रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (दोन)
रथाचं सारथ्य कृष्णाकडे, स्वत:कडे घेण्याचं साहस करण्याचा फक्त अवकाश , तुम्ही स्वच्छंद व्हाल.
__________________________
बिफोर वी गो,
पहिल्या लेखात म्हटलंय विषय कसा पुढे न्यावा याची कोणतीही योजना मनात नाही. तुमचे प्रतिसाद आणि प्रश्न लेखनाची दिशा ठरवतील. प्रथम तुमच्या सर्व प्रतिसादांची एकसंध मांडणी करून लेखमालेच्या संदर्भात त्याची उत्तरं देतो म्हणजे पुढे जाता येईल.
अनेकांचा प्रश्न असायं की मनापलीकडे जाऊन काय साधतं?
खरं तर याचं उत्तर लेखातच आहे : जेव्हा तुम्हाला मनाची समग्र प्रक्रिया समजेल तेव्हा तुमच्या वैचारिक आवर्तनांचा कालावधी कमीकमी होऊ लागेल. तुम्ही पुन्हापुन्हा वर्तमानात येऊ लागाल. मनाच्या एका महत्त्वाच्या दालनावर तुमची हुकुमत चालायला लागेल. मनाच्या अनेक प्रभागांपैकी एका व्यापक प्रभागापासनं तुम्ही मुक्त व्हाल. निरंतर चालू असलेल्या वैचारिक कोलाहलातून बाहेर आल्यानं तुमच्या जीवनात शांतता येईल.
आणखी थोडं विस्तारानं सांगतो (सुरुवातीचा भाग लेखात आहे) :
संवेदना ही मनाची कारक आहे म्हणजे कोणतीही संवेदना मन सक्रिय करते. जेव्हा आपण मनाची प्रक्रिया जाणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा 'पहिली संवेदना' हा अत्यंत बेसिक फॅक्टर आहे हे लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मन सक्रिय झाल्याबरोबर आपण स्मृती चक्रात अडकून अनेकानेक गतकालीन प्रसंगातून आणि अनुभवातून फिरायला लागतो. हे इतक्या वेगानं घडतं की सुरुवात नक्की कुठून झाली हे लाखातला एखादाच जाणू शकतो.
आपलं मन (किंवा मेंदू) प्रत्येक संवेदनेचं डिकोडींग करत असतो आणि त्यामुळेच आपल्याला संवेदनेचा अर्थ कळतो. हे डिकोडींग स्मृतीच्या आधारे चालू असतं. तुम्ही कधीही शांत डोळे मिटून बसलात तर तुम्हाला हा अनुभव येईल. समजा कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला तर प्रथम तो उलगडा होतो (श्रवणसंस्था सक्रिय होऊन स्मृतीन्वये तो आवाज कुणाचा ते कळतं ). मग स्मृतीचा दृक भाग सक्रिय होतो आणि डोळ्यासमोर आपल्याला ज्ञात असलेल्या कुत्र्याची प्रतिमा येते. त्यानंतर कुत्र्याविषयीच्या सर्व स्मृती सक्रिय होतात. समजा लहानपणी कुत्रा पाळला असेल (किंवा कधी चावला असेल) तर त्याच्या स्मृती. कुणाला कुत्र्याच्या मालकिणीविषयी काही अनुभव असेल तर त्या स्मृती. कुणाला कुत्री आवडत नसतील तर कॉर्पोरेशनच्या डॉगस्कॉडमध्ये तक्रार करून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कसा करावा याचा प्लॅन. आणि असं करत करत कुत्र्याचं जिणं चांगलं का वाईट? आणि सरते शेवटी, आपलं जिणं कसं आहे? अश्या प्रकारे विचारचक्रात पूर्णपणे अडकून आपण स्मृतींच्या अनंत विस्तारात फिरत राहतो. काही वेळानंतर लक्षात येतं की अरे! आपण घरात शांत बसलेलो आहोत.
हे इतकं सविस्तर लिहिण्याचं कारण की कोणताही निर्णय घेताना, कुणाशीही वागताना किंवा एखादी कृती करताना आपण स्मृतीच्याच अधीन होऊन जगत असतो. स्मृतीचा वापर करणं ही अत्यंत वेगळी गोष्ट आहे आणि तिच्या अधीन होऊन जगणं बंधन आहे. पण स्मृतीची प्रक्रिया इतकी वेगवान आहे आणि आपण इतके बेसावध असतो की 'स्मृती (किंवा मन) निर्णय घेतं आहे' याची शेवटच्या क्षणापर्यंत कल्पनाच येत नाही!
तुम्हाला वाटेल की असं काही नाहीये पण मानवी अस्वास्थ्याचं मूळ कारण तेच आहे. आयुष्यात प्रथम आपण सेटल होण्याचा प्रयत्न करतो ( ते अपरिहार्य आहे) पण एकदा सेटल झाल्यावर आपण तोच दिवस (अगदी किरकोळ फरकानं ) पुन्हापुन्हा जगतो. अस्तित्वात प्रत्येक क्षण नवा आहे पण वी लीव द सेम रूटीन. आपला दिवस आठवड्याच्या माळेत गुंफल्यानं त्यात थोडाफार पॅटर्न वाटतो इतकंच. मग असं जगतजगत एक दिवस आपण संपून जातो. ज्यांना याची वेळीच कल्पना येते ते चौकट लंघायचा प्रयत्न करतात, पण बहुसंख्यांना वाटतं लाईफ असंच आहे. ते 'एक उनाड दिवस' सारखा पिक्चर पाहतात (फार तर अधेमधे ट्रेक करतात किंवा सहलीला जातात) आणि ‘कल्पना उत्तम आहे’ अशी स्वतःची समजूत घालून विसरून जातात.
नाऊ कमिंग टू द पॉइंट, जर तुमचं आयुष्य यापेक्षा वेगळं असेल किंवा तुम्हाला तसं वाटत नसेल तर तुम्हाला या लेखांचा काही उपयोग नाही. तुम्ही लेख वाचण्याच्या, प्रश्न विचारण्याच्या आणि वाद घालण्याच्या फंदात पडू नका.
इथे असा गैरसमज आहे की पब्लिक फोरमवर कुणीही काहीही विचारू शकतो. हे म्हणजे रस्त्यावरच्या सगळ्या पाट्या वाचत आणि प्रत्येक दुकानदाराशी बोलत सुटण्यासारखं आहे. ज्यांना माझं म्हणणं पटलं असेल आणि हरक्षणी उत्स्फूर्ततेनं जगायचं असेल त्यांना लेखमालेचा उपयोग आहे.
_________________________
दुसरी गोष्ट, मनावर नियंत्रण मिळवायला तुम्ही इतर कोणताही मार्ग अवलंबत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे. तुम्हाला नामसाधना योग्य वाटत असेल तर चालू ठेवा. मनाच्या अवलोकनानं रिझल्ट मिळत असेल तर उत्तम आहे. मी स्वतःचं आकलन मांडतोय, आणि जे लिहितोय ते जगतोय त्यामुळे मला कोणत्याही साधनेची गरज नाही. तस्मात, तुम्ही तुमच्या मार्गानं जाणं उत्तम. ते मार्ग रिझल्ट देत नाहीत असं मी का म्हटलं याचा सविस्तर उहापोह पहिल्या लेखात आणि इतर अनेक प्रतिसादात झाला आहे त्यामुळे त्यावर आता पुन्हा चर्चा होणे नाही.
_____________________
सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेखनाचा उद्देश इंटरेस्टेड लोकांचं आयुष्य आनंदाचं व्हावं असा आहे आणि तो निव्वळ वाचन किंवा चर्चेचा विषय नाही; जगण्याचा आहे. त्यामुळे जोपर्यंत बॅकट्रॅक या पहिल्या लेखात सांगितलेल्या प्रक्रियेचा तुम्ही स्वतः प्रयोग करून अनुभव घेत नाही (किंवा शंका निस्तरत नाही) तोपर्यंत पुढचे लेख लिहिण्यात अर्थ नाही. कारण स्मृती हा मनाचा व्यापक प्रभाग आहे. त्याची प्रक्रिया उलगडल्याशिवाय पुढे तादात्म्य, धारणा, अंतःप्रेरणा, भय, कल (अॅप्टीट्यूड) , माइंड-बॉडी को-ऑर्डिनेशन, नाती आणि सरते शेवटी संगृहित मनाचा परिपाक म्हणजे व्यक्तिमत्त्व या गहन पैलूंचा उलगडा होणं अशक्य आहे.
तुमच्या प्रतिसादातून आणि प्रश्नातून तुम्ही प्रक्रिया करून पाहिली की नाही हे लक्षात येतं आणि इथे एक सोडता कुणीही प्रक्रियेविषयी काही प्रतिसाद दिलेला नाही. आधी जे दोन प्रतिसाद आले होते त्यांनी प्रक्रिया करून पाहिलेली नाही हे त्यांच्या नंतरच्या प्रतिसादांवरून कळलं.
____________________
शेवटची गोष्ट, प्रत्येक वॅलीड प्रश्नाला मी उत्तर दिलं आहे. काही प्रश्न खरोखरी विषयाशी संबंधित होते :
उदाहरणार्थ 'हे तरी आम्हाला कसे कळावं की आम्ही तुमची साधना विश्वासानं करून पाहवी?'
आणि उत्तर आहे : मला किती कळलंय ते तुम्हाला साधना यशस्वी झाल्या क्षणी कळेल!. आणि, अर्थात साधना सोपी आणि निर्धोक आहे. तुम्हाला त्यासाठी कुठेही जायची गरज नाही की त्यात फारसा कालापव्यय नाही.
किंवा : तुम्ही सततच्या चिंतनानं मन भ्रम निर्माण करतं आणि व्यक्ती भ्रमिष्ट होते.> असे लिहिलं आहे. हे कसं काय? आईन्स्टाईनबद्दल किंवा तश्याच अनेक शास्त्रज्ञांबद्दल देखिल तुमचे हेच मत आहे का?
आणि उत्तर आहे : शास्त्रज्ञ अस्तित्वागत प्रश्नांवर (उदा, गुरुत्वाकर्षण) चिंतन करतात, रामावर नाही. आणि त्यांच्या चिंतनातून ते प्रश्नांची उकल साधतात. राम भेटावा हा त्यांच्या चिंतनाचा हेतू नसतो त्यामुळे ते भ्रमिष्ट होत नाहीत.
मला वाटतं हा प्रश्न स्वतः विचार केला तरी सुटण्यासारखा आहे. आणि प्रश्न विचारताना किमान तेवढा विचार करावा अशी अपेक्षा आहे म्हणजे चर्चा विस्तारणार नाहीत.
काही ठिकाणी उपहास करण्याचा अटोकाट प्रयत्न झालयं, उदा. हा प्रश्न : जाणीवेची स्थिर अवस्था म्हणजे कोमा का?
अश्या प्रकारे उपहास करताना आपलं हसूं होतं इतकं लक्षात आलं तर बरं. कारण ‘कोमा’चा अर्थ ‘हँग झालेला कंप्युटर’. व्यक्तीची जाणीव स्थिर झालीये पण मेंदू निकामी झालयं, तो आता संवेदना डिकोड करू शकत नाही. सिद्धाची जाणीव स्थिर आहे आणि मेंदू फुल्ली फंक्शनल आहे.
थोड्याफार प्रमाणात अशीच परिस्थिती धाग्याचा खरडफळा करणार्यांची आहे पण ती जवाबदारी सं.मं.ची आहे. त्यामुळे कुणाचे प्रतिसाद वाचायचे आणि कुणाचे नांव पाहून स्क्रोल करायचे इतकंच माझ्या हातात आहे.
पण काही ठिकाणी सदस्य इतके असंबद्ध प्रतिसाद देतात की आश्चर्य वाटतं उदा. 'अवांतर: तुम्ही कायम हे असे पराभूत, हल्ले, हुकुमत अश्या प्रकारचे शब्द का वापरता'? त्यामुळे मला फार हसू येतं'.
साधारण मराठी पाचवी-सहावीपर्यंत कुणालाही हे शब्द गेलेले असावेत अशी (निदान मराठी संकेतस्थळावर तरी) अपेक्षा आहे.
अनाहत नाद या अत्यंत गहन विषयावर मी म्हटलंय :
"मन शांत झालं की देह, मन आणि विश्वशांती यांची एकरूपता साधते कारण शांतता एकसंध आहे. तिचं विभाजन होऊ शकत नाही. या स्थितीत आपण अखिल विश्वाशी एकरूप होतो (म्हणजे मुळात आहोतच पण त्याची प्रचिती येते). त्याला सत-चित-आनंद (अॅबसल्यूट-काँशसनेस-इक्सटसी) म्हटलंय".
त्यावर असा प्रतिसाद देणं : "कसेही असलं तरी जर मूळ्स्वरुप कायम तसेच राहणार आहे तर त्यापर्यंत जायचे कशाला?
जिथे काहितरी बिघडतय तिथे जौन दुरुस्त करायला नको का?"
म्हणजे एखाद्या शास्त्रीय संगीताच्या रंगलेल्या आणि क्लायमॅक्सला आलेल्या मैफिलीत अचानक कुणाचा सेलफोन यावा आणि 'हाताला धरलं या' हा रिंगटोन वाजावा तसं आहे. अशामुळे आपला शास्त्रीय संगीतातला रस तर दिसतोच पुन्हा चारचौघात अभिरुची उघड होते. एखाद्याला त्याची फिकीर नसणं शक्य आहे पण इतरांचा रसभंग होतो हे नक्की. अश्या वेळी सेल स्वीच ऑफ असणं उत्तम.
या लेखावरील प्रतिसादांमुळे सदस्यांचा वैचारिक कल, त्यांचं आध्यात्मिक आकलन याची पूर्ण कल्पना आलेली आहे. त्यावरनं एक सांगावंस वाटतं, मनापलीकडे जाणं म्हणजे वैचारिक उहापोहातनं बाहेर पडून जाणिवेनं जगणं. अर्थात, जोपर्यंत स्मृती सक्रिय होण्यापूर्वी कोणती संवेदना होती ते लक्षात येत नाही तोपर्यंत जाणीव म्हणजे नक्की काय याचा उलगडा होत नाही. आणि जाणीव हा आपला अस्तित्वाशी संपर्क बिंदू आहे. तो अंतःप्रेरणेचा स्रोत आहे. थोडक्यात अस्तित्वाशी समरूप होऊन जगायला (किंवा अस्तित्वाची इच्छा समजायला) स्मृतीऐवजी संवेदना उपयोगी आहे. स्मृती (किंवा मनाच्या) अधीन असणं म्हणजे व्यक्तिमत्त्वात बंदिस्त होऊन जगणं आणि जाणिवेनं जगणं म्हणजे स्वच्छंद जगणं असा अर्थ आहे. स्वच्छंद जगताना आपण स्मृतीचा उपयोग करतो, पण अनुसरण करत नाही. ते आयुष्य एका नव्या डायमेन्शननं जगायचं साहस आहे. सर्व लेखन हा माझा वैयक्तिक अनुभव आहे तस्मात, निष्फळ चर्चा आणि वादविवाद करण्यापेक्षा तुम्हाला काही काळ तरी प्रामाणिकपणे माझ्या बरोबर वाटचाल करावी. एकदा आपल्या अनुभवात समन्वय आला की मैफिल रंगत जाईल. नंतर जीवनाच्या रथाचं सारथ्य कृष्णाकडे म्हणजे स्वत:कडे घेण्याचं साहस केल्याचा आनंद, तुमचा अनुभव होईल .जाणीव हा आपला अस्तित्वाशी संपर्क बिंदू आहे. तो अंतःप्रेरणेचा स्रोत आहे. थोडक्यात अस्तित्वाशी समरूप होऊन जगायला (किंवा अस्तित्वाची इच्छा समजायला) स्मृतीऐवजी संवेदना उपयोगी आहे.बिंगो! हे भाग १ आणि भाग २ यांचे सार असावे. ह्याचा मतिथार्थ माझ्या पहिल्या भागातील प्रश्नाच्या उत्तरात दडला होता बहुदा :) - (संवेदनाशील) सोकाजी
In reply to जाणीव हा आपला अस्तित्वाशी by सोत्रि
संवेदना ही मनाची कारक आहे म्हणजे कोणतीही संवेदना मन सक्रिय करते.... ....पण स्मृतीची प्रक्रिया इतकी वेगवान आहे आणि आपण इतके बेसावध असतो की 'स्मृती (किंवा मन) निर्णय घेतं आहे' याची शेवटच्या क्षणापर्यंत कल्पनाच येत नाही!उत्तम ! या पुर्ण उतार्याला मानसशास्त्रीय बैठक आहे, मेंदूविज्ञानाचा आधार आहे. या उतार्यानंतर जे काही लिहिलं आहे, त्यावर म्या पामर कय लिहिणार. :)
In reply to संवेदना ही मनाची कारक आहे by धन्या
मेंदूविज्ञानाचा आधार आहेधन्यवाद! संवेदनेचं सतत आणि अनावधानानं स्मृतीत होणारं रूपांतर थांबणं याला जागरुकता म्हटलंय. बॅकट्रॅक या प्रोसेसनं आपण संवेदनेपाशी येतो. एकदा संवेदना काय होती याचा उलगडा व्ह्यायची सवय लागली की स्मृतीप्रवाहात वाहात जाणं कमी होतं असा उर्वरित भागाचा अर्थ आहे.
In reply to प्रोब्लेम स्मृतिचा नाहिये! by अग्निकोल्हा
टेंडन्सिचा आहे.तेच तर सांगतोय. अनियंत्रित मनाला ऐच्छिक करण्यावर तर लेखमाला आहे. पहिल्या लेखात मी म्हटलंय :
मन हा बायो-कंप्युटर आहे. जशी कंप्युटरची सर्व रेकॉर्डिंग्ज एकमेकांशी हेड आणि टेल अॅड्रेसेसनं जोडलेली असतात तशी आपल्या स्मृतीतली सर्व रेकॉर्डिंग्ज एकमेकांशी निगडित असतात. पण कंप्युटरमधला डेटा निर्वैयक्तिक असल्यानं तो सर्वांसाठी एकाच सलग पद्धतीनं रिट्राइव होतो आणि मन हा प्रत्येकाचा व्यक्तिगत बायो-कंप्युटर असल्यानं कुणाची स्मृती कशी सक्रिय होईल आणि त्याला किती दूर ठेवेल ते सांगता येत नाही.त्यामुळे कुणाचं मन कसं सक्रिय होईल आणि त्याला कोणत्या स्मृती किंवा कल्पनेतून किती वेळ वास्तविकतेपासून दूर नेईल हे त्याचं आतापर्यंतच आयुष्य आणि धारणा (ज्यामुळे विचार करण्याची पद्धत ठरते) यावर अवलंबून आहे. >मनापासुन मुक्त" होउन आयुष्य आनंदि बनायला आधि बँकबॅलन्स दणकट असावा लागतो = मला वाटतं बँकबॅलन्सपेक्षा बुद्धिमत्ता श्रेष्ठ आहे. कारण भरपूर संपत्ती ही भयभित मनाचीच मागणी असते. तुमच्या मनातली फिगर आणि वास्तविकातली फिगर यात कायम तफावत असते आणि जोपर्यंत व्यक्ती मनाचं अनुसरण करते तोपर्यंत कल्पनेतली फिगर वास्तविकाशी जुळणं असंभव आहे. अशा प्रकारे अमाप पैश्याची आस धरणारे कायम अस्वस्थ राहतात. एकतर आहे तो पैसा त्यांना कायम कमी वाटतो आणि नक्की किती म्हणजे पुरेसा पैसा हे त्यांना कधीही ठरवता येत नाही. पैसा या विषयावर पुन्हा चर्चा सुरू करू नये, त्याविषयी माझे सर्व विचार इथे मांडले आहेत
In reply to तो आपल्या मनाच्या इमॅजिनेशच्या अनियंत्रित अॅबिलिटी व by संजय क्षीरसागर
तेच तर सांगतोय.तस दिसत तर नाहिये.
मला वाटतं बँकबॅलन्सपेक्षा बुद्धिमत्ता श्रेष्ठ आहे.असेलही कारण पैशाने बुध्दि निर्माण करता येत नाही, तरिही भाड्याने नक्किच घेता येते. तसही दिर्घकालिन संतुलित मनाचे अपेटाइट हे पुरेसे अन्न, सुरक्षा आणि इतर मनोशारिरीक गरजा असतात, ज्या गाठिला असणार्या पैशानेच पुर्ण होतात. थोडक्यात थोडक्यात संतुलित मनाचे सार हे पुरेसा बँक बॅलन्स हेच आहे. मन संतुलित नसताना त्याच्या त्यागाचा प्रयत्न करणे म्हणजे एक प्रकारची व्यसनाधिनताच बाळगणे होय. ही सवय घातक ठरु शकते.
भरपूर संपत्ती ही भयभित मनाचीच मागणी असते.उत्तर म्हणून आधिचाच पॅरॅ वाचावा. तसही भरपूर संपत्ती ही "रिलेटिव" गोश्ट असल्याने याचा तुम्ही हवातो सोयिचा अर्थ लावुन रकानेच्या रकाने खरडु शकाल यावर दुमत नाही. पण माझा वरचा पॅरॅ व्यवस्थित वाचलात व समजुन घेतलात म्हणजे ते रकाने किती अनावश्यक आहेत याचा आपणास आपोआप बोध होइल.
In reply to तेच तर सांगतोय. by अग्निकोल्हा
भरपूर संपत्ती ही भयभित मनाचीच मागणी असते.>भरपूर संपत्ती ही "रिलेटिव" गोश्ट असल्याने याचा तुम्ही हवातो सोयिचा अर्थ लावुन रकानेच्या रकाने खरडु शकाल यावर दुमत नाही = भीती हा अस्वस्थ मनाचा आधार आहे आणि स्वतःचं अस्तित्व निव्वळ पैश्यावर अवलंबून आहे या भ्रामक समजूतीचा तो परिपाक आहे.
In reply to कारण पैशाने बुध्दि निर्माण करता येत नाही? by संजय क्षीरसागर
"मनापासुन मुक्त" होउन आयुष्य आनंदिहवं असेल तर तीच एक इच्छा पुरे नाही का फक्त ?
In reply to >> "मनापासुन मुक्त" होउन आयुष्य आनंदि बनायला आधि बँकबॅलन्स दणकट by उन्मेष दिक्षीत
In reply to पोचपावती by स्पा
In reply to येऊ द्या येऊ द्या by अभ्या..
In reply to नक्कीच! लिहिणार संक्षी अन by बॅटमॅन
In reply to चे चे, म्या बापडा काय लिहिणार by स्पा
संक्षी सारखे जेष्ठ इतके अभ्यासू इथे लिहित असताना , म्या पामराने काही बोलणे म्हणजे काजव्याने सूर्यासमोर टिव टिव केल्यागत आहेइतकं नम्र बोलणं आणि ते बोलत असताना शब्दालंकारांची उधळण करणं हे फक्त थोरामोठयांनाच जमतं.
In reply to संक्षी सारखे जेष्ठ इतके by धन्या
In reply to प्रसन्न! मन:पूर्वक दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार by संजय क्षीरसागर
प्रश्न माझा अभ्यास किती आहे याचा नाही कारण जाणीव आपल्या सर्वांना एकसारखी लाभली आहे. आणि त्या जाणिवेच्या प्रकाशानं मनाच्या गूढ महालातलं एकेक दालन पार करत जायचंय. मी सगळं शेअर करतोयं, लेखमाला काय रंग घेईल हे आता तुमच्या हाती आहेतुमचा हाच विनम्र स्वभाव तुम्हाला इतरांपासून वेगळे ठरवतो
In reply to प्रसन्न! मन:पूर्वक दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार by संजय क्षीरसागर
In reply to घ्या अजून एक नवीन शब्द फिरवायला by लंबूटांग
In reply to अरे ये सब केमीकल लोचे है भाई... by अर्धवटराव
In reply to चे चे, म्या बापडा काय लिहिणार by स्पा
तुम्हाला वाटेल की असं काही नाहीये पण मानवी अस्वास्थ्याचं मूळ कारण तेच आहे. आयुष्यात प्रथम आपण सेटल होण्याचा प्रयत्न करतो ( ते अपरिहार्य आहे) पण एकदा सेटल झाल्यावर आपण तोच दिवस (अगदी किरकोळ फरकानं ) पुन्हापुन्हा जगतो. अस्तित्वात प्रत्येक क्षण नवा आहे पण वी लीव द सेम रूटीन. आपला दिवस आठवड्याच्या माळेत गुंफल्यानं त्यात थोडाफार पॅटर्न वाटतो इतकंच. मग असं जगतजगत एक दिवस आपण संपून जातो. ज्यांना याची वेळीच कल्पना येते ते चौकट लंघायचा प्रयत्न करतात, पण बहुसंख्यांना वाटतं लाईफ असंच आहे. ते 'एक उनाड दिवस' सारखा पिक्चर पाहतात (फार तर अधेमधे ट्रेक करतात किंवा सहलीला जातात) आणि ‘कल्पना उत्तम आहे’ अशी स्वतःची समजूत घालून विसरून जातात.दुसर्या लेखातला पहिला भाग वाचला आमचा अगदीच बाळबोध प्रश्न जगायचं तर पैसा लागतोच, निदान २ वेळच्या जेवणाचा तरी पैसे मिळवायचे तर , निदान काहीतरी काम ,धंदा नोकरी किंवा अगदी भीक मागायची ठरवली, तरी ते रुतीनच होणार प्रपंच तर करावा लागणारच , मग ते "चौकट लंघन" हा प्रकार कसा साध्य करायचा
In reply to ओके by स्पा
In reply to मुळात बेसिकमध्येच गल्लत होतेय by बॅटमॅन
In reply to ऑ? by स्पा
In reply to ऑ? by स्पा
In reply to इतरांशी संवाद करता करता तुमचा by प्रकाश घाटपांडे
पैसे मिळवायचे तर , निदान काहीतरी काम ,धंदा नोकरी किंवा अगदी भीक मागायची ठरवली, तरी ते रुटीनच होणार प्रपंच तर करावा लागणारच , मग ते "चौकट लंघन" हा प्रकार कसा साध्य करायचाचौकट लंघन म्हणजे मनस्वितेनं जगणं, उत्सफूर्ततेनं जगणं. आपण स्वतःच्या इच्छेविरूद्ध `केव्हा तरी पुढे मजा येईल' या आशेवर आजचा दिवस काढत जगतो. प्रत्येक वेळी हवं तसं काम मिळेलच याची शाश्वती नसली तरी आहे ते काम समरसतेनं करता येतं. कोणताही मेजर चेंज करण्यापूर्वी आहे त्या परिस्थितीत मजा न येण्याच्या कारणाचा शोध घेतला तर असं लक्षात येतं की: १) प्रत्येक काम पर से न्युट्रल आहे. मजा कामात नाही, आपल्यात आहे. आपण त्या कामात काय रंग आणतो यात मजेचं रहस्य आहे. २) मन (किंवा विचार) आपल्याला सतत `चालू काम कसं व्यर्थ आहे' हे सांगण्याचा प्रयत्न करतं मग आपण त्याप्रती बेफिकीर होतो. हे दुर्लक्ष त्या कामातली मजा कमी करत जातं. ३) मजा कामात नाही, आपल्यात आहे हा बेसिक फंडा लक्षात आल्यावर तुमच्याकडे दोन पर्याय उपलब्ध होतात : एक, आहे ते काम समरसून करा. थोडक्यात, शरीर एक करतंय आणि मन वेगळा विचार करतंय असा स्प्लिट होऊ देऊ नका. तुम्ही, शरीर आणि मन यांचा समन्वय जगातल्या कोणत्याही कामात रंगत आणतो. इतकं करूनही तुम्हाला मजा आली नाही तर काम बदलण्याचं साहस करा. आपण प्राथमिक आहोत, काम दुय्यम आहे याचं स्मरण राहू द्या. एकदा कामात मजा आली की आपण सृजनात्मक होतो. आपल्या जीवनातला तोचतोपणा संपतो, आपण काम विविध पद्धतीनं करायला लागतो. त्यातनं नव्या गोष्टींचा उलगडा व्हायला लागतो, नव्या संधी उपलब्ध होतात. ते शास्त्रिय संगीतासारखं होतं, राग यमनच असतो पण कुमार गंधर्व म्हणतात तसं तुम्ही तो प्रत्येक वेळी वेगळ्या प्रकारानं गाता. तुमच्या जीवनाचा रंग बदलतो.
In reply to जगायचं तर पैसा लागतोच, निदान २ वेळच्या जेवणाचा तरी by संजय क्षीरसागर
चौकट लंघन म्हणजे मनस्वितेनं जगणं, उत्सफूर्ततेनं जगणं.
कसं काय ब्वॉ? मनस्वितेनं जगण्यासाठी चौकट लंघन करण्याची काय गरज आहे?
In reply to जगायचं तर पैसा लागतोच, निदान २ वेळच्या जेवणाचा तरी by संजय क्षीरसागर
मन (किंवा विचार) आपल्याला सतत `चालू काम कसं व्यर्थ आहे' हे सांगण्याचा प्रयत्न करतं मग आपण त्याप्रती बेफिकीर होतो. हे दुर्लक्ष त्या कामातली मजा कमी करत जातं.अतिशय चुक. केवळ अन केवळ ओब्लिगेशनच कामातलि मजा कमि करतं जात, म्हणूनच आवडत्या कंपनित लागलेल्या जॉबचा पहिला दिवस जितका आनंददायी अन उत्साहदायि असतो तितका सहावा महिना असेलच असे नाही भलेही कंपनी पगार/ जॉब प्रोफाइल बदलला नसेल, पण आता तुम्ही तुमच्यासाठी जॉब, पण काम मात्र कंपनीसाठि करत असता, पण सुरुवातिला जॉब अन काम दोन्हि स्वतःसाठी असते. अलमोस्ट विदाउट ओब्लिगेशन. ठिक आहे मग या प्रक्रियेचा सारांश काय ? तो हाच की ज्या कामात तुम्हि विलिंगफुली एंटर-एग्झिट घेउ शकता फक्त तेच काम आनंददायी असतं. उदाहरणार्थ :- तुमच्या बर्याच चुका दाखवुनही तुम्ही चुकिचे लेखन/धागे/प्रतिक्रिया का देताय ? उत्तर अतिशय सोपय तुमची मर्जी. तुम्हि तुम्हाला हव ते, हव तेव्हां लिहु शकता/थांबवु शकता थोडक्यात तुमच लेखन तुम्हि विलिंगफुली एंटर-एग्झिट करु शकता. तुमच्यावर ओब्लिगेशन/सक्ति/जबाबदारी नाही कि तुम्ही रोज अमुक अमुक उतारे मिपावर छापलेच पाहिजेत/ सर्व काही योग्य व त्रुटिरहीतच लिहलं पाहिजे. सगळ्याच्या सगळ्या प्रतिक्रियांना उत्तर दिलेच पाहिजे. आता क्लॅरिटी आलि काय, की पावलापावलाला त्रुटि दाखवुनही तुम्ही लेखन एंजॉय का करताय ते ? व म्हणूनच तुम्ही लेखन करणे थांबवणारही नाही. हे सगळ `चालू काम कसं व्यर्थ आहे' वगैरे फंडे लिहले आहेत त्या संदर्भात आहे बरका. बर इतपत तुम्हाला मन कस काम करत याच आकल झालं असेल तर "कामातली मजा कमी होणे" संदर्भात पुढचा निरीक्षण सामजावतो. यालाच म्हणतात मेंटेनिंग चॅलेंज अन स्किल्स रेशो. म्हणजे काय तर आपण एखाद्या कामात निपुण होत गेलो पण पुरेस चॅलेंज वाढत गेलं नाही तरी कामाचा कंटाळा येतो. ह्या उलट निपुणता निर्माण झालि नाही पण चॅलेंज वाढत गेलं तर कामाचे फ्रस्ट्रेशन येत. तेव्हां हि गोश्ट काम करताना फार व्यवस्थित सांभाळावी लागते. अन्यथा बट्याभोळ होतो :)
In reply to मन (किंवा विचार) आपल्याला सतत by अग्निकोल्हा
In reply to मन (किंवा विचार) आपल्याला सतत by अग्निकोल्हा
तुमच्या बर्याच चुका दाखवुनही तुम्ही चुकिचे लेखन/धागे/प्रतिक्रिया का देताय ? उत्तर अतिशय सोपय तुमची मर्जी. तुम्हि तुम्हाला हव ते, हव तेव्हां लिहु शकता/थांबवु शकता थोडक्यात तुमच लेखन तुम्हि विलिंगफुली एंटर-एग्झिट करु शकता. तुमच्यावर ओब्लिगेशन/सक्ति/जबाबदारी नाही कि तुम्ही रोज अमुक अमुक उतारे मिपावर छापलेच पाहिजेत/ सर्व काही योग्य व त्रुटिरहीतच लिहलं पाहिजे. सगळ्याच्या सगळ्या प्रतिक्रियांना उत्तर दिलेच पाहिजे. आता क्लॅरिटी आलि काय, की पावलापावलाला त्रुटि दाखवुनही तुम्ही लेखन एंजॉय का करताय ते ? व म्हणूनच तुम्ही लेखन करणे थांबवणारही नाही. हे सगळ `चालू काम कसं व्यर्थ आहे' वगैरे फंडे लिहले आहेत त्या संदर्भात आहे बरका.हीच फटाक्यांचीं माळ ज्याबद्दल भाग एक मध्ये बोलणे झाले होते. ह्यामागची 'संवेदना' काय हे तुम्हाला जाणवले की त्यातली निरर्थकता तुमच्या ध्यानात यावी. मग त्यातुन तुम्हाला 'रुणझुण' हा नाद नक्कीच ऐकू येईल. - (भ्रमर) सोकाजी
In reply to मन (किंवा विचार) आपल्याला सतत by अग्निकोल्हा
ठिक आहे मग या प्रक्रियेचा सारांश काय ? तो हाच की ज्या कामात तुम्हि विलिंगफुली एंटर-एग्झिट घेउ शकता फक्त तेच काम आनंददायी असतं. अवांतरः अतिशय अश्लिल प्रतिसाद! ;) - (अश्लिल) सोकाजी
In reply to ठ्ठो! by सोत्रि
In reply to मन (किंवा विचार) आपल्याला सतत by अग्निकोल्हा
In reply to जगायचं तर पैसा लागतोच, निदान २ वेळच्या जेवणाचा तरी by संजय क्षीरसागर
एकदा कामात मजा आली की आपण सृजनात्मक होतो. आपल्या जीवनातला तोचतोपणा संपतो, आपण काम विविध पद्धतीनं करायला लागतो. त्यातनं नव्या गोष्टींचा उलगडा व्हायला लागतो, नव्या संधी उपलब्ध होतात. ते शास्त्रिय संगीतासारखं होतं, राग यमनच असतो पण कुमार गंधर्व म्हणतात तसं तुम्ही तो प्रत्येक वेळी वेगळ्या प्रकारानं गाता. तुमच्या जीवनाचा रंग बदलतो.ह्म्म्म्म
In reply to जगायचं तर पैसा लागतोच, निदान २ वेळच्या जेवणाचा तरी by संजय क्षीरसागर
२) मन (किंवा विचार) आपल्याला सतत `चालू काम कसं व्यर्थ आहे' हे सांगण्याचा प्रयत्न करतं मग आपण त्याप्रती बेफिकीर होतो. हे दुर्लक्ष त्या कामातली मजा कमी करत जातं.(तुम्ही इतक्या चटकन कबूल होणार नाही पण पुन्हा पाहा : वैवाहिक नातं!) >त्यातिल निपुणता त्यातिल आव्हानाच्या सम-प्रमाणात वाढत राहिली तर ते काम करायचा कंटाळा जन्मोजन्मिही येणार नाही, व ते तसच घडत राहिल. = शांतपणे वाचलं तर कळेल की हेच मी पहिल्या प्रतिसादात सांगितलंय
एकदा कामात मजा आली की आपण सृजनात्मक होतो. आपल्या जीवनातला तोचतोपणा संपतो, आपण काम विविध पद्धतीनं करायला लागतो. त्यातनं नव्या गोष्टींचा उलगडा व्हायला लागतो, नव्या संधी उपलब्ध होतात. ते शास्त्रिय संगीतासारखं होतं, राग यमनच असतो पण कुमार गंधर्व म्हणतात तसं तुम्ही तो प्रत्येक वेळी वेगळ्या प्रकारानं गाता. तुमच्या जीवनाचा रंग बदलतो.प्रतिसादकानं शेवटी म्हटलंय
म्हणजे काय तर आपण एखाद्या कामात निपुण होत गेलो पण पुरेस चॅलेंज वाढत गेलं नाही तरी कामाचा कंटाळा येतो. ह्या उलट निपुणता निर्माण झालि नाही पण चॅलेंज वाढत गेलं तर कामाचे फ्रस्ट्रेशन येत.चायलेंज तुम्ही निर्माण करता आणि तो निर्माण होण्याचं बेसिक सूत्र: `आहे त्या कामात मला मजा का येत नाही' याचा सखोल मागोवा घेणं! ( वैवाहिक नातं लगेच बदलण्याचा आतातायीपणा करण्यापूर्वी नक्की कुठे जुळवायला हवं याचा वेध घेणं जसं सूज्ञपणाचं आहे तसं आहे ते). तुम्हाला खरं तर तुमच्या मनाविरूद्ध जाऊन एकच निर्णय घ्यायचा आहे : `जे आहे त्याचा बेशर्त स्विकार' आणि तोच खरा चायलेंज आहे. यानंतरच्या सगळ्या पायर्या आपसूक आहेत याची मी तुम्हाला स्वतःच्या अनुभवानं ग्वाही देतो. तुम्ही कार्यनिपुण होताच होता, संशोधक देखील होता, तुमचा काम करण्याचा ढंग इतरांपेक्षा वेगळा होतो. प्रत्येक कामावर तुमची मोहोर उमटते. प्रत्येक काम, प्रत्येक दिवस आनंदाचा होतो.
In reply to काही सार्थ आणि काही व्यर्थ प्रतिसाद आले आहेत! by संजय क्षीरसागर
तुम्ही कार्यनिपुण होताच होता, संशोधक देखील होता, तुमचा काम करण्याचा ढंग इतरांपेक्षा वेगळा होतो. प्रत्येक कामावर तुमची मोहोर उमटते. प्रत्येक काम, प्रत्येक दिवस आनंदाचा होतो.जियो! __/\__ - (कार्यनिपुण) सोकाजी
In reply to तुम्ही कधी अत्यंत सखोल विचार करून पाहा by संजय क्षीरसागर
In reply to संक्षी - वर व्यक्त केलेल्या by मोदक
In reply to तर काय... by अर्धवटराव
तुम्हाला खरं तर तुमच्या मनाविरूद्ध जाऊन एकच निर्णय घ्यायचा आहे : `जे आहे त्याचा बेशर्त स्विकार' आणि तोच खरा चायलेंज आहे.हिच तर खरि मेख आहे. सगळ्यात भ्रामक गोश्ट हि आहे कि एखादी गोश्ट बेशर्त स्विकारली आहे हे मानणे. हा अनुभव वा प्रक्रियाच मुळात एक कर्मठ सशर्त स्थिती आहे. आणि ति जर तशी सशर्त स्थिती /प्रक्रिया नसेल तर मुळात "स्विकार करणे" हि प्रोसेसच उरणार नाही, जि खरि मुक्ति असेल (मनोव्यापारातुन वगैरे वगैरे वगैरे).
In reply to तुम्हाला खरं तर तुमच्या by अग्निकोल्हा
सगळ्यात भ्रामक गोश्ट हि आहे कि एखादी गोश्ट बेशर्त स्विकारली आहे हे मानणे.यात भ्रम कुठे आहे? प्राप्त परिस्थिती स्विकारण्याचा निर्णय घेतला, पुन्हा त्यावर वैचारिक उहापोह नाही असं मनाला बजावलं, आपण कामाला लागलो, विषय संपला!
हा अनुभव वा प्रक्रियाच मुळात एक कर्मठ सशर्त स्थिती आहे.नाही. ते स्वतःच्या निर्णयावर विश्वास असण्याचं द्योतक आहे.
आणि ति जर तशी सशर्त स्थिती /प्रक्रिया नसेल तर मुळात "स्विकार करणे" हि प्रोसेसच उरणार नाही, जि खरि मुक्ति असेल (मनोव्यापारातुन वगैरे वगैरे वगैरे).स्विकार ही सशर्त स्थिती नाही. एका क्षणात मनाचं `मेंटल शटलींग' थांबवून निर्णय स्वाधिन करण्याचा तो सर्वोत्तम उपाय आहे. ती अत्यंत निर्णयात्मक स्थिती आहे. `आय हॅव अॅक्सेप्टेड माय वर्क अँड आय वील ब्रींग कलर्स टू इट' असा कमालीचा कॉन्फिडन्स आहे. अर्थात ते करायला स्वतःवर विश्वास हवा किंवा आपल्या कामात आपल्याला मजा येत नाही हे कबूल करण्याचा प्रामाणिकपणा तरी हवा.
In reply to मला लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीचं नेहेमी आश्चर्य वाटतं by संजय क्षीरसागर
यात भ्रम कुठे आहे? प्राप्त परिस्थिती स्विकारण्याचा निर्णय घेतला, पुन्हा त्यावर वैचारिक उहापोह नाही असं मनाला बजावलं, आपण कामाला लागलो, विषय संपला!हे असलं बजावणे अन कामाला लागणे याला तुम्हि बेशर्तपणा म्हणता ?
नाही. ते स्वतःच्या निर्णयावर विश्वास असण्याचं द्योतक आहे.नाहि तो स्वतःच्या निर्णयावर अढळ रहायचा अट्टहास आहे. यातली कोणतिच गोश्ट बेशर्त नाही. पुरेसा विरोधि रेटा निर्माण झाल्यास हा अट्टहास फाजिलही ठरु शकतो. अर्थात त्यावेळी माझि मर्जी म्हणत पळ काढुन दुसरा अट्टहास जवळ करायचा मार्ग जो आपण सुचवला आहे तो कोणत्याही प्रकारे स्वतःच्या निर्णयावर विश्वास असण्याचं द्योतक दाखवत नाही.
स्विकार ही सशर्त स्थिती नाही. एका क्षणात मनाचं `मेंटल शटलींग' थांबवून निर्णय स्वाधिन करण्याचा तो सर्वोत्तम उपाय आहे. ती अत्यंत निर्णयात्मक स्थिती आहे. `आय हॅव अॅक्सेप्टेड माय वर्क अँड आय वील ब्रींग कलर्स टू इट' असा कमालीचा कॉन्फिडन्स आहे.कामाच्या ठिकाणी/ मनोव्यापाराच्या ठि़काणी स्किल्स, चॅलेंज व ऑब्लिगेशनचा रेशो व्यवस्थित संभाळा हा एकमेव दिर्घकाळ आनंदाने कार्यरत राहण्याचा राजमार्गे आहे. यु डोन निड टु गिव अ डाइम अबॉट ब्रिंगिंग कलर्स टु इट, यु विल एंजॉय व्हटेवर कलर्स इट हॅज आलरेडी गाट. दॅट्स व्हॉट रिअल अक्सेप्टन्स इज आल अबॉउट.
अर्थात ते करायला स्वतःवर विश्वास हवा किंवा आपल्या कामात आपल्याला मजा येत नाही हे कबूल करण्याचा प्रामाणिकपणा तरी हवा.ख्खिक्क! कोण माणूस कामात मजा येत नसताना मजा येतेय अस मानुन जगत असतो ? राहिलि गोश्ट विश्वासाचि यु डोंट निड इट अॅट ऑल.
In reply to यात भ्रम कुठे आहे? प्राप्त by अग्निकोल्हा
केवळ अन केवळ ओब्लिगेशनच कामातलि मजा कमि करतं जात, म्हणूनच आवडत्या कंपनित लागलेल्या जॉबचा पहिला दिवस जितका आनंददायी अन उत्साहदायि असतो तितका सहावा महिना असेलच असे नाही भलेही कंपनी पगार/ जॉब प्रोफाइल बदलला नसेल, पण आता तुम्ही तुमच्यासाठी जॉब, पण काम मात्र कंपनीसाठि करत असता, पण सुरुवातिला जॉब अन काम दोन्हि स्वतःसाठी असते. अलमोस्ट विदाउट ओब्लिगेशन.आणि मी म्हणतो `आहे त्या कामाचा अस्विकार हेच बंधन आहे' तुम्ही पुढे काय लिहीलंय त्याला काही एक अर्थ नाही कारण तुमच्या विचारसरणीनं गेलं तर दर सहा महिन्याला नोकरी बदलण्याचा प्रसंग येत राहील. पुढे तर त्याहून गोंधळ आहे :
आता तुम्ही तुमच्यासाठी जॉब, पण काम मात्र कंपनीसाठि करत असता, पण सुरुवातिला जॉब अन काम दोन्हि स्वतःसाठी असते. अलमोस्ट विदाउट ओब्लिगेश`जॉब आणि काम यातला फरक' असा गोंधळ होतो का दर सहा महिन्यानी? वरच्या प्रतिसादात शेवटी म्हटलंय :
कोण माणूस कामात मजा येत नसताना मजा येतेय अस मानुन जगत असतो ?= तुमच्या कामात मजा येण्यासाठी शर्ती किती आहेत ते पाहा म्हणजे मजा येतीये किंवा नाही ते कळेल : १ ) स्किल्स, चॅलेंज व ऑब्लिगेशनचा रेशो व्यवस्थित संभाळा २) ठिक आहे मग या प्रक्रियेचा सारांश काय ? तो हाच की ज्या कामात तुम्हि विलिंगफुली एंटर-एग्झिट घेउ शकता फक्त तेच काम आनंददायी असतं. आता दुसरी शर्त पूर्ण व्हायला तर फक्त एकच अट आहे : ज्या कंपनीत तुम्ही नोकरी करता ती सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून हवी आणि तीनं कर्मपूर्तीसाठी तुमच्या एंट्री आणि इग्झिटची वाट बघावी!
In reply to तुम्ही तुमचा पहिल्या प्रतिसादातला बेसिक मुद्दाच विसरलात! by संजय क्षीरसागर
In reply to तुम्हाला खरं तर तुमच्या by अग्निकोल्हा
एक हरी आत्मा जीव शिव सम । वाया दुर्गमी न घाली मन ॥ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥
तुमच्या कामात मजा येण्यासाठी शर्ती किती आहेत ते पाहा म्हणजे मजा येतीये किंवा नाही ते कळेल :त्या शर्ति पाळा अन करत असलेल्या कामाचा लुफ्त उठवा. कारण मि बेशर्तपणाचा ना फसवा भ्रम निर्माण करतोय ना दुसर्यांना त्याला बळि पडायला भाग पाडतोय. त्यामुळे व्हॉट डु वि क्नो अँड व्हॉट हॅव वि लर्न अबॉट वर्क/प्रोसेस हॅपिनेस इज= १ ) स्किल्स, चॅलेंज व ऑब्लिगेशनचा रेशो व्यवस्थित संभाळा - स्किल्सेटच्या प्रमाणातच चॅलेंजही वाढवा, हे बिघडल तर फ्रेस्ट्रेशन अथवा बोअरड्म (भयानकही) उसळेल, व ऑब्लिगेशन्स रिड्युस करत चला... म्हणजेच कामाचा/प्रक्रियेचा कंटाळा कधिच येणार नाही. व ऑब्लिगेशन्सच्या लयसोबत मुक्तिचा मार्ग मोकळा होइल :) २) ज्या कामात तुम्हि विलिंगफुली एंटर-एग्झिट घेउ शकता फक्त तेच काम आनंददायी असतं. - बरोबर. जेव्हां पाहिजे तेव्हां काम केलं, अन नको असेल तर नाहि केल केवळ हेच सर्वात आनंददायि असतं. समरसुन केलेलं असतं पण हाय रे दैवा.. आफ्टर अॅल हॅपिनेस इज नॉट एव्हरिथिंग जबाबदारि,गरज, निकड या आवश्यक गोश्टि सुध्दा प्रक्रिया/काम करायला भाग पाडतात अशावेळी समजा विलिंगफुली एंटर-एग्झिट शक्य नसेलही पण काम करताना स्किल्स, चॅलेंज व ऑब्लिगेशनचा रेशो व्यवस्थित संभाळणे हमखास उपयोगि पडुन आनंद निर्माण करतो.
In reply to तुमच्या कामात मजा येण्यासाठी by अग्निकोल्हा
पण हाय रे दैवा.. आफ्टर अॅल हॅपिनेस इज नॉट एव्हरिथिंग जबाबदारि,गरज, निकड या आवश्यक गोश्टि सुध्दा प्रक्रिया/काम करायला भाग पाडतातम्हणजे तुमच्या
विलफुल एंट्री आणि इग्झिटया कामात आनंद देणार्या महत्त्वाच्या शर्तीची पहिल्यांदाच वाट लागली! तुम्ही कारणं काहीही सांगा, आहे ती नोकरी बंधन झालं. आता दुसरी शर्त :
स्किल्सेटच्या प्रमाणातच चॅलेंजही वाढवाम्हणजे: एकतर कंपनीनं कर्मपूर्तीसाठी तुमच्या एंट्री आणि इग्झिटची वाट बघायची. परत तुमच्या म्हणण्याप्रमाणे फक्त पहिल्या दिवशी तुम्ही आनंदात असणार कारण
" सुरुवातिला जॉब अन काम दोन्हि स्वतःसाठी असते."यानंतर तुम्ही म्हटलंय तशी मानसिक कोलांटी उडी
("पण आता तुम्ही तुमच्यासाठी जॉब, पण काम मात्र कंपनीसाठि करत असता")दुसरा दिवस ते सहामहिने या कालावधित केव्हाही बसू शकते. तसं होऊ नये कारण त्यामुळे तुमचं
फ्रेस्ट्रेशन अथवा बोअरड्म (भयानकही) उसळेल"या भीतीनं कंपनीनं तुमच्या स्किलसेटसच्या प्रमाणात तुम्हाला चायलेंजेसही प्रोवाइड करायचे (थोडक्यात तुम्ही फ्रस्टेट किंवा बोअर होऊ नये म्हणून तुम्हाला दर चारसहा महिन्याला प्रमोट करत राहायच ) आणि दरम्यानच्या काळात तुमचा सल्ला काय तर
"ऑब्लिगेशन्स रिड्युस करत चला"(थोडक्यात कंपनीला केव्हाही टांग मारता येईल अशी परिस्थिती निर्माण करा!) शाब्बास!
In reply to आता कसे लाईनीत आलात! by संजय क्षीरसागर
ऑब्लिगेशन्सच्या लयसोबत मुक्तिचा मार्ग मोकळा होइल smileyनक्कीच होईल, पण नोकरीतनं मुक्त होऊन घरी जायचा!
In reply to तुम्हाला एक सांगावसं वाटतं, by संजय क्षीरसागर
In reply to हा प्रतिसाद लिहुन समाधान झालं असेल तर.. by अग्निकोल्हा
In reply to मी आवांतर लिहीतोय? by संजय क्षीरसागर
तुमच्या प्रतिसादाला दिलेली उत्तरं वाचा आणि त्यामागे पुढे आलेले इतर सदस्यांचे प्रतिसाद पाहा. काय लिहीलंय त्याचा तुम्हाला अंदाज येईल.शब्द शब्द अन शब्द पोकळता. काय हो तुमच्या त्या प्रक्रिया/अनुभव वगैरे वगैरे मी तुम्हाला ठेवेन त्या परिस्थितीत तुम्हाला चिदानंदि वगैरे वगैरे ठेवु शकतिल काय ? आहे का वास्तवाला सामोरे जायची तयारी ? असेल तर तयार व्हा, नायतर सर्वांना स्पश्ट करा कि तुमचे लिखाणे हे निव्वळ "साहित्य" आहे, वास्तव न्हवे.
In reply to सोबत इतरांची कशाला फरफट करताय ? by अग्निकोल्हा
In reply to मी आहे त्या परिस्थितीत मजेत आहे आणि वास्तविकातच जगतोय by संजय क्षीरसागर
जीवनाच्या रथाचं सारथ्य अर्जुनाकडे आहे,असं कुठे वाचलं नाही कधी. कदाचित माझा अभ्यास कमी असेल. पण उदाहरण म्हणूनही हे पटलं नाही.
In reply to एक नम्र शंका by पैसा
In reply to शब्द.. by प्रभाकर पेठकर
In reply to त्याचं कसं आहे पेठकर, by संजय क्षीरसागर
ज्याला समजत नाही तो शब्दांची माळ लावतो इतकाच फरक आहे.मग कशाला लावताय उगी शब्दांची माळ?
In reply to भारंभार शब्दच नुसते. by प्रभाकर पेठकर
In reply to गुरुदेव म्हणाले: by विजुभाऊ
In reply to काय ते ठरलं का शेवटी by कवितानागेश
अगडम् बगडम् बम् चिकी बम् गोलगोल फुग्याचा लाललाल गोलहे काय आहे ?
In reply to अगडम् बगडम् बम् चिकी बम् by अग्निकोल्हा
In reply to काय ते ठरलं का शेवटी by कवितानागेश
की आधी स्वेच्छेनी जगायचं आणि लोकांनी फटके दिले की मग मुकाट्यानी सगळं स्विकारुन जगायचं? की ................. जगा! कसे?अरे बापरे! हे एवढं अवघड आहे ठरवणं? हा The Paradox of Choiceआहे काय? मॅट्रिक्स मध्ये निओ किंवा (आणि कोणीतरी) म्हणतो तेच खरं असावं Man cannot go beyond his choices! ;)
जाणीव हा आपला अस्तित्वाशी