दाल बाटी.
तिथल्या सरदारांनी आपापल्या हवेल्या आता हॉटेल म्हणुन वापरायला सुरवात केल्याने आम्ही शाही पाहुणचार घेत फिरत होतो अस म्हणायला हरकत नाही. तर चितोड मध्ये एका रिक्षावाल्याला मी आपल माझ्या बडबड्या स्वभावानुसार विचारल राजस्थानात त्यांच अस वैशिष्ट्यपुर्ण अस खाणं कोणत? म्हणजे आपली कशी झुणका-भाकर तस काही? तर त्याने सुचवली दाल-बाटी. वेगळ काही खायचं म्हंटल की माझ्या नवर्याच्या कपाळावर सतराशेसाठ आठ्या पडतात. पण आता सतराशेसाठमध्ये एकसश्ठावी आठी मी असल्याने, त्याला नंदीबैलासारखी मान हलवत गपगुमानं हॉटेलमध्ये ही ऑर्डर द्यावी लागली. अर्थात त्याच नशिब जोरावर असल्याने दालबाटी अशी रोज नाही बनत अन ऑर्डर दिल्यावर अर्ध्यातासात तर नाहीच मिळणार अस पुणेरी स्टायल उत्तर मिळालं. मग दुसर्यादिवशी तोच रिक्षावाला आम्हाला जेथे हमखास दाल-बाटी मिळते अश्या ठिकाणी घेउन गेला, अन राखेत भाजलेल्या बाटीज विथ उडदाची आमटी अस खाण आम्ही तोंड वेडवाकड करत खाउन बाहेर पडलो. (त्यानंतर नवर्याने काय आकांडतांडव केला असेल तो मी येथे उधृत करु इच्छीत नाही)
एकुण काय प्रकरण असतं याची चुणु़क आम्ही पाहिली अन परत या डिशकडे वळायच नाही असा अलिखीत करार केल गेला. पण मेलबर्नमध्ये किर्ती सिन्हा म्हणुन राजस्थानी कायस्थ (हे काय असत? अस विचारायच नाही. ते अगदी अभिमानाने सांगतात,"हम राजस्थानी कायस्थ है।) मैत्रीण भेटली. माझ चिकन हाणुन गेल्यावर तिने आम्हाला तिची दाल-बाटी खायच आमंत्रण दिलं. अर्थात आम्ही घरुन निघताना पोटभर खाउन निघायची खबरदारी घेतली होतीच, पण काय आश्चर्य? अहो चक्क खुसखुशीत अन चमचमीत निघाली ही घरची दाल-बाटी. त्यात अन ती "कायस्थ" पद्धतिने बनवल्यामुळे म्हणे खुपच वेगळी असते. मग काय? त्यानंतर घरात अधुन मधुन हा प्रकार बनायला लागला.
तर मंडळी गप्पा फार झाल्या आता कामाला लागा. तसेही चारच दिवस उरले कार्याला तर अजुन नवर्यामुलाला केळवणाला अथवा गडनेराला नसेल बोलवलं तर दाल-बाटी बनवुन अगदी खुशाल आमंत्रण धाडा.
तर पहिला साहित्यः-
१/२ वाटी तुर डाळ
१/२ वाटी अख्खे चणे (हरभरे)
१/२ वाटी हिरवे मूग
१/२ वाटी राजमा
१/२ वाटी मसुर
३/४ वाटी काळे उडीद
हे सगळ स्वच्छ धुवुन एक अर्धातास भिजत ठेवा.
अर्थात आता अर्धातास करायच काय म्हणुन मग मी असा टाइमपास केला...
अहो असं स्वच्छ उन्हं आल होत घरात म्हणुन सांगु ?
तर असो. आता या भिजलेल्या डाळीत
१/२ कांदा चिरुन
१ टोमॅटो
चविप्रमाणे मिठ, हिंग हळद अन आमचं कोल्हापुरी तिखट (माझ्या सिंगापुरच्या मैत्रीणींच्या दाल मख्खानी माझ्या या तिखटाशिवाय होत नव्हत्या. जाम डिमांड होता मैत्रीखात्यात) हे सर्व घालुन मस्तपैकी शिजवुन घ्या.
आता फोडणी -
नेहमीचीच जीरे, मोहरी, कडीपत्ता, हिंग लसूण अन १/४ चिरलेला कांदा.
मोठ्या पातेल्यात तेल चांगले गरम करुन गॅस बंद करा. आता त्यात मोहरी घालुन तडतडु द्या, मग जीरे घाला मग कडीपत्ता अन लसूण घालुन गॅस पुन्हा मंद सुरु करा. आता त्यात कांदा घालुन मग शेवटी हिंग टाका.
या फोडणीवर शिजलेली डाळ घालुन थोडे पाणी मिसळा. तिखट मिठ आपण डाळ शिजताना घातल्याने आता फक्त अॅडजस्ट करा. झाली दाल तयार.
आता बाटी.
बाटी साहित्य- गव्हाचे पिठ चार वाट्या.
१/४ चमचा ओवा
३/४ ते १ वाटी तेल.
वरुन लावायला कलौंजी (फ्लेवरसाठी ऑप्शनल)
आता या पिठात ओवा अन तेल गरम करुन मोहन घाला. मोहन इतक हवे की पिठाचा मुटका करुन उडवला (हलकेच ! लगेच बॉलींग नका करु) तरी तो टिकला पाहीजे( हाच तो कायस्थ टच!!) आता हे पिठ जरा घट्टसर मळुन घ्या. त्याचे छान जरा चपटे अन आत मध्ये किंचीत हॉलो गोळे तयार करा अन ओव्हन मध्ये २०० सेंटीग्रेड्वर साधारण चाळीस मिनिट भाजुन घ्या. हे गोळे वळताना आपण मोदकाला कशी पाती तयार करत जातो तशी तयार करुन मिटवायची .



तयार आहे दाल-बाटी.

__/\__
अपर्णा
In reply to मस्त! by विंजिनेर
In reply to मस्त.. माझी सर्वात आवडती डीश आहे ही ................ by रितुश्री
In reply to + १ तूप नसेल तर दाल बाटीची by आतिवास
In reply to + १ तूप नसेल तर दाल बाटीची by आतिवास
In reply to थोडसं आवांतर.... by मदनबाण
In reply to थोडसं आवांतर.... by मदनबाण
In reply to वाह! by दिपक.कुवेत
नेहमीप्रमाणेच खुशखुशीत लेखनासहित खुशखुशीत बाट्या.
+१११In reply to वाह! by दिपक.कुवेत
In reply to अरे वा.. मस्त रेसेपी..!! by पिलीयन रायडर
In reply to मस्तं. by प्रभाकर पेठकर
In reply to निखार्यावर ती व्यवस्थीत by स्पंदना
निखार्यावर ती व्यवस्थीत भाजली नाही जातहम्म्म्म! कधी कधी आपल्याला जमत नाही हे खरेच. पण निखार्यांची धग नियंत्रित करावी लागते. जेंव्हा जास्त हवी असेल (ब्राऊनिंगसाठी) तेंव्हा निखारे वरखाली करून त्यावरील राख झटकून टाकतात त्याने निखारे लालबुंद आणि रसरशित दिसतात. त्यात उष्णता जास्त असते. कमी उष्णता हवी असेल तर निखारे हलवत नाहीत त्यावर राख जमू देतात. उपहारगृहात तंदूरमध्ये जमणारी रोजची राख टाकून देत नाहीत. काढून वेगळी ठेवतात. जेंव्हा गरम तंदूरची उष्णता कमी करण्याची वेळ येते तेंव्हा निखार्यांवर ती राख पसरून टाकतात आणि मग पदार्थ शिजवतात. बट्टी आंत पर्यंत शिजविण्यासाठी आधी आंच मंद पाहिजे आणि बट्टी शिजली की राख झटकून रसरशीत निखार्यावर 'ब्राऊनिंग' करून घ्यावे. बट्टी कडक न होण्यासाठी बट्टीत मोहन आणि पाणी योग्य असावे. ते कमी असेल तर बट्ट्या कडकडीत होण्याचा संभव असतो. बट्टी शिजल्यावर ती तुपात बुडवितात आणि नंतर सादर करतात. ह्यानेही बट्टी खुसखुसशीत लागते. ओव्हन मध्येही ओव्हनचे तापमान कमी ठेवून आधी बट्ट्या आंतपर्यंत शिजवून घ्यायच्या आणि शेवटच्या कांही मिनिटांत तापमान वाढवून 'ब्राऊनिंग' करून घ्यायचे. ब्राऊनिंग पूर्वी बट्ट्यांना तुप लावले तर ब्राऊनिंग लवकर आणि चांगले होईल.

In reply to मस्तच रेसेपी by मी_देव
In reply to मस्तच रेसेपी by मी_देव
In reply to मस्तच रेसेपी by मी_देव
In reply to मस्त! by पैसा
पाकृ सांगण्याची स्टाईल आणि एकूणच सगळं छान! फोटो पहिल्यापासून शेवटपर्यंत झक्कास!+१ अगदी असेच म्हणतो. मी स्वतः आजवर हा पदार्थ कधी चाखला नाही. नुसतं एकुनच आहे या बद्दल.
In reply to मस्त! by पैसा
In reply to मस्त! by पैसा
In reply to 'बोलकी' पाकृ मस्तच. by प्यारे१
In reply to 'बोलकी' पाकृ मस्तच. by प्यारे१
In reply to ते राजस्थानी फोटोचं सांगायचं by प्यारे१
In reply to आम्हा दोघान कडून तुम्हाला आजच by त्रिवेणी
In reply to तुमच्या पाकृ बाकी भारी जिवंत by बॅटमॅन
In reply to वा.. by स्वाती दिनेश
In reply to पाकृ व माडंणी दोन्ही मस्तच....! by रुमानी
In reply to दाल बाटी by सुधीर
In reply to पाकृ मस्तच.. by garava
In reply to मस्त लिहिलय. पण तरिहि मी करेन by कवितानागेश
In reply to थांब आता! नाही तुला बाटी by स्पंदना
In reply to पुन्हा एकदा फोटू बघून गेले. by रेवती
In reply to बाट्या कशा अगदी लाडवांसारख्या by गवि
In reply to तंबिट!!!!!!!! by बॅटमॅन
In reply to कधी मिळ्णार हे लाडू? by कवितानागेश
In reply to समय से पहले भाग्य से ज्यादा by बॅटमॅन
In reply to बाट्या कशा अगदी लाडवांसारख्या by गवि
In reply to दाल बाटी by कर्ण
In reply to ओ? भाकरीची आठवण कोणी काढायला by स्पंदना
In reply to शॉट एक्स्टेंडेड... by धमाल मुलगा
In reply to कुणी हाय का? by स्पंदना
In reply to शॉट एक्स्टेंडेड... by धमाल मुलगा
In reply to शॉट एक्स्टेंडेड... by धमाल मुलगा
In reply to ओ? भाकरीची आठवण कोणी काढायला by स्पंदना
In reply to घोळ मिटवून आज सकाळी घरला by प्यारे१
मस्त..