच आहे. ...... चंद्राला भाऊ मानून बघितले . नि पिंडाला चाहूल देऊन बघितले. पण शेवटी कळले आयुष्य न उलघडणारे कोडे आहे........ यातली ही शेवटची ओळ दोन ओळीत विभागली तरी छान वाटेल. चंद्राला भाऊ मानून बघितले . नि पिंडाला चाहूल देऊन बघितले. पण कळतंय शेवटी, आयुष्याचे कोडं उलगडलंच नाही. इथे फक्त 'शेवटी' हा भाग वर्मानात राहून बाकी सगळे केले, बघितले, उलगडले... हे भूतकाळात जातय. यामुळे निवेदन केल्यासारखं वाटू शकेल.

चित्रगुप्त गुरुवार, 07/11/2013 - 12:46
बायकोला कोपरखळ्या मारून बघितले. बायकोला उथळ मानून बघितले. बायकोला हुशार मानून बघितले. बायकोला थोडा लगाम लावून बघितले. मेव्हण्याला भाऊ मानून बघितले . सासूला हूल देऊन बघितले. पण शेवटी कळले बायको न उलगडणारे कोडे आहे........ स्वतःला थोडे शांत करून बघितले निळ्या आकाशी भ्रमंत करून बघितले पैसा देऊन थोडे श्रीमंत करून बघितले बायकोला ताप देऊन बघितले सासर्‍याला शाप देऊन बघितले पण शेवटी कळले बायको न उलगडणारे कोडे आहे........ पोलक्यात थोडे वाकून बघितले एकत्र न्हाऊ-माखुनही बघितले बघता-बघता डोळे मारूनही बघितले सोफ्यावर थोडे खेटून बसून बघितले. पण शेवटी कळले बायको न उलगडणारे कोडे आहे........