मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(कॅन्टीन कॅन्टीन...)

किसन शिंदे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
प्रेरणेचा स्त्रोत : आमच्या मित्राचा हा लेख! हाफिसच्या कॅन्टीनात मागच्याच आठवड्यात घडलेला एक किस्सा.. जेवता जेवता मध्येच एखाद्याने चमत्कारीक आवाज काढल्याने "तो मी नव्हेच" असे दाखवत इतरत्र बघत कसे तोंड लपवावे हे कळणार्‍या प्रसंगांपैकी एक प्रसंग.. दुपारचे जेवण सुरू होते.. माझ्या डब्यातील भाजी आणि आमच्या वडगाव बुद्रूकच्या हापिसातील एका दुसर्‍या सहकार्‍याची भाजी हि काही केल्या संपतच नव्हती... आणि अचानक 'टुर्रर्रऽऽऽ' असा बारीकसा पण बर्‍यापैकी ऐकायला जाईलसा आवाज आमच्या टेबलावर झाला.. कोणाकडून आला हे कळायचा मार्गच नव्हता.. शेवटी असा निष्कर्ष निघाला की "आवाज आमच्या टेबलावरचा नसून बाजूच्या टेबलावरचा असावा.. अचानक आमचा नर्‍या वदला... आय डोण्ट नो दॅट हू ईज फार्ट ऑन द टेबल, मे बी ईट इज A, ऑर मे बी ईट इज B! बट व्हाय डोण्ट यु गाइज युज वॉशरूम्स बिफोर स्टार्टिंग वर्क इन द मॉर्निंग..? इट शुड बी युस्ड..यू नो.. आम्ही सर्वजण नाक दाबतच चेहर्‍यावर काय काय भाव दर्शविले असावेत देव जाणे!! :D

वाचने 4400 वाचनखूण प्रतिक्रिया 16

प्रचेतस Sun, 06/30/2013 - 21:23
अगगगगगागगगा. बाकी मित्र मात्र बरोबर शिंव्हगड रोड, वडगाव बुद्रुकचा शोधून काढलात बरे. हा असिंरोधाव्हावामा संघटनेचा सभासद तर नव्हे?

In reply to by प्रचेतस

मोदक Sun, 06/30/2013 - 21:41
बाकी मित्र मात्र बरोबर शिंव्हगड रोड, वडगाव बुद्रुकचा शोधून काढलात बरे. हा असिंरोधाव्हावामा संघटनेचा सभासद तर नव्हे? ओ बुवा.. हे तुम्हाला उद्देशून आहे का..? ;-)

In reply to by मोदक

किसन शिंदे Sun, 06/30/2013 - 21:49
ओ बुवा.. हे तुम्हाला उद्देशून आहे का..?
हे बुवांना उद्देशून मुळीच नाही. त्यांच्याबद्दल आमच्या मनात नित्तांत आदर आहे. :)

प्यारे१ Sun, 06/30/2013 - 23:28
हा लेख मूळचा दुसर्‍याच कुणी लिहून किस्नाच्या नावावर खपवला असावा आहे विशेष सूत्रांकडून समजते. (इथे खरा प्रेरणास्त्रोत म्हत्त्वाचा आहे ;) ) अन्यथा किस्नाची प्रतिभा येवडी 'हुच्च' नाही असे णमूद करतो. - अंदाजपंचे दाहोदरसे प्यारे ;)

अभ्या.. Tue, 07/02/2013 - 01:51
प्रायोजित फालतूपणाचा णिशेढ. :( :( :( मेनूची पट्टी दोन दिवस काळ्या रंगाची करण्यात यावी.