मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बटाटा भाजी

आतिवास · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
पुन्याच्या आत्याला पोरगी न्हाय. आत्याची म्या लाडाची हाय. सुट्टीला पुन्याला नेनार म्हन्ली. म्या इचारलं, “हिकडं आंबे असत्यात, पुन्याला काय?” आत्या हसली. मंग हे ते लई सांगितलं तिनं. तरीबी म्या न्हाई म्हनून रायली. मंग आत्या म्हन्ली, “बटाट्याची भाजी देईन.” लई झ्याक बगा. आमच्या हित सोमेवाडीच्या बाजारात बटाटा न्हाई. फकस्त कांदे. म्या इचारलं, “रोज देशील?” हो म्हन्ली. मंग म्हैनाभर आत्याची पोरं मला पळवत होती. पानी दे, चा दे, हे दे, ते दे, याला बोलवून आन. म्या नाय म्हन्ली की फकस्त “बटाट्याची भाजी” म्हनत, की म्या लागलीच कामाला. त्या दिशी उटले झोपेतून तर आत्या पुन्याला गेलेली. आयनं बटाटा भाजी दिली. म्या नाय खाल्ली. *शतशब्दकथा

वाचने 13956 वाचनखूण प्रतिक्रिया 28

In reply to by बॅटमॅन

आतिवास Wed, 05/29/2013 - 13:26
परचक्र? हं! लंपनला जिलबीची आशा लावत बाजारभर नुसतेच फिरवून आणणारे ते गृहस्थ,(कुणीतरी अण्णा ?) :-( आठवले. ती गोष्ट आठवली पूर्ण!

ढब्बू पैसा Wed, 05/29/2013 - 11:40
तुझ्या कथांमध्ये एक काहीतरी किमया आहे. नेमकं काय आवडलं ते शब्दात सांगता येत नाही इतकं सटल आहे. पण हे साधेसे प्रसंग नक्कीच कुठेतरी/कधीतरी अनुभवलेले असतात आणि ते अधिक आवडून, स्पर्शून जातात. लिहीत रहा!

In reply to by मृत्युन्जय

तुमचा अभिषेक Wed, 05/29/2013 - 14:55
मला तर प्रत्येक वेळी काय प्रतिसादात लिहायचे याचाच प्रश्न पडतो.. उगाच तेच तेच लिहिल्याने आपलेच शब्ददारिद्र्य उघडे पडायचे !

त्या दिशी उटले झोपेतून तर आत्या पुन्याला गेलेली. हे आठ शब्द एका वेगळ्याच मनःस्थितीत भिरकावतात... आत्या आणि तिच्या पोरांना चांगलंच झोडपून काढायला पाहिजे असं वाटतं. साध्या आणि मोजक्याच शब्दात खूप काही सांगणार्‍यांचा नेहमीच हेवा वाटत आला आहे. शतशब्दकथा सांगण्यात एकदम शिरोमणी आहात, अतिवास !

चिगो Wed, 05/29/2013 - 20:25
तुमच्या शतशब्दकथेतलं नेमकं काय आवडतं, सांगता येत नाही.. पण प्रत्येक कथेत तुम्ही कथा-नायिका तिच्या भावनांसकट हुबेहूब डोळ्यांसमोर उभी करता.. मागे एकदा बोललो होतो तेच पुन्हा, "लोक वाडगंभर लिहून जे सांगू शकत नाही, ते तुम्ही मोजक्या (अक्षरशः)शब्दांत सांगता.."

निवांत पोपट Wed, 05/29/2013 - 23:07
ही शतशब्दकथा पण आवडली. 'हवे ते' मिळाले तरी 'हवे तेंव्हा' आणि 'हव्या त्या पध्दतीने' मिळतंच असं नाही.मोठ्यांना आपण दुखावले गेलोय हे स्पष्ट कळतं तरी, लहानग्यांना ते न कळता सुध्दा त्याला रिअ‍ॅक्ट कसं व्हायचं ते माहीत असतं ! तसे साम्य काहीच नाही पण गविसाहेबांचे "आईसक्रीमवाले गंदे अंकल" नंतर लागोपाठ "बटाटा भाजी" वाचताना काहीतरी जाणवलं..क्षीण का असेना बहूदा "अंडरकरंट" का काहीसे म्हणतात तो एकच असावा !

कवितानागेश गुरुवार, 05/30/2013 - 12:57
सुंदर कथा. या गोष्ट सांगणार्‍या लहान मुलीचे निष्पाप आणि हळ्वं मन नेहमीच प्रभावीपणे दिसतं तुमच्या लेखनात.