सत्याचा विजय - विज्ञान विरुद्ध श्रद्धा
In reply to वाचनीय by सुधीर
अच्छा, म्हणजे आता तुमची सत्याचीच व्याख्या वेगळी आहेसत्याची व्याख्या अध्यात्मिक भाषेत : अॅबसल्यूट : समथींग दॅट डजंट चेंज अशी आहे. तुमच्या सत्याच्या व्याख्याचा अर्थ : रिअॅलिटी किंवा वास्तविकता असा आहे (उदा. या लेखात - पृथ्वी सूर्याभोवती फिरते).
बायबलचा एक परिच्छेद सांगा जो कधीच मोडीत निघू शकणार नाहीतुमच्या लेखाचा निष्कर्श पुन्हा पाहा :
बायबलमधलं लिखाण हे शाश्वत सत्य करण्याच्या प्रयत्नांची ढाल अनेक अशाश्वत वाटणाऱ्या पण अस्सल सत्याच्या प्रहारांनी मोडून पडली आहे. हा खरा सत्याचा विजय आहे.बायबल हा धर्मग्रंथ आहे. खगोलशास्त्राचा काही भाग त्याला जोडला होता, तो अर्थात विज्ञानानं चूक ठरवला आहे. पण बायबलचा उद्देश वैज्ञानिक तथ्यांचा उहापोह नाही तर सत्याचा (अबसल्यूट) उलगडा करणं आहे. माझं म्हणणं इतकंच आहे की विज्ञानाच्या आजच्या प्रगल्भ अवस्थेत देखील `बायबलमधे सांगितलेल्या मार्गानं सत्याचा उलगडा होईल' या जनधराणेला विज्ञान शह देऊ शकत नाही. आणि पुढेही देऊ शकणार नाही कारण विज्ञान वास्तविकतेचा उलगडा करणारं शास्त्र आहे आणि धर्म सत्याचा उलगडा करणारं.
In reply to सत्य आणि विज्ञान by संजय क्षीरसागर
In reply to +११११ by प्यारे१
In reply to सत्य आणि विज्ञान by संजय क्षीरसागर
`बायबलमधे सांगितलेल्या मार्गानं सत्याचा उलगडा होईल' या जनधराणेला विज्ञान शह देऊ शकत नाही.पुन्हा सांगतो, एकतरी उदाहरण द्या राव. हे विधान नुसतंच विधान आहे - अगदी अॅब्सोल्यूट सत्य असल्याच्या थाटात ते वावरत. तुम्ही सुरूवातीला 'विज्ञान धारणा बदलू शकणार नाही म्हटलं'. मी त्या विपरित उदाहरणं दिली. मग तुम्ही 'बायबल मोडीत निघणार नाही' म्हटलं. मी मोडीत निघण्याची व्याख्या विचारली. तुम्ही सांगितली नाही. पुन्हा तेच वाक्य लिहिलंत. मग मी बायबलमधल्या एकतरी परिच्छेद दाखवा म्हणालो. आता तुम्ही म्हणता की 'बायबलचा मार्ग योग्य आहे ही लोकांच्या मनातली धारणा बदलू शकणार नाही' हे वाक्य अधिक स्पष्ट आहे, सुरूवातीलाच लिहिलं असतं तर चर्चा इतकी आडवळणांनी गेली नसती. तरीही या वाक्याला आधार काय? बायबलने सांगितलेला मार्ग नक्की कुठचा - जो बदलणं शक्य नाही? याबद्दल जर दोन शब्द लिहिलेत तर बरं होईल. नाहीतर चर्चा करण्यात काय अर्थ? नुसते शब्दांचे विशविशीत ढग तयार होतात.
प्रयोगशाळा प्रार्थनास्थळं नि विज्ञान हा मंत्र बनतो तेव्हा धर्म मानणार्या नि न मानणार्यामध्ये नक्की काय फरक राहतो असं वरच्या वाक्यात म्हणायचं होतं.प्रार्थनास्थळं? अहो, प्रयोगशाळा या प्रार्थनास्थळांच्या बरोब्बर उलट्या असतात. प्रत्येकाला तिथे जाऊन, नवीन प्रयोग करून ज्ञानात भर टाकण्याची, चुकीचे विचार निपटून टाकण्याची मुभा असते. प्रार्थनास्थळात 'प्रश्न विचारणं सोडा, आणि या देवाची प्रार्थना करा' अशी अपेक्षा असते. प्रार्थनास्थळाचं - चर्चचं - इन्स्टिट्यूशनलायझेशन झाल्यावर ज्ञानाचा प्रवाह गोठला. बायबल सांगतं पृथ्वीभोवती सूर्य फिरतो, मग ते तसंच असलं पाहिजे - जो कोणी विपरित सांगेल त्याचा मुडदा पाडा, त्याला जाळून टाका - ही पद्धत आली. हे अढळपद जाऊन सत्यशोधनाला, प्रस्थापित विचारांपेक्षा वेगळे विचार मांडण्याला संरक्षण आणि सन्मान प्राप्त झाला - हाच सत्याचा विजय. इतिहासाने जर काही शिकवलेलं असेल तर हे की 'ज्या विचाराने म्हटलं की संपूर्ण सत्य गवसलेलं आहे, त्यामुळे ते बदलणं शक्य नाही, आणि ते शोधण्याचा मार्ग आमच्या प्रांतातून जातो - तो विचार अप्रवाही आणि म्हणूनच मृत डबक्यासारखा ठरतो.'
In reply to क्षीरसागर व प्यारे यांना एकत्रित प्रतिसाद by राजेश घासकडवी
बदलू शकणार नाही'हे वाक्य अधिक स्पष्ट आहेपुढे जे लिहीलंय ते तितकंच महत्त्वाचंय.
माझं म्हणणं इतकंच आहे की विज्ञानाच्या आजच्या प्रगल्भ अवस्थेत देखील `बायबलमधे सांगितलेल्या मार्गानं सत्याचा उलगडा होईल' या जनधराणेला विज्ञान शह देऊ शकत नाही. आणि पुढेही देऊ शकणार नाही कारण विज्ञान वास्तविकतेचा उलगडा करणारं शास्त्र आहे आणि धर्म सत्याचा उलगडा करणारं.त्यामुळे विज्ञान आणि धर्म अशी तुलनाच अयोग्य आहे. विज्ञान माणसाच्या व्यक्तिमत्वाचा भ्रम दूर करू शकत नाही. मानशास्त्र ही जरी विज्ञानाची शाखा मानली तरी तो विषय मानसशास्त्राचा नसून अध्यात्माचा आहे. मानसशास्त्र व्यक्तिमत्वाची घडण आणि तिचं करेक्शन करण्याचा प्रयत्न आहे तर अध्यात्म व्यक्तिमत्वापासनं मुक्ती देतं.
बायबलने सांगितलेला मार्ग नक्की कुठचा - जो बदलणं शक्य नाही?क्रिस्टशिअॅनिटी मधे दोन अत्यंत महत्त्वाच्या अध्यात्मिक प्रक्रिया आहेत : एक : कन्फेशन (ज्यात व्यक्तिमत्वावरचं संपूर्ण भूतकाळाचं ओझं दूर करण्याची किमया आहे) आणि दोन : सर्विस (यामुळे तुम्ही स्वतःच्या कोषातून बाहेर येता आणि अस्तित्वाशी आपल्या संलग्नतेची तुम्हाला जाणिव निर्माण होऊ शकते) या दोन्हीही प्रक्रिया अत्यंत व्यक्तिसापेक्ष आहेत आणि त्या वैज्ञानिक कक्षेच्या संपूर्णपणे बाहेर आहेत. तस्मात, बायबलची बेसिक शिकवण, त्यात सांगितलेल्या या दोन महत्वाच्या प्रक्रिया कधीही बाद ठरू शकत नाहीत.
In reply to 'बायबलचा मार्ग योग्य आहे ही लोकांच्या मनातली धारणा by संजय क्षीरसागर
व्यक्तिमत्वाचा भ्रम
व्यक्तिमत्वापासनं मुक्तीपुन्हा नवीन काहीतरी शब्द, व्याख्येशिवाय.
महत्त्वाच्या अध्यात्मिक प्रक्रिया आहेत : एक : कन्फेशन (ज्यात व्यक्तिमत्वावरचं संपूर्ण भूतकाळाचं ओझं दूर करण्याची किमया आहे) आणि दोन : सर्विसकन्फेशन मित्राकडे किंवा सायकीअॅट्रिस्टकडे करून तोच फायदा होत नाही का? त्यासाठी ही विचित्र संस्था का आवश्यक आहे? आणि सर्विसचं म्हटलं बायबलमध्ये सांगितलेली माहिती आणि कथा पुन्हा पुन्हा घोळवून त्यातून हवा तो अर्थ सांगण्याची प्रक्रिया आहे. बरं, या इतक्या फायदेशीर गोष्टी आहेत, तर मग लोकं चर्चमध्ये जायची कमी का झालेली आहेत? इथे लिहिलेलं आहे - "In 1990, 20.4% of the population attended an Orthodox Christian church on any given weekend. In 2000, that percentage dropped to 18.7% and to 17.7% by 2004." मला असं वाटतं आहे की तुम्हाला जे 'होऊ नये' असं वाटतं आहे (बायबलचा पगडा कमी होणं) ते फक्त तुम्ही 'कधीच होणार नाही' अशा स्वरूपात सांगत आहात. याला विशफुल थिंकिंग म्हणतात. 'सत्य' काय आहे ते समजून घ्या.
In reply to कंटाळा यायला लागला आहे by राजेश घासकडवी
मला असं वाटतं आहे की तुम्हाला जे 'होऊ नये' असं वाटतं आहे (बायबलचा पगडा कमी होणं) ते फक्त तुम्ही 'कधीच होणार नाही' अशा स्वरूपात सांगत आहातबायबलचा पगडा कमी होऊ नये असं मला वाटत नाही. संपूर्ण मानवता निधर्मी व्हावी असं वाटतं पण तो वेगळा विषय आहे.
कन्फेशन मित्राकडे किंवा सायकीअॅट्रिस्टकडे करून तोच फायदा होत नाही का? त्यासाठी ही विचित्र संस्था का आवश्यक आहे? आणि सर्विसचं म्हटलं बायबलमध्ये सांगितलेली माहिती आणि कथा पुन्हा पुन्हा घोळवून त्यातून हवा तो अर्थ सांगण्याची प्रक्रिया आहे.कन्फेशन हा सायकिअॅट्रीचा विषय नाही. तुम्हाला `व्यक्तिमत्व' म्हणजे काय हेच कळत नाही तर त्यापासनं मुक्ती कळणं शक्य नाही. कारण कन्फेशन, सर्विस यानंतरची शेवटची पायरी `दाय विल बी डन' ही आहे. मी त्याविषयी लिहीलं की तुम्ही पुन्हा संपूर्ण समर्पण म्हणजे काय? विचारणार. असो, एक ज्योक सांगतो त्यानं उलगडा झाला तर पाहा : एक शिक्षिका वर्गात सांगते की मानवी जीवनात क्रांती घडवणार्या न्यूटनच्या एका शोधाबद्दल आज आपण शिकणार आहोत. नंतर ती झाडावरचं सफरचंद खाली पडतांना पाहून गुरूत्वाकर्षणाचा शोध कसा लागला ते सांगते. मागच्या बाकावरचा एक मुलगा हात वर करतो. काय? शिक्षिका विचारते. `मॅम, गुरूत्वाकर्षणाचा शोध लागण्यापूर्वी सफरचंद खालून वर जात होती का?' आय होप यू विल गेट द पॉइंट. विज्ञान `वास्तविकतेचा' उलगडा करतं. पण तुम्हाला वास्तविकता आणि सत्य यातलाच फरक कळत नाहीये आणि अशा परिस्थितीत तुम्ही `मी बायबलचा पगडा कमी होणार नाही म्हणतोय' असा निष्कर्ष काढला आहे. आणि खरी कमाल तर त्याही पुढे केली आहे. 'सत्य' काय आहे ते समजून घ्या' असं मला सांगताय! सत्याची व्याख्या मी सुरूवातीलाच सांगितली आहे आणि ते न कळता तुम्ही वास्तविकतेला `सत्य' समजता आहात. विज्ञानानं विमानाचा शोध लावून `गुरूत्वाकर्षणावर विजय मिळवला' असं वाटू शकतं. पण निसर्गानं तयार केलेलं इंधन वापरून विमान उडतं आहे आणि ज्या क्षणी इंधन संपेल तेंव्हा विमान खाली येईल ही वस्तुस्थिती आहे. याचा अर्थ विमान व्यर्थ आहे असा नाही तर ते गुरूत्वाकर्षण या अनिर्मित शक्तीच्या परिघातंच काम करतंय. या आणि अशा अनेक अनिर्मित निसर्गानियमांवर विजय मिळवणं असा विज्ञानाचा अर्थ नाही जो तुम्ही तुमच्या आकलनानुसार शीर्षकापासून सत्याचा विजय - विज्ञान विरुद्ध श्रद्धा मांडायचा प्रयत्न करत आहात. `दाय वील बी डन' चा अर्थ या अनाकलनीय, गूढ आणि रम्य अस्तित्वाप्रती संपूर्ण शरणांगती कारण वैज्ञानिक कल्पना सुचणं हे सुद्धा त्या अस्तित्वाचंच कार्य आहे. आणि त्या कल्पनांची परिपूर्ती ही सुद्धा अस्तित्वाच्याच आधिन आहे. अर्थात तुमच्या निष्कर्ष काढण्याच्या पद्धतीतून इतकं समग्र आकलन होणं अशक्य आहे.
In reply to तुम्हाला एकतर समग्रतेनं विचार करता येत नाहीये किंवा काय लिहीलंय by संजय क्षीरसागर
विज्ञानानं विमानाचा शोध लावून `गुरूत्वाकर्षणावर विजय मिळवला' असं वाटू शकतं.विज्ञान विरुद्ध श्रद्धा या लढाईत, कुठेच विज्ञानाने निसर्गावर विजय मिळवला असं म्हटलेलं नाही. या लेखाचा मतितार्थ - श्रद्धा दुसऱ्यांवर लादण्यामुळे जी सत्याची हानि होत होती ती थांबलेली आहे - असा आहे.
या अनाकलनीय, गूढ आणि रम्य अस्तित्वाप्रती संपूर्ण शरणांगती कारण वैज्ञानिक कल्पना सुचणं हे सुद्धा त्या अस्तित्वाचंच कार्य आहे.हे गूढरम्य अस्तित्व काय प्रकरण आहे? अहो, माणूस तयार झाला उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून. त्याचा मेंदू आणि विचारशक्तीही त्याच प्रक्रियेतून तयार झाली. मग कुठेच नसलेल्या गूढरम्य अस्तित्वाला शरण जाणं वगैरे भंपकपणाच ठरतो. तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत - कन्फेशन आणि सर्विस हे इतकं भारी प्रकरण आहे की ज्यामुळे बायबलवरची श्रद्धा कधीच नष्ट होणार नाही असं म्हणता, तर चर्चला जाणारे लोक कमी का होत आहेत? (खाली ब्रिटनचा विदा दिलेला आहे) 'बायबल कधीच मोडीत निघणार नाही' असं तुम्ही म्हणत आहात त्याच्या बरोब्बर उलटं घडताना दिसतं आहे म्हणजे तुमचं विधान चुकीचं नाही का? की काहीही विदा असला तरी ते विधान सत्य? आपण या विधानाबद्दलची चर्चा पूर्ण करू, मग पुढे सरकू.
In reply to विज्ञानानं विमानाचा शोध लावून by राजेश घासकडवी
श्रद्धा दुसऱ्यांवर लादण्यामुळे जी सत्याची हानि होत होती ती थांबलेली आहे - असा आहे.तुम्हाला सत्य म्हणजे वास्तविकता वाटते आहे (यू आर इक्वेटींग फॅक्ट ऑर रिअॅलिटी विथ `दि अॅबसल्यूट'). हा तुमचा मानासिक गोंधळ संपेपर्यंत चर्चा होते कुठे आहे? आहो, पृथ्वी सूर्याभोवती फिरते ही वास्तविकता आहे (आणि ती विज्ञानानं सिद्ध केली आहे) पण म्हणून :
बायबलमधलं लिखाण हे शाश्वत सत्य करण्याच्या प्रयत्नांची ढाल अनेक अशाश्वत वाटणाऱ्या पण अस्सल सत्याच्या प्रहारांनी मोडून पडली आहेम्हणजे लोकांचा बायबलवरचा विश्वास उडाला असा होत नाही. तुम्ही चर्चगोईंग पीपलचा डेटा सारखासारखा पुढे करता आहात. त्याचा अर्थ फक्त इतकाच आहे की हल्ली लोकांचं चर्चमधे जाण्याचं प्रमाण कमी झालं आहे. जर लोकांना बायबल खोटं आहे असं वाटलं असतं तर लोकांनी क्रिस्टशियन धर्म सोडला असता. मी म्हटलंय तसंच पुन्हापुन्हा होतंय, तुम्ही समग्रतेनं विचार करण्याऐवजी निव्वळ डेटाफेक करता आहात, कसं ते पाहा:
हे गूढरम्य अस्तित्व काय प्रकरण आहे?तुमचा श्वास चालू आहे हे गूढ नाही? नुसत्या श्वासाच्या सुरू राहण्यामागे सूर्याचं प्रकाशमान असणं, पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं, असंख्य ग्रहतार्यांचं एकमेकांना न धडकता वेगवेगळ्या कक्षेतून फिरणं, पृथ्वीवरची झाडं, त्यांच्यात आणि माणसात चाललेला कार्बनडायॉक्साईड आणि प्राणवायुचा एक्सचेंज, इथल्या नद्या, समुद्र.. अश्या असंख्य गोष्टी एकावेळी कारणीभूत आहेत. हा श्वास केव्हाही बंद पडू शकतो आणि तो चालू राहील हे केवळ गृहित आहे त्याला काहीही आधार नाही. अर्थात तुम्हाला इतकं समग्र आकलन जमणार नाही. तुम्ही पहिल्यांदा वास्तविकता (रिअॅलिटी) आणि सत्य (अॅबसल्यूट) यातला फरक समजून घेण्याचा प्रयत्न करा. सत्याची हानि कधीही होत नाही कारण सत्याचा अर्थच `समथींग दॅट दजंट चेंज असा आहे' आणि तो विज्ञानाचा विषयच नाही. विज्ञानाची कक्षा वास्तविकतेपुरती मर्यादित आहे आणि विज्ञान वास्तविकतेचा उलगडा करत राहिल त्यानं सत्याला काहीही बाधा येत नाही. तुमचे फंडाच क्लिअर नाहीत त्यामुळे या विषयावर चर्चा माझ्याकडून थांबवतो.
In reply to या लेखाचा मतितार्थ? by संजय क्षीरसागर
In reply to (No subject) by धन्या
मग कुठेच नसलेल्या गूढरम्य अस्तित्वाला शरण जाणं वगैरे भंपकपणाच ठरतो.एकदा स्वतःच्या श्वासावरच नियंत्रण नाही म्हटल्यावर अस्तित्वाची गूढ रम्यता कळते. आपल्या हातात फार किरकोळ गोष्टी आहेत हे लक्षात येतं. हे अफाट विश्व चालवणार्या युनिवर्सल इंटेलिजन्स पुढे आपली बुद्धीमत्ता ती काय हा उलगडा होतो. आपण अस्तित्वाप्रती कृतज्ञ होतो, शरणांगत होतो. आणि असा शरणांगत माणूस अनाहूतपणे म्हणतो : दाय विल बी डन! .... दॅट इज बायबल.
In reply to स्मायली कशापाई? by संजय क्षीरसागर
हे अफाट विश्व चालवणार्या युनिवर्सल इंटेलिजन्स पुढे आपली बुद्धीमत्ता ती काय हा उलगडा होतो.माणूस ही निसर्गाचीच निर्मिती असून एकंदरीत निसर्गापुढे मानव खुपच छोटा आहे यात शंकाच नाही. निसर्गाची ताकद अफाट आहे. पण तुम्ही म्हणताय तसं "युनिवर्सल इंटेलिजन्स" विश्व चालवणारं काहीतरी अस्तित्वात असेल असं वाटत नाही. दिवसाला हजारो लोक अपघातांमध्ये, युद्धांमध्ये, नैसर्गिक आपत्तींमध्ये मरत आहेत. गुन्हे घडत आहेत, बलात्कार होत आहेत, गोरगरीबांना नाडलं जात आहे. हेच का युनिवर्सल इंटेलिजन्सचं विश्व चालवणं? भरल्या पोटी तत्वज्ञानाच्या गप्पा मी मारु शकतो, तुम्ही मारु शकता. अन्नासाठी, पाण्यासाठी दाही दिशा वणवण फीरणारा नक्कीच तुम्ही म्हणताय त्या अस्तित्वाप्रती कृतज्ञ, शरणांगत होऊन "दाय विल बी डन" म्हणणार नाही.
In reply to हे अफाट विश्व चालवणार्या by धन्या
In reply to नॉट रिअली. by अर्धवटराव
ज्यांनी "आपण या गुढतेचा एक इंटीग्रेटेड पार्ट आहोत एव्हढं नक्की" अशी शरणागती अर्पण केली ते खिस्त, बुद्ध, कबीर झाले.ही गुढता = ईश्वर ही धारणा मनात नसेल तर या यादीत अगदी बाबा आमटे आणि त्यांचा परिवार, डॉ. बंग यांचीही नावं आपोआपच जोडली जातात.
In reply to नॉट रिअली. by अर्धवटराव
In reply to नॉट रिअली. by अर्धवटराव
ज्यांनी या गुढतेला आपली जिज्ञासा अर्पण केली ते शास्त्रज्ञ झाले. ज्यांनी "आपण या गुढतेचा एक इंटीग्रेटेड पार्ट आहोत एव्हढं नक्की" अशी शरणागती अर्पण केली ते खिस्त, बुद्ध, कबीर झाले.















In reply to हे अफाट विश्व चालवणार्या by धन्या
In reply to <em>अन्नासाठी, पाण्यासाठी by शिल्पा ब
In reply to एकत्रित प्रतिसाद by संजय क्षीरसागर
In reply to क्षीरसागर व प्यारे यांना एकत्रित प्रतिसाद by राजेश घासकडवी
In reply to धर्मसंस्था म्हणजे चर्च हेच by प्यारे१
ह्या मध्ये कसल्याही प्रकारच्या सक्तीच्या आज्ञा नाहीत अथवा प्रश्न विचारु नका अशा प्रकारचं कुठलंही बंधन नाही."प्रार्थनास्थळात 'प्रश्न विचारणं सोडा, आणि या देवाची प्रार्थना करा' अशी अपेक्षा असते." यात सक्तीपेक्षा विचारप्रक्रिया बाजूला ठेवून निव्वळ विश्वास ठेवा, म्हणजे तुमचं भलं होईल अशी शिकवणूक असते. हे विशेषतः भक्तिमार्गात दिसून येतं. 'मला शरण ये.' 'योग्य काय व अयोग्य काय याचा विचार करण्यापेक्षा तुला आखून दिलेलं कर्म करणं हेच महत्त्वाचं आहे' असं कृष्ण भग्वद्गीतेत म्हणतो.
अशा 'फिकल' विश्वामध्ये असं काही आहे का जे कायम आहे? शाश्वत आहे? अपरिवर्तनीय आहे?विज्ञान व त्या शोधासाठी आपलं आयुष्य घालवणारे लेन्स्कीसारखे शास्त्रज्ञ नेमका हाच शोध घेत आहेत. 'कुठच्याही रेफरन्स फ्रेममध्ये असा - प्रकाशाचा वेग बदलत नाही' किंवा 'भौतिकीचे नियम रेफरन्स फ्रेमप्रमाणे बदलत नाहीत' हे शाश्वत आणि अपरिवर्तनीय शोधून काढण्याचंच उदाहरण आहे. लेन्स्की जेव्हा उत्क्रांती प्रत्यक्ष घडली हे दाखवून देतो, तेव्हा 'माणूस म्हणजे नक्की कोण?' या प्रश्नाचाच एक भाग उलगडत असतो. ते उत्तर असं की मनुष्य उत्क्रांतीतून जन्माला आला. कोबे, डब्लुमॅप, प्लांक यांतून विश्वाची जी प्रतिमा मिळाली त्यातून विश्व अनादी नाही हे सिद्ध होतं. वैज्ञानिकांना हे तपासून पहाण्याची गरज का वाटली? कारण त्यांची आणि दार्शनिकांची वैचारिक जातकुळी एकच आहे. सध्याच्या वैज्ञानिकांच्या हातात अत्याधुनिक उपकरणं आहेत इतकंच. दुर्दैवाने मधले श्लाफ्लीसारखे लोक, किंवा रोमन इन्क्विझिशनसारखे - आपली सत्ता टिकवून धरण्यासाठी नवीन ज्ञानाला अवरोध करणारे - हे तत्वज्ञान गुंडाळून ठेवतात. त्यातून आंधळा विश्वास जोपासला जातो.
In reply to तत्वज्ञानाची वेगवेगळी दर्शनं by राजेश घासकडवी
In reply to कृपया ह्या धाग्यावरचा माझा by प्यारे१
कृष्ण अर्जुनाला तत्वज्ञान सांगितल्यावर 'तू काय ते ठरव' असं म्हणालेलं सोयिस्कर रित्या विसरलं जाऊ नये...इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्गुह्यतरं मया| विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरू|| - भगवद्गीता (१८.६३) श्रीमत् भावार्थ गीतेतील (स्वामी स्वरूपानंद) अनुवादः तुज सांगितले असे हे भले पावन आत्म-ज्ञान असे चि सहजे धनंजया जे माझे गुप्त निधान सर्वतोपरी तू चि विचारी मनी एक निर्धारी आणि जाणले उचित ते करी धरी शस्त्र वा न धरी
In reply to तू काय ते ठरव ... by मूकवाचक
In reply to कृपया ह्या धाग्यावरचा माझा by प्यारे१
सगळ्यांना 'मर्यादेत' ठेवण्यासाठी, समाजाची घडी योग्य तर्हेनं चालण्यासाठी आवश्यक नैतिकतेच्या चौकटी धर्म घालतो तेव्हा बहुसंख्य लोकांची ती आवश्यकता असते. कारण सगळी माणसं सारख्या मानसिक क्षमतेची नसतात हे तुम्हाला कबूल असावं.आजकाल सेक्युलर राज्यव्यवस्था ते काम बऱ्यापैकी बरं करत आहे. उलटपक्षी असं दिसून येतं की एकाच देशातल्या धर्माचा पगडा असलेल्या भागात गुन्हेगारीचं प्रमाण अधिक आहे. उदाहरणार्थ - अमेरिकेत दक्षिणेचा भाग हा सर्वात धार्मिक समजला जातो. तिथे गुन्हेगारीचं प्रमाण अधिक सेक्युलर उत्तरेपेक्षा जास्त आहे. तसंच अमेरिका व इंग्लंड या देशांमध्ये तुलना केली असता अमेरिकेत एकंदरीत धार्मिकता अधिक आहे, आणि गुन्हेगारीही अधिक आहे. धर्माच्या नावाखाली झालेल्या अत्याचारांची यादी तर वाचवणार नाही इतकी मोठी आणि भयंकर आहे. तेव्हा धर्म माणसाला अधिक नीतिमान बनवतो हे प्रत्यक्षात दिसून येत नाही. 'मला शरण ये' या स्वरूपाची विधानं वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळ्या प्रकारे येतात. ख्रिश्चन धर्माचा गॉड 'माझ्याशिवाय कोणाची पूजा करायची नाही' असं स्पष्ट सांगतो. जे करतील त्यांना सजा-ए-मौत आहे. इस्लामचंही तेच. गीतेत लिहिलेलं आहे - Engage your mind always in thinking of Me, become My devotee, offer obeisances to Me and worship Me. Being completely absorbed in Me, surely you will come to Me. (B-Gita 9.34)[7] One can understand Me as I am, as the Supreme Personality of Godhead, only by devotional service. And when one is in full consciousness of Me by such devotion, he can enter into the kingdom of God. (B-Gita 18.55) [8] एकंदरीत सगळेच धर्म आपल्या अनुयायांना स्वतंत्र विचारापेक्षा धृढ विश्वास ठेवायला सांगतात.
भेसळीचं, भ्रष्टाचाराचं नि फसवणुकीचं कुठलंच क्षेत्र कुणीच मोकळं सोडलेलं नाही पण त्यामुळं सरसकट सगळ्यालाच नाकारणं चुकीचं नाही का होणार?नाहीच ना. खरं नाणं कुठचं आणि खोटं कुठचं यात फरक करणं म्हणजे बाजारावरच विश्वास न ठेवणं नाही. जे लोक सचोटीने सत्य शोधतात, ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात ते प्रशंसनीयच आहेत. शेवटी गाडी व्यक्तिसापेक्ष आणि व्यक्तिनिरपेक्ष यांच्या सीमेवर येऊन उभी रहाते. व्यक्तिनिरपेक्ष ज्ञान विज्ञानाच्या अखत्यारीत येतं, व्यक्तिसापेक्ष अनुभूतींवरचे निष्कर्ष अध्यात्माच्या अखत्यारित येतात. पण ही रेषा आत सरकते आहे. मनात काय विचार चालू आहेत हे हळूहळू अंधूकपणे ओळखता यायला लागलेलं आहे.
In reply to सगळ्यांना 'मर्यादेत' by राजेश घासकडवी
In reply to पुन्हा तोच विषय येतो आहे. by प्यारे१
In reply to तत्वज्ञानाची वेगवेगळी दर्शनं by राजेश घासकडवी
'मला शरण ये.' 'योग्य काय व अयोग्य काय याचा विचार करण्यापेक्षा तुला आखून दिलेलं कर्म करणं हेच महत्त्वाचं आहे' असं कृष्ण भग्वद्गीतेत म्हणतो.कितव्या अध्यायात कुठल्या श्लोकात आहे असे? संदर्भ मिळेल का?
सक्तीपेक्षा विचारप्रक्रिया बाजूला ठेवून निव्वळ विश्वास ठेवा, म्हणजे तुमचं भलं होईल अशी शिकवणूक असते.भगवद्गीतेचा सगळा प्रवासच प्रामुख्याने प्रश्नोत्तर स्वरूपात आहे. अर्जुनाने एकूण किती पश्न विचारले हा विदा गोळा करायला हरकत नसावी. कृष्णाने विचारलेल्या प्रश्नांचीच उत्तरे दिली आहेत. त्यात तिसर्या अध्यायाच्या सुरूवातीला अर्जुनाने विचारलेल्या "हे जनार्दना, जर तुला कर्मापेक्षा साम्य बुद्धी श्रेष्ठ वाटते, तर या घोर कर्मात मला का लोटतो आहेस?" या प्रश्नाचे उत्तरही विचारप्रक्रिया बाजूला ठेवून निव्वळ विश्वास ठेवा अशा प्रकारे दिलेले दिसत नाही. असो.
In reply to तत्वज्ञानाची वेगवेगळी दर्शनं by राजेश घासकडवी
In reply to आखून by विकास
In reply to ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या, जिवो by धन्या
ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या, जिवो ब्रह्मैव नापरः |
अतिशय माहितीपूर्ण धाग्यावर तितकाच माहितीपूर्ण व सुंदर प्रतिसाद!!
माणूस ही निसर्गाचीच निर्मिती असून एकंदरीत निसर्गापुढे मानव खुपच छोटा आहे यात शंकाच नाही. निसर्गाची ताकद अफाट आहे. पण तुम्ही म्हणताय तसं "युनिवर्सल इंटेलिजन्स" विश्व चालवणारं काहीतरी अस्तित्वात असेल असं वाटत नाही.तुमचा श्वास चालू आहे, हृदय धकंधकतंय हा अगदी निकटचा पुरावा सर्व सिद्ध करतो.
दिवसाला हजारो लोक अपघातांमध्ये, युद्धांमध्ये, नैसर्गिक आपत्तींमध्ये मरत आहेत. गुन्हे घडत आहेत, बलात्कार होत आहेत, गोरगरीबांना नाडलं जात आहे. हेच का युनिवर्सल इंटेलिजन्सचं विश्व चालवणं?ज्यांना युनिवर्सल इंटेलिजन्स म्हणजे काय याची कल्पना नाही आणि तो कळण्याची सुतराम शक्यता नाही अश्या लोकांचं ते जगणं आहे. अस्तित्वाला त्यानं काही फरक पडत नाही. ते स्वतःच्या अंगभूत व्यवस्थेनं हरक्षणी स्वतःला समत्वात ठेवतं. फरक अपराधी व्यक्तींच्या जीवनात पडतो, वरून काहीही दिसो, त्यांचं अंतरंग दुभंगलेलं असतं, त्यांच्या जीवनातली शांती हरवते, आयुष्य सैरभैर होतं.
भरल्या पोटी तत्वज्ञानाच्या गप्पा मी मारु शकतो, तुम्ही मारु शकता. अन्नासाठी, पाण्यासाठी दाही दिशा वणवण फीरणारा नक्कीच तुम्ही म्हणताय त्या अस्तित्वाप्रती कृतज्ञ, शरणांगत होऊन "दाय विल बी डन" म्हणणार नाहीविथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, हा मूर्खपणा आपण अजून किती दिवस करणार? एकतर गरीबांसाठी काम करा, ते काही तरी विधायक होईल. किंवा मग जे लिहीलंय ते आचरणात आणा त्यानं आयुष्य बदलेल. पुन्हा इतके फालतू मुद्दे काढू नका. माझं पोट भरलंय, मी गरीबी हटवण्याचं काम करत नाही, ते राज्यकर्त्यांचं काम आहे. मी थोडं वेगळं काम करतोय, ज्यांना समजेल अश्या लोकांसाठी लिहीतोय. आणि मला एकच खात्री आहे; अस्तित्वाप्रती कृतज्ञ व्हायला पोट भरलंय की रिकामंय हा प्रश्न व्यर्थ आहे, तिथे आकलनाची पातळी निर्णायक आहे. @ अरा,
ज्यांनी "आपण या गुढतेचा एक इंटीग्रेटेड पार्ट आहोत एव्हढं नक्की" अशी शरणागती अर्पण केली ते खिस्त, बुद्ध, कबीर झाले. उरलेले आपण मिपा मिपा खेळुयाशरणांगती हा कुणाचा मक्ता नाही. आपण नेहमी एकच चूक करतो. लिहीतांना मोठ्या गोष्टी लिहीतो आणि आचरणात आणायची वेळ आली की बुद्ध आणि ख्रिस्ताचं नांव घेतो. याचा अर्थ एकच : आपल्याला एकतर समजलं नाहीये किंवा शरणांगत व्ह्यायचं साहस आपल्याकडे नाहीये. ओशोंचं एक अप्रतीम वाक्य आहे : समझ आचरणमे बदल जाती है. एकतर `दाय विल बी डन' असे जगा, त्यानं तुफान मजा येईल आणि त्याल मी साक्षी आहे. नाही तर मिपा मिपा खेळा,त्याला फारशी बुद्धी लागत नाही. उगीच डेटाफेक करणं आणि गीतेतले भारंभार श्लोक इथे डकवणं एकूण एकच. या संदर्भातल्या शेवटच्या प्रतिसादाला उत्तर देण्यात अर्थ नाही कारण `एकूण डोकं' किती आहे याची प्रतिसादावरनंच कल्पना येते.
In reply to दाय विल बी डन! by संजय क्षीरसागर
In reply to मक्तेदारी by अर्धवटराव
बुद्ध, ख्रिस्त वगैरे मंडळींबद्दल खात्री आहे म्हणुन त्यांची नावे घ्यायला अडचण होत नाहिकारण ते गेलेत. आता त्यांचा उदोउदो करून आपली साइड सेफ होते. ते होते तेव्हा त्यावेळच्या लोकांनी त्यांना दगड मारलेत आणि क्रुसिफाय केलंय. ते ग्रेट होते म्हटलं की पुन्हा आपण नेहेमी सारखे जगायला मोकळे.
बुद्धाचं बुद्धत्वच त्याचा परिचय आहे. ते कोणाच्या आकलनाला चॅलेंज करत नाहि कि बोधिगयेत कान पकडुन कोणाला झाडाखाली बसवत नाहि. ख्रिस्ताला त्याच्या क्रॉसचा फाजील अभिमान नाहि आणि कबीर त्याच्या दोह्याच्या श्रोत्यांना "साधु" म्हणुन संबोधतो कारण त्याला स्वतः प्रमाणे इतरांच्या विचारशक्तीचं देखील भान असतं.आकलन सगळ्यांच एकच आहे; तो बुद्ध असो, जिजस असो की इथला सदस्य. प्रश्न आकलनाचा नाही, ते आचरणात आणण्याचा आहे. तुमचं स्वतःचं आयुष्य या क्षणापासनं `समर्पणाच्या - रेझर एजवर' जगण्याचा आहे.
In reply to तसं नाहीये by संजय क्षीरसागर
In reply to हा मखरात बसवण्याचा मुद्दा नाहिए by अर्धवटराव
In reply to @ अर्धवटराव, by प्यारे१
In reply to हा मखरात बसवण्याचा मुद्दा नाहिए by अर्धवटराव
आणि त्याच्या शिकवणीचा अभ्यास करणारे सर्वकाळ आढळतील. त्यात काहि विषेश नाहि.करेक्ट!... शिकवण आचरणात आणणारा दुर्लभ आहे.
आपण ज्ञानसागरात उभे आहोत व आपल्या हाती त्याचा केवळ एक थेंब लागलाय या जाणीवेने ते विनम्र होतात. जितकं जास्त खोलात जावं तितकं गुढ आणखी वाढतं. ज्यांनी या गुढतेला आपली जिज्ञासा अर्पण केली ते शास्त्रज्ञ झाले. ज्यांनी "आपण या गुढतेचा एक इंटीग्रेटेड पार्ट आहोत एव्हढं नक्की" अशी शरणागती अर्पण केली ते खिस्त, बुद्ध, कबीर झाले. उरलेले आपण मिपा मिपा खेळुयाहा भाग आवडला. मात्र जितकं खोलात जाऊ तितकं गूढ वाढतं म्हणण्यापेक्षा सौंदर्य आणि थक्क करण्याची शक्ती वाढते. न्यूटनने जेव्हा लोलकातून प्रकाशकिरण पाठवून सप्तरंग तयार केले तेव्हा काही लोकांना ते गूढाचं सामान्यीकरण वाटलं. असंही म्हटलं गेलं की ते गूढ, गूढच रहायला हवं होतं. आता इंद्रधनुष्यातली जादू नाहीशी होईल. पण तसं झालेलं नाही. इंद्रधनुष्य का पडतं हे कळलं तरी त्याचं सौंदर्य कमी होत नाही. उलट प्रकाश काय आहे हे समजून घेतल्यामुळे आपल्यासमोर महाप्रचंड विश्व उघडतं, ज्याचा एक कोपरा पाहून, समजून घेऊन देखील थक्क व्हायला होतं. न्यूटनने (किंवा इतर कोणी) हा अभ्यास केल्याशिवाय लेन्स्कीचा हा प्रयोग शक्य झाला नसता. मायक्रोस्कोप तयार करता आले नसते, बॅक्टेरिया दिसलेही नसते. ही यादी वाढवता येईल. मुद्दा असा आहे निसर्गाच्या सौंदर्याशी एकरूप होण्यासाठी गूढाचं धुकं ठेवण्याची गरज नाही. धुकं सुंदर असतंच, पण धुकं उलगडल्यावर दिसणारा देखावाही सुंदर असतो. या विषयावर रिचर्ड डॉकिन्सने 'अनवीव्हिंग द रेनबो' नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. ते जरूर वाचावं.
In reply to आपण ज्ञानसागरात उभे आहोत व by राजेश घासकडवी
In reply to गुढता म्हणजे केवळ मिस्ट्री या अर्थाने नव्हे... by अर्धवटराव
जसं जसं एखाद्या विषयाच्या खोलात जावं तसं तसं त्यातल्या पॅरॅमीटर्सची संख्या आणि त्यांचे एकमेकांप्रती अवलंबवीत्व वाढत जातं... या अर्थी.मला वाटतं आपण एकाच गोष्टीबद्दल बोलत आहोत. मला वाटतं तुम्हालाही गूढतापेक्षा अंडरलायिंग कॉंप्लेक्सिटी हा अर्थ अपेक्षित आहे. वेगवेगळ्या स्केलवर वेगवेगळी चित्रं दिसतात. उदाहरणार्थ, प्रकाशवर्षांच्या स्केलवर गुरुत्वाकर्षणापलिकडे काही दिसत नाही. निव्वळ ग्रहांच्या चलनवलनाच्या अभ्यासासाठी न्यूटन पुरेसा आहे. आपल्या रोजच्या जीवनात ज्या घटना घडतात त्या स्थानिक गुरुत्वाकर्षण (स्थिर) आणि इलेक्ट्रॉन पातळीवर समजावून घेता येतात. जसजसे आणखीन सूक्ष्मात जाऊ तसतसे प्रोटॉन-न्यूट्रॉन दिसतात. आणि क्वार्क वगैरेही दिसतात. या सगळ्यांची एकमेकांशी इंटरऍक्शन होतेच - त्याशिवाय बिगबॅंग समजावून घेता येत नाही. या अर्थाने सगळंच एकमेकांवर अवलंबून आहे. पण तरीही विविध स्केलला वेगवेगळी बलं प्रभावी ठरतात - त्या स्केलपुरतं 'दुसरी बलं नाहीतच' असं ऍप्रॉक्झिमेशनही यशस्वी ठरतं. इतर बलं लक्षात घेतली की ते चित्र जास्त रेखीव आणि अचूक होतं. चांगली गोष्ट अशी की एका पातळीवरचं चित्र वरच्या व खालच्या पातळ्यांशी सुसंगत आहे. त्यामुळे एक सम्यक चित्र तयार होतं आहे. आणि दुसरी चांगली गोष्ट म्हणजे त्यासाठी वापरलेले मूलभूत स्थिरांक आणि गृहितकं अत्यंत मर्यादित आहेत. त्यामुळे दर स्केलला दिसणाऱ्या गोष्टी अनेक पटींनी वाढत असल्या तरी त्यांचं वर्णन करणारे नियम एकाच जातकुळीचे आणि सारखे आहेत.
In reply to जसं जसं एखाद्या विषयाच्या by राजेश घासकडवी
In reply to आपण ज्ञानसागरात उभे आहोत व by राजेश घासकडवी
धुकं सुंदर असतंच, पण धुकं उलगडल्यावर दिसणारा देखावाही सुंदर असतो.ना धुकं सुंदर असतं, ना ते उलघडल्यावरचा देखावा. आता उलघडलेल्या जगात अजून खालच्या प्रस्तरावरचं जे नविन धुकं असतं ते अजून भयकारक असतं.
पुण्यात गुलटेकडीच्या मैदानात तेव्हाचे पेशव्यांचे सैनिक महारांची डोकी घेऊन पोलोसारखा खेळ खेळत,पाच किलोचं मुंडकं घेऊन पोलोसारखा खेळ खेळणे म्हणजे भीमासारखी अचाट शक्ती हवीच. हा पोलोदेखील इंग्रजांच्या आधीपासून खेळायचे, म्हणजे कालयंत्रातून भूतकाळात सफर घडली म्हणायची. कोण म्हणतो आपल्याकडे प्राचीन काळी शोध लागले नव्हते म्हणून? आपली एव्हढी प्रगती बघून माझं मन आनंदाने थुईथुई (की थयथया) नाचू लागलं, त्यात नवल ते काय ! -गा.पै.
In reply to बाई बाई, मनमोराचा कसा पिसारा फुलला .... by गामा पैलवान
In reply to बाई बाई, मनमोराचा कसा पिसारा फुलला .... by गामा पैलवान
+१