नभईर्षा

अज्ञातकुल जे न देखे रवी...
पावसाची चाहूल आली आणि जमीनीतल्या उधईला पंख फुटले. सोहळा झाला पण कळा अवकळा झाली. .......... कोण चाहुली उलगडले गड अंधारातिल वेणा अवघड वारुळातले फुटले घट अन प्रकाशात पडझडली झुंबड क्षणभंगुर भिरभिर भर अंगण उडे पाकळी पर तिज आंदण नभईर्षेचे सोस सकस पण जड झाले पंखांचे जोखड बळ खळले गळले विरघळले स्वप्नखळे वाटेतच विरले सुटली जागा जाग जागली विद्ध कलेवर पाठी उरले ........................अज्ञात
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

6 टिप्पण्या 1,787 दृश्ये

Comments

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

अहाहा...! सुंदर.. (पण उधई म्हणजे वाळवी तिला पंख कसे फुटेल. पंख फुटणारे ते वेगळे मुंगळे) -दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

In reply to by गणपा

माहितीपूर्ण चित्र डकवल्याबद्दल आभार. पण, लाकडं कुजवणारे पिवळे धमक असतात तीच जर उधई असेल तिला पंख फुटलेले मी पाहिलेले नाही. पण आता उधई म्हणजे वाळवीच असते किंवा नसते याबद्दल जर कोणी माहिती सांगितली तर समजून घ्यायला आवडेल. -दिलीप बिरुटे

स्पंदना नवीन

हं! फारच छान. बाकी प्राडॉ उठुन सत्यात का शिरले ब्वा? कविता वेंजॉय माडी सर!