मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सौदि अरेबियातली बर्फवृष्टी...

डॉ सुहास म्हात्रे · · कलादालन
अगोदर आपण सौदि अरेबियातले वाळूचे वादळ बघितले... ते जरी भयानक असले तरी अनाकलनीय नव्हते. ते बर्‍याच जणाना आवडले असे दिसले. म्हणून आता एक धक्का अजून द्यावा म्हणतो... ही पहा सौदि अरेबियातली बर्फवृष्टी...  .  .  .  .  .  दर वर्षी नाही, पण गेल्या सात वर्षांत चारदा तरी सौदी अरेबियाच्या उत्तर भागात बर्फवृष्टी झाली आहे.

वाचने 42559 वाचनखूण प्रतिक्रिया 38

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन 26/06/2013 - 18:06
आयमाय स्वारी. उत्तर भाग असे लिहिलेय ते बघायचे राहून गेले. हां तर उत्तर भागात बर्फ पडतो तर इस्राएलमध्येही पडतो का? सिनाय वगैरे भागात पडतो की कसे?

In reply to by बॅटमॅन

सौदिच्या उत्तरेला असलेल्या जॉर्डन आणि इझ्राइलच्या डोंगराळ भागात दरवर्षी बर्फवृष्टी होते असे ऐकून आहे.

दिपक.कुवेत 26/06/2013 - 18:14
च्यायला ईथे कुवेत मधे नुसतच धुळिचं वादळ येत पण बर्फ काय दॄष्टिस पडत नाहि. थंडित क्वचीत गारा पडतात.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काकाकाकू 26/06/2013 - 21:01
पूर झाला. धुळीचं वाळवंट ऐकलं तरी होतं. पण गोट्यांएव्हढे दगड नी त्याचं एकंदरीत स्वरूप एव्हढं भयंकर असतं हे काहि माहित नव्हतं. आणि ते कमी म्हणून आता बर्फ!! सात वर्षात चारदा म्हणजे काहि दुर्मिळ नव्हे. विशेषतः सौदिमधे. आता पुढे काय? एक्कोजीराव, "सौदि अरेबियात एक चारशे वर्ष जुनं कपिलेश्वराचं मंदिर आहे त्याचे फोटो" वगैरे तत्सम काहि लिहिलंत तरी आश्चर्य नाहि वाटणार :-)

In reply to by काकाकाकू

सौदि अरेबियात एक चारशे वर्ष जुनं कपिलेश्वराचं मंदिर आहे त्याचे फोटो" वगैरे तत्सम काहि लिहिलंत तरी आश्चर्य नाहि वाटणार दक्षिणेत एक मैदान सालेह म्हणून जागा आहे. तेथे बर्‍यापैकी सुस्थितीत असलेली इस्लामपूर्व (इसविसनापूर्वीच्या पहिल्या शतकातील) नाबातियन संस्कृतील काही थडगी (tombs) आहेत...

भाते 26/06/2013 - 20:21
च्यामायला, मुंबईत यापैकी काहीच होत नाही. ना वाळूचे वादळ ना बर्फवृष्टी!

लाल टोपी 26/06/2013 - 21:21
अरेच्चा हे तर नवीनच प्रकरण आहे. असं काही घडलं आहे हे माहितच नव्हते. नविन माहिती बद्दल धन्यवाद

धमाल मुलगा 27/06/2013 - 00:47
हे सौदी जरा खुळ्या डोस्क्याचंच दिसतंय. मरणाचं ऊन असलेलं वाळवंट काय, त्यात वाळूची वादळं काय अन बर्फवृष्टी काय! औघड है ब्वॉ! आता कळलं, अरबं अशी येड्यासारखी का वागतात ते. :D

In reply to by धमाल मुलगा

प्यारे१ 27/06/2013 - 01:10
+१ ह्या असल्या टापूत राहणार्‍या लोकांसाठीच (ऑडियन्ससाठी) विशिष्ट पुस्तकात काही आज्ञा/ आचाराच्या पद्धती/ काही पेश्शल सवलती दिल्या गेल्या असाव्यात का?

जॅक डनियल्स 27/06/2013 - 04:44
झकास ! थंडी मध्ये सौदी लोकं स्वेटर कशी घालतात, याचा मी विचार करत होतो, फुल विनोदी दिसत असतील. माझ्या एका सौदी विद्यार्थ्यांला तुमचे फोटो दाखवले तर तो वेडाच झाला. त्याने मला एक अन एक अक्षर मला भाषांतर करायला लावले....कुठून दाखवले असे झाले...;)

स्पंदना 27/06/2013 - 07:22
काही माण्स भलती नशिबवान हो! इस्पिक एक्का त्यातलेच. सगळ भव्यदिव्य यांच्या नशिबी, अन आम्ही परड अन बाग यातच खुष! वाळुच वादळ पाहिलं, तिथे प्रतिसाद द्याय्चा राहुन गेला आता दोन्हीचा मिळ्युन एकत्र देते. अविश्वसनिय!! अचाट!

जिथे वाळूचे वादळ तिथेच बर्फवृष्टी का या दोन्ही प्रदेशांत खूप अंतर आहे?? पहिल्या काही फोटोंत वाटले पांढरी वाळू दाखवून तुम्ही आम्हाला फसवत आहात ;)

In reply to by तुमचा अभिषेक

मी टाकलेल्या फोटोंतल्या वाळूच्या वादळाच्या आणि बर्फवृष्टीच्या जागांत साधारण ८०० किमी अंतर आहे. पण दक्षिण सौदितल्या (फोटोतल्या वाळूच्या वादळाच्या जागेपासून १००-१५० किमी दक्षिणेस) ताईफ या समुद्रसपाटीपेक्षा १८८० मीटर ऊंच असलेल्या डोंगरावरच्या शहरात अत्युच्च ४० अंश सेल्सियस व अतीनीच -१ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे. सरासरी तापमान उच्च ३५ अंश व नीच ८ अंश सेल्सियस असते. तेथे बहुतेक दर वर्षी थोडेसे तरी बर्फ पडते असे 'ऐकून' आहे. हे ठिकाण पृथ्वीगोलावर अक्षांश बघितले तर अहमदाबाद आणि मुंबईच्यामधे येते !

चौकटराजा 27/06/2013 - 16:13
आपल्या देशात राजस्थानात काही ठिकाणी बर्फ पडते असे ऐकून आहे. ती दोन ठिकाणे म्हण्जे माउंट अबू व गुरूशिखर ( प भारतातील सरवोच्च जागा )

In reply to by चौकटराजा

राही 27/06/2013 - 17:11
आबूशिखरावरच्या नखी(नाक्की) तलावात पृष्ठभागावर पाव सेन्टिमीटर जाडीचा बर्फाचा पातळ थर पाहिला आहे. हिवाळ्यात राजस्थानात काही ठिकाणी काही वेळा शून्याखाली तीन अंश से. इतके तापमान असते. पण प्रत्येक वेळी बर्फवृष्टी किंवा पाणी गोठणे होतेच असे नाही. बर्फवृष्टी बहुधा होत नाही. सीमेवरच्या वाळवंटात (साम वगैरे) कडाक्याची थंडी असते.

In reply to by राही

सल्तनत ऑफ ओमान मधे मस्कतपासून १५० किमी वर जबल अख्दर (हरित पर्वत) नावाची पर्वतराजी आहे त्यांतील जबल शेख नावाच्या मुख्य गावांत बर्‍याचदा हिवाळ्यात चारचाकीच्या काचांवर रात्री पडलेल्या दवाचे सकाळपर्यंत बर्फ झालेले असते. तेथील हवामान वर्षभर थंड / खूप थंड असते आणि तेथे थंड प्रदेशातील फळांच्या (सफरचंद, पीच, प्लम, द्राक्षे, ई) व केशराच्या बागा आहेत. प्रसिद्ध मस्कती डाळिंबे तेथेच पिकतात... एका प्रजातीचे डाळींब एक ते दीड किलो वजन भरेल इतके मोठे असू शकते.

In reply to by बॅटमॅन

मग उगाच का पेशवाईच्या मेजवानीत मस्कती डाळींबे खास समजली जात असत (असे कुठेतरी वाचलेले आठवते)? ही डाळींबे चविला एकदम मस्त व मउ बियांची असतात, खाताना बिया दाताखाली अजिबात कचकचत नाहीत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

राही 30/06/2013 - 17:00
अलीफ डाळिंब वा(ह) डाळिंब ! (डाळिंबाला अनार फारसीमध्ये म्हणतात की अरबीमध्यी? की दोन्हीमध्ये? की दोन्हीमध्ये आणखी वेगळाच शब्द आहे?)