मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अननसाचा मुरांबा

टक्कू · · पाककृती
चिकू,संत्र,मोसंब,द्राक्ष या फळांपेक्षा हटके दिसणारं चवीला आंबट गोड पण मधूनच खाजर असं फळ; अननस! मला कायम या फळाविषयी वेगळंच आकर्षण वाटतं. मुळात शेतामधला त्याचा look खूप attractive असतो. अख्ख्या झुडपाच्या बरोबर मध्ये अननस उगवतो. बऱ्याच जणांना त्याच्या खाजऱ्या चवीमुळे तो आवडत नाही. लहानपणी अननस पाहून नाक मुरडलं तर तो खाण्याचा एक फायदा हमखास कानावर पडे. तो म्हणजे असा की अननस खाल्याने पोटात केस वगैरे गेला असेल तर तो विरघळून जातो. दक्षिण अमेरिकेमध्ये जन्मलेलं हे फळ कित्तीतरी juices, mocktails मध्ये सर्रास वापरलं जातं. आपण सुद्धा अननसाचा रायता, हलवा किंवा cake, jam, मुरांबे असे विविध पदार्थ करतो. Pineapple raita म्हणजे तर माझ्या college group चा weak point होता. Party कुणाचीही असो हि dish order झालीच पाहिजे. तर आज pineapple, म्हणजेच, अननसाचा मुरांबा मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. झटपट होणारा असा हा गोड गोड अननसाचा मुरांबा :) साहित्य: १ वाटी अननसाचे काप ३/४ वाटी साखर १ चिमूट citric acid कृती: १. प्रथम एका भांड्यामध्ये अननसाचे तुकडे घ्यावेत व cooker मध्ये एक शिट्टी काढून वाफवावेत. २. एका पातेलीत साखर भिजेल इतके पाणी घ्यावे व त्याचा पक्का पाक करावा. साधारण मधाएवढा घट्ट झाला पाहिजे. ३. नंतर त्या पाकात citric acid घालावे. वाफवून घेतलेल्या फोडी घालून ढवळावे. फोडी घातल्यानंतर त्यातील पाण्याच्या अंशामुळे पाक थोडा पांतळ होईल. हे मिश्रण gas वर ठेवून परत घट्ट होईपर्यंत उकळवावे. काही महत्वाचे: १. मुरांबा गार झाल्यावर घट्ट होतो त्यामुळे उकळवताना त्यानुसार पांतळ ठेवावा. २. हा मुरांबा जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे तो कमी प्रमाणात करावा. तसेच हा मुरांबा fridge मध्येच ठेवावा. ३ . याला पूर्णपणे pineaaple चा flavour ठेवण्यासाठी यात वेलची, केशर घातलेले नाही. 1 2 3 4 5 6 7

वाचने 7207 वाचनखूण प्रतिक्रिया 21

प्रभाकर पेठकर 06/07/2013 - 11:01
साखर त्याज्य असल्याने पास. परंतु, साध्या, सोप्या पाककृतीतून निर्मिलेल्या आकर्षक अननस मुरंब्याला मानाचा मुजरा.

दिपक.कुवेत 06/07/2013 - 11:40
मस्त दिसतोय मुरांबा. करुन बघायला हवा.

पैसा 06/07/2013 - 17:01
पाकृ आणि फोटो अतिशय सुंदर आलेत!

स्पंदना 07/07/2013 - 13:49
मस्त! मला अननसाची चव आवडते, करुन पाहुया.

सानिकास्वप्निल 07/07/2013 - 23:53
अननसाचा मुरांबा आवडला :)

कवितानागेश 08/07/2013 - 12:59
अननस इतकं कूकरमध्ये वाफवायचे गरज वाटत नाही.पण साखर घालण्याआधी शिजणं आवश्यकच होतं. नाहीतर कडक होतात फोडी. मी यात दालचिनी घालते फ्लेवरसाठी.

सविता००१ 08/07/2013 - 15:28
इतका म्हणजे इतका मस्त लागतो की काय सांगू.............. बेष्ट्म बेष्ट. :)

In reply to by अनन्न्या

टक्कू 10/07/2013 - 20:50
अनन्न्या: citric acid दोन कारणांसाठी घातले आहे. थोडी आंबट चव येण्यासाठी व preservative म्हणून देखील! - टक्कू http://takkuuu.blogspot.com

टक्कू 10/07/2013 - 20:45
सर्व मिपाकरांचे मनापासून धन्यवाद :) शिल्पा ब: तुम्ही फोटु या धाग्यावर बघा http://takkuuu.blogspot.com - टक्कू

नक्शत्त्रा 11/07/2013 - 11:46
टक्कू ....एक नमबर.. करेन मि लवकरच.मस्त लागतो ना..... grated pineapple वापरले तर चालेल का?

In reply to by नक्शत्त्रा

टक्कू 11/07/2013 - 22:10
किसलेला पण चालेल..कदाचित mouth filling वाटणार नाही पण चव मस्त च येईल :)

मदनबाण 06/04/2015 - 11:19
मस्त... पण फोटू का बरं नाय दिसत मला ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Cinema Choopistha Mava... ;) :- { Race Gurram }

सुनील 07/04/2015 - 08:51
मुरांबा म्हणजे मुरलेला/मुरवलेला आंबा ना? मग अननसाचा मुरांबा कसा असेल? त्याला मुराननस असे नाव द्यायला हवे!!