Skip to main content

उंदीर मांजराचा खाऊ

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 01/06/2013 या दिवशी प्रकाशित केले.
उंदीर मांजराचा खाऊ एकदा थंडी वाजते म्हणून एका माऊने केली गाऊ तेथला उंदीर मनात म्हणाला आता गुपचूप खाऊ खाऊ खाऊ होता माऊसमोर धीर केला उंदराने हळूच गेला चालत चालत मांजरीकडे पाहीले त्याने खाऊचा वास त्याने घेतला सुटले पाणी तोंडाला खाऊ न द्यायचा कोणाला विचार त्याच्या मनातला डोळे मिटून सताड पडली अंग चोरून मनी मिटक्या मारीत खायचा खाऊ उंदराने स्वप्न पाहीले मनी होती निसरडी घराची फरशी तीवरून त्याचा पाय सरकला आवाजाने माऊ जागी झाली आयता खाऊ तिला मिळाला - पाभे
लेखनविषय:

वाचने 3234
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

अरे व्वा! मस्त आहे बालगीत.

@होती निसरडी घराची फरशी तीवरून त्याचा पाय सरकला आवाजाने माऊ जागी झाली आयता खाऊ तिला मिळाला>>> http://cdn.content.sweetim.com/sim/cpie/emoticons/0002031F.gif

सतत टॉम अँड जेरी बघितल्यामुळे, शेवटची ओळ पटली नाही.

In reply to by तिमा

(अन मला वाटलेच होते की कुणालातरी टॉमजेरीची आठवण येईल ती.) टिव्हीचा परिणाम दुसरं काय? :-) ह.घ्या. तिमांना टॉम अ‍ॅन्ड जेरी मुळे शेवट आवडला नाही. त्यावर प्यारे१ यांनी खालचे कडवे लिहीले आहे: आयता खाऊ मला मिळाला वाटून माऊने आ पसरला उंदीर मोठा चलाख निघाला माऊच्या समोर नाचून पळाला. - प्यारे१

मस्त बालगीत.