युग
लेखनविषय:
मी हे लिहून काढतो
मग ते लिहितो ,मग आणखीन ते ..
त्या त्या क्षणाचे , वर्षांचे ,जन्मान्मांचे संदर्भ !
कधी कधी शब्द फारच पोचट वाटू लागतात ,
मग मी कागद चुरगाळून फेकून देतो
असेलही कदाचित त्या चुरगाळून गेलेल्या ओळींत
एखादा निखाऱ्यासारखा जळजळीत शब्द,
मनाचा एखादा कापून काढलेला तुकडा
एखादा वाळवंटासारखा तप्त अश्रू
आणि तुझ्या आठवणीत वाहून गेलेले कदाचित एखादे युग .. !
वाचने
1306
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
कविता चांगली आहे
sahich!! mast lihile aahe..
खूप छान!
@पैसा, निनाव , अतृप्त आत्मा