जिंदगी जम चुकी है अब
लेखनविषय:
थोडी प्रस्तावना:
बर्याच वर्षांनी हिंदी मध्ये काहीतरी सुचले (असं फार क्वचितचं होतं).
म्हटलं इथे प्रकाशित करावे पण मग विचार केला हे बरोबर नाही. मिपा हे मराठी भाषेला वाहिलेले जास्वंदी फुल आहे.
मग याच रचनेचा मराठीत अनुवाद केला. मला स्वतःला फारसा भावला नाही पण पहिला प्रयत्न म्हणून चालु शकेल असे वाटले.
खरंतर अनुवाद किंवा भावानुवाद हा माझा प्रांतच नाही. त्यातल्या त्यात इतर कोणाही कवीची रचना असेल तर काही खरं नाही.
हिंदीतली रचनाही माझीच असल्याने हिंमत करतोय.
| ठहरे हुए पानी कि तरह जिंदगी जम चुकी है अब . शाखसे लटके हुए पत्ते कि तरह सासे अटकीसी रहती है . खिडकीसे बाहर बरसता हुआ पानी कुछ लम्होंकी यादसी लाता है खाली आसमांसा दिन गुजरता जाता है . शाम और दिन जब तेरे होठोंकी तरह एक दुसरेसे अलग होते है तब दिल के खाली खालीसे कमरोंमे जाने क्यु एक बेचैनीसी गुंजती रहती है . उपरी झरोकोंसे तिमतिमाते इन कमरोंमें चांद उतरता है तो रातके आने का एहसास उभरता है . बस रात और चांद दोनोंकी यही साजिश है जो मेरे खिलाफ इन दोनोंने चलायी है . बस्स....ठहरे हुए पानी कि तरह जिंदगी जम चुकी है अब |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२२/०६/२०१३) | एकाकी तळ्यावर साचलेल्या शेवाळासारखे जगणे घट्ट झाले आहे आता . पिवळे पडलेले जर्जर पान जसे फांदीला लटकत अडकुन राहते तसे काही श्वास अडकले आहेत छातीतचं . उलटून गेलेल्या काही क्षणांच्या आठवणी खिडकीसमोर बरणार्या पावसाने जाग्या होतायत पण ते क्षण सरत नाहीत . रिकाम्या रिकाम्या फट्ट पांढर्या नभासारखे दिवस सरकत जातात . संधीकाल जेव्हा दिवस अन् रात्र यांना अलग करतो तेव्हा अगदी थेट तुझे ओलसर गुलाबी ओठ अलगद एकमेकांपासून विलग होण्याचा भास होतो . कां कुणास ठाऊक, पण हृदयाच्या निर्वात कप्प्यांमध्ये एक किर्र शांतता घुमत राहते . या कप्प्यांच्या वरच्या कोपर्यातल्या झापांमधुन लुकलुकता चांद्रप्रकाश पाझरतो तेव्हा कुठे रात्र झाल्याचा अदमास येतो . ह्याच रात्रिने आणि चांद्रप्रकाशाने माझ्या विरुद्ध चालवलेले हे कारस्थान आहे . बस्स... एकाकी तळ्यावर साचलेल्या शेवाळासारखे जगणे घट्ट झाले आहे आता |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (०९/०७/२०१३) |
वाचन
4226
प्रतिक्रिया
26
मिका, असाच लिहीत राहा!
हिंदी कविता जास्त आवडली
मुळ रचनाच आधी वाचली होतीच
छान...
मिका. जमलीय रे.. घट्ट होऊन
फारच छान मिका. दोन्ही रचना आवडल्या.
In reply to फारच छान मिका. दोन्ही रचना आवडल्या. by चाणक्य
बास
एक सांगायचं राहिलं
In reply to एक सांगायचं राहिलं by चाणक्य
(No subject)
मी. का. : १ नंबर लिहिले आहे.
खुप छान
गुड वन ! खरच मस्त आहे!
उद्या पुन्हा तोच सूर्य, उद्या
मस्तच. चाणक्य पण भारीच.
मस्त...मस्त...!!!
मिका , चाणक्य
वा ! दोन्हीही कविता आवड्ल्या.
हिंदी रचनाच जास्त भारीये!!!!!
हमना मराठीच आवड्या.
feast!
हिंदीतले काव्य मूळ असल्याने
मस्तच रे...!!!!
___/\___
मस्तच जमलंय
मस्त....
In reply to मस्त.... by अनुरोध
प्रतिसाद आवडला.