सत्याचा विजय - विज्ञान विरुद्ध श्रद्धा
प्रतिक्रिया
In reply to फार उत्तम लेख आहे. आवडला. by गवि
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पण धार्मिक ग्रंथांच्या विचारांच्या विरोधातल्या लढ्याबाबत देहांताच्या शिक्षा फार कमी असाव्यात.याचे कारण, मला वाटते, "तसेही असू शकते" ही विचारसरणी वा मानसिकता भारतात पूर्वापार आहे. म्हणूनच तर भारतात एकाच वेळी द्वैतवादी आणि अद्वैतवादी असे दोन्हीही पंथ नांदू शकले. बाकी लेख आवडला.
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धार्मिक ग्रंथांच्या विचारांच्या विरोधातल्या लढ्याबाबत देहांताच्या शिक्षा फार कमी असाव्यात.आपल्याकडे देहान्तशासन नाही तरी समाजाच्या मोठ्या गटाला बहिष्कृताचं जगणं जगायला लावण्याचा इतिहास फार शिळा झालेला नाही. उत्तर पेशवाईमधे उच्चवर्णीयांनी दलित आणि उतरंडीतल्या मधल्या जातीच्या लोकांवर केलेल्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीमुळे ब्रिटीश आले तेव्हा या लोकांना आनंदच झाला होता. याबद्दल एक लिखित पुरावा सावित्रीबाईंची फुलेंची एक विद्यार्थिनी मुक्ता हिच्या पत्रातून मिळतो. पुण्यात गुलटेकडीच्या मैदानात तेव्हाचे पेशव्यांचे सैनिक महारांची डोकी घेऊन पोलोसारखा खेळ खेळत, महारांची डोकी बांधकामाच्या पायथ्याशी घालत असे उल्लेख आहेत. या लोकांना संशोधन आणि बंडखोरी सोडाच, सामान्य आयुष्य जगणंही मुश्कील झालं होतं. संन्याशाच्या मुलांची गोष्ट सगळ्यांनाच माहित असावी. लेख ठीकठाक. लेन्स्कीच्या शास्त्रीय प्रयोगाबद्दल अधिक कुतूहल आहे. रिचर्ड डॉकिन्सच्या 'ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ'मधे याचा त्रोटक उल्लेखही आहे.
In reply to धार्मिक ग्रंथांच्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
धार्मिक ग्रंथांच्या विचारांच्या विरोधातल्या लढ्याबाबत देहांताच्या शिक्षा फार कमी असाव्यात.आणि गंमत म्हणजे अशा शिक्षा पाश्चात्य जगातून जवळपास नाहीशा झाल्या असल्या तरी भारतात अजूनही दलितांना हीन वागणूक मिळणे थांबलेले नाही.
In reply to फार उत्तम लेख आहे. आवडला. by गवि
In reply to लेख चांगला आहे पण विज्ञान by यशोधरा
In reply to सहमत.. by उपास
In reply to लेख चांगला आहे पण विज्ञान by यशोधरा
लेख चांगला आहे पण विज्ञान विरुद्ध अंधविश्वास वा रुढी असं म्हणायचं आहे का? श्रद्धा हा शब्दप्रयोग अत्यंत चुकीचा वाटतो. की जाणूनबूजून वापरलाय?+१. लेख चांगला आहे पण लेखाचे शीर्षक खटकले. श्रध्दा हा शब्दप्रयोग इथे अत्यंत चुकीचा आहे. एडिसन हजारेक अयशस्वी प्रयत्नांनंतर लाईट बल्ब यशस्वीपणे बनवू शकला असे वाचले आहे.इतक्या वेळा त्याला अपयश येत असतानाही आपल्या मनातील अमूर्त कल्पनेला आपण मूर्त स्वरूप देऊ शकतो याच विश्वासाने (श्रध्दा) त्याला परतपरत प्रयत्न करायला प्रेरणा दिली असणार यात शंका नाही.लाईट बल्ब प्रत्यक्षात यायच्या आधी तो एक कल्पना होता.पण एडिसनने या "न बघितलेल्या" किंवा "सिध्द करता न येण्याजोग्या" कल्पनेवर विश्वास (श्रध्दा) ठेवला आणि म्हणूनच लाईट बल्ब प्रत्यक्षात आला.कोणताही मनुष्य एखादी गोष्ट मिळवायला प्रयत्न करतो तेव्हा सध्या कल्पनेत असलेली गोष्ट आपण प्रत्यक्षात आणू शकतो हा विश्वासच (श्रध्दा) त्याला प्रेरणा देत असतो आणि अशा विश्वासाच्या अभावी कोणतीही गोष्ट साध्य करता येऊ शकणार नाही.या पार्श्वभूमीवर विज्ञान विरूध्द श्रध्दा असा रंग द्यायचा स्वत:ला रॅशनल म्हणवणारी मंडळी करतात तेव्हा खरोखरच ते हास्यास्पद वाटते.
In reply to +१ by क्लिंटन
In reply to लेख चांगला आहे पण विज्ञान by यशोधरा
विज्ञान विरुद्ध अंधविश्वास वा रुढी असं म्हणायचं आहे का? श्रद्धा हा शब्दप्रयोग अत्यंत चुकीचा वाटतो.एखादी गोष्ट खरी आहे की नाही हे निरीक्षणं करून, प्रयोग करून तपासून पहाणं, याला मी वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतो. कुठल्याशा ग्रंथात सांगितलं आहे किंवा कोणी थोर पुरुष म्हणून गेला आहे किंवा कोणालाही न सांगता येणाऱ्या आंतरिक अनुभूतींमधून आलेल्या विचारांवर विश्वास ठेवून ते सत्य मानणं याला मी श्रद्धा मानतो. या उदाहरणात बायबलमध्ये 'पृथ्वी केंद्रस्थानी आहे' असं सांगितल्यामुळे त्यावर विश्वास ठेवणं ही श्रद्धाच. त्यामुळे हा विज्ञान विरुद्ध श्रद्धा असाच लढा होता. खरं तर वैयक्तिक श्रद्धा बहुतांश वेळी निरुपद्रवी असतात. जोपर्यंत मनुष्य आपल्याला हव्या त्या गोष्टीवर विश्वास ठेवतो, आणि आपल्यापुरत्या जपतो तोपर्यंत सगळं ठीक असतं. जेव्हा त्या इतरांवर लादल्या जातात तेव्हा प्रश्न निर्माण होतो. जेव्हा त्या श्रद्धा सर्वांनी स्वीकाराव्यात म्हणून त्यांविरुद्ध ज्ञान मांडणारांचे बळी जातात तेव्हा लढा सुरू होतो. अशा लढ्यांच्या बाबतीत आता व्यक्तिनिरपेक्ष, वैज्ञानिक सत्याला योग्य ते सन्मानाचं स्थान मिळतं आहे हे दाखवून द्यायचं आहे. या लेखाला 'सत्याचा विजय - व्यक्तिनिरपेक्ष वैज्ञानिक दृष्टिकोन विरुद्ध लादलेल्या श्रद्धा' असं नाव देता आलं असतं. पण विज्ञान वि. श्रद्धा हे जास्त सुटसुटीत वाटलं. तेव्हा एका अर्थाने तो जाणूनबुजूनच वापरलेला आहे. नजरचुकीने नाही.
In reply to विज्ञान विरुद्ध अंधविश्वास वा by राजेश घासकडवी
In reply to अतिशय संतुलित आणि छान लेखावर by धन्या
अतिशय संतुलित आणि छान लेखावर लेखकाचा तितकाच सुंदर प्रतिसाद !!!
+७८६
अवांतर - "विज्ञानाने कितीही शोध लावले तरी या विज्ञानाचीच निर्मिती करणारी शक्ती या जगात आहे जिला देव म्हणतात" अशी श्रद्धा असणारा एक भलामोठा म्हणजे ९०-९५ टक्के लोकांचा समूह आजही या जगात आहे आणि उद्याही राहणार.In reply to अतिशय संतुलित आणि छान लेखावर by तुमचा अभिषेक
बायबलमधलं लिखाण हे शाश्वत सत्य करण्याच्या प्रयत्नांची ढाल अनेक अशाश्वत वाटणाऱ्या पण अस्सल सत्याच्या प्रहारांनी मोडून पडली आहे. हा खरा सत्याचा विजय आहे.पूर्वी विज्ञान धर्मग्रंथात जोडलं होतं. संशोधनामुळे विज्ञान विकसित झाल्यानं ते धर्मग्रंथातून अलग झालं इतकंच पण याचा अर्थ धर्माला विज्ञानानं शह दिला असा होत नाही.
"विज्ञानाने कितीही शोध लावले तरी या विज्ञानाचीच निर्मिती करणारी शक्ती या जगात आहे जिला देव म्हणतात" अशी श्रद्धा असणारा एक भलामोठा म्हणजे ९०-९५ टक्के लोकांचा समूह आजही या जगात आहे आणि उद्याही राहणार.त्यामुळे विज्ञान नेहमी वास्तविकता समोर आणत राहील आणि संशोधनानं जगणं सुकर करेल. विज्ञान निर्विवादपणे उपयोगी आणि सार्थ आहे. पण ते लोकांच्या धारणा (कन्विकशन्स) बदलू शकणार नाही. थोडक्यात, काही गोष्टी अवैज्ञानिक ठरल्या तरी लोकांची बायबलवरची श्रद्धा अजून जशीच्या तशी आहे.
In reply to बर्याच वेळानं एक यथार्थ प्रतिसाद आला! by संजय क्षीरसागर
पण ते लोकांच्या धारणा (कन्विकशन्स) बदलू शकणार नाही.अनेक धारणा बदललेल्या आहेत १. देवाने पृथ्वी निर्माण केली, आणि सूर्य चंद्र तिच्याभोवती फिरतात - ही धारणा बदलून पृथ्वी आपोआप तयार झाली, व ती सूर्याभोवती फिरते ही धारणा झालेली आहे. २. देवाच्या किंवा देवीच्या कोपामुळे रोगराई होते - ही धारणा बदलून जंतूंमुळे व इतर वैद्यकीय कारणांमुळे रोगराई होते ही धारणा झालेली आहे ३. संतति ही देवाची देणगी आहे - ही धारणा बदलून संततिवर नियंत्रण ठेवता येतं ही धारणा झालेली आहे. ही यादी प्रचंड मोठी करता येईल. तुम्ही जर धारणा या शब्दाची व्याख्या 'जे विचार कधीच बदलणं शक्य नाही तेच फक्त' अशी केली तरच तुमचं विधान बरोबर ठरू शकेल.
In reply to पण ते लोकांच्या धारणा by राजेश घासकडवी
बायबलमधलं लिखाण हे शाश्वत सत्य करण्याच्या प्रयत्नांची ढाल...हा खरा सत्याचा विजय आहेविज्ञान अंधश्रद्धा दूर करतं हे निर्विवाद आहे कारण ते संशोधनांती वास्तविकतेची उकल करतं. पण कितीही संशोधन झालं तरी बायबल मोडीत निघू शकत नाही असा मुद्दा आहे
In reply to तुमचा निष्कर्श पाहा : by संजय क्षीरसागर
पण कितीही संशोधन झालं तरी बायबल मोडीत निघू शकत नाही असा मुद्दा आहेआधी तुम्ही धारणा बदलू शकत नाहीत असं म्हटलंत, त्याला उत्तर म्हणून मी बदललेल्या धारणा दाखवून दिल्या. त्यावर तुम्ही बायबल मोडीत निघू शकत नाही असा वेगळाच मुद्दा मांडत आहात. 'धारणा' किंवा 'मोडीत निघणे' याच्या तुमच्या व्याख्या तुम्ही सांगितल्याशिवाय चर्चा पुढे कशी सरकणार? व्याख्या न देता हवी ती विधानं करण्याचा तुमचा अधिकार बजावू शकता याबद्दल शंका नाही, पण त्यामुळे तुमच्याशी चर्चा करण्यात असलेला माझा रस टिकून कसा रहाणार?
In reply to जरा स्पष्ट सांगा by राजेश घासकडवी
असा वेगळाच मुद्दा मांडत आहाततुम्ही माझा पहिलाच प्रतिसाद नीट वाचला असता तर म्हणणं लक्षात आलं असतं. १) विज्ञान वास्तविकाची उकल करतं आणि त्यामुळे धर्मग्रंथातल्या चुकीच्या कल्पना बाद होतात आणि होत राहतील. त्यामुळे हा लेख विषेश असं काही सांगत नाही. २) याचा अर्थ विज्ञान निरर्थक आहे असा नाही. वैज्ञानिक संशोधनानं मानवी जीवनात अमूलाग्र क्रांती घडवली आहे आणि अनेक अंधश्रद्धांपासून माणसाला मुक्त केलं आहे. ३) धर्मग्रंथात चुकीची वास्तविकता (पृथ्वी सूर्याभोवती फिरते) नोंदवली गेली होती आणि विज्ञानानं ती चूक सिद्ध केली हे देखील उघड आहे. ४) पण धर्म हा सत्याचा शोध आहे. सत्य आणि वास्तविकता (अॅबसल्यूट अँड रिअॅलिटी) या दोन भिन्न गोष्टी आहेत. तुम्ही सत्य म्हणजे रिअॅलिटी (वास्तविकता) अशी सरमिसळ करता आहात. आणि `सत्याचा विजय विज्ञान विरूद्ध श्रद्धा' अशा शीर्षकाखाली विचार मांडले आहेत. ५) माझं म्हणणं इतकंच आहे की विज्ञान कार्यकारण भाव आणि वास्तविकता यांचा उलगडा करतं. धर्म तुम्ही कोण आहात याचा उलगडा करतो. ६) धर्म आणि विज्ञान यात परस्परविरोध नाही. वैज्ञानिक दृष्टी असणारा, विज्ञानाची सार्थकता मान्य करून धर्माचा आभ्यास करू शकतो. बायबल हा धर्मग्रंथ आहे आणि विज्ञान कितीही प्रगत झालं तरी लोकांची त्यावरची श्रद्धा कायम आहे आणि राहिल, या अर्थानं मी सुरूवातीला म्हटलं होतं की विज्ञान लोकांच्या धारणा (कन्विक्शन्स) बदलू शकत नाही. विज्ञान धर्माला शह देऊ शकत नाही. बायबल मोडीत काढू शकत नाही.
In reply to त्यावर तुम्ही बायबल मोडीत निघू शकत नाही by संजय क्षीरसागर
सत्य आणि वास्तविकता (अॅबसल्यूट अँड रिअॅलिटी) या दोन भिन्न गोष्टी आहेत.अच्छा, म्हणजे आता तुमची सत्याचीच व्याख्या वेगळी आहे. चला, तुमची व्याख्या कळली नाही तरी फरक कुठे आहे हे तरी स्पष्ट झालं.
बायबल मोडीत काढू शकत नाही.हे विधान नुसतंच येतं. बायबलचा एक परिच्छेद सांगा जो कधीच मोडीत निघू शकणार नाही, म्हणजे त्या विधानाला काहीतरी आधार निर्माण होईल.
In reply to सत्य आणि वास्तविकता (अ by राजेश घासकडवी
In reply to माझ्या मते ....हा परिच्छेद पहा by प्रसाद गोडबोले
In reply to माझ्या मते ....हा परिच्छेद पहा by प्रसाद गोडबोले
In reply to नैतिकतेसंबंधीचा कुठल्याही by बॅटमॅन
In reply to अवांतर शंका. by आनंदी गोपाळ
In reply to माझ्या मते ....हा परिच्छेद पहा by प्रसाद गोडबोले
"धर्माच्या मार्गावर चालणार्यांचा मार्ग नेहमीच स्वार्थी अन इव्हिल ( संस्क्रुत / मराठी प्रतिशब्द नाही ) लोकांच्या अन्यायाने , छळाने व्यापलेला असेल ....... " हे कायमच सत्य असणार (कधीच मोडीत निघणार नाही ) !!अरेच्च्या हे कायम रहाणारं सत्य होय! अहो, लेखातच ही परिस्थिती कशी बदलली आहे त्याची कथा आहे. ज्योर्दानो आणि गॅलिलिओ हे खऱ्या अर्थाने righteous men होते. त्यांचा मार्ग धर्मसत्तेवर बसलेल्या tyrannical, selfish and evil लोकांनी रोखून धरला होता. पण आता परिस्थिती बदलली आहे. घ्या, निघालं हे त्रिकालाबाधित सत्य मोडीत. आणि ठळक केलेल्या वाक्यांप्रमाणे देव खरंच अशा लोकांचा नाश करतो? अहो आसपास पहा जरा - tyrannical, selfish and evil लोकं कुठे सत्तास्थानांचा सुखाने उपभोग घेताना दिसत नाहीत का?
In reply to सत्य आणि वास्तविकता (अ by राजेश घासकडवी
In reply to बर्याच वेळानं एक यथार्थ प्रतिसाद आला! by संजय क्षीरसागर
एखादी गोष्ट खरी आहे की नाही हे निरीक्षणं करून, प्रयोग करून तपासून पहाणं,मुळात एखादी गोष्ट खरी आहे का/ असू शकेल का हे पाहण्यासाठी निरीक्षण करावं वाटणं हे श्रद्धेपोटीच होतं ना? देव, दैव आणि तत्सम संकल्पनांअनुषंगाने येणारा शब्दाचा अर्थ सोडून देऊ पण वैज्ञानिकही वैज्ञानिक श्रद्धेपोटीच विज्ञानातील सत्ये शोधू जातात. कोणताही अदम्य विश्वास ही श्रद्धाच आहे, मग त्याला वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणा वा इतर काही.
आंतरिक अनुभूतींमधून आलेल्या विचारांवर विश्वास ठेवून ते सत्य मानणंतसं तर विज्ञानाने सांगितलेलीही आजची सत्यं उद्या तोकडी पडतात वा खोटी ठरतात. माहिती पुरेशी नसते. मग? जोवर ती पुढील माहिती उजेडात येत नाही तोवर त्याला सत्य मानताच ना? तीही श्रद्धाच की. नाही? बरं हे असो. एक एकदम अवांतर. मला हे मागेच बघितलं तेह्वा विचारायचं होतं, एक कुतुहल म्हणूनच केवळ.. तिकडे पण माझे मिपावरील लेखन किंवा मिपावरील नवे लेखन अशी स्वाक्षरी करता का हो?
In reply to ओके. by यशोधरा
एखादी गोष्ट खरी आहे का/ असू शकेल का हे पाहण्यासाठी निरीक्षण करावं वाटणं हे श्रद्धेपोटीच होतं ना?असं वाटत नाही किंवा असं सरसकट असतंच असं नाही. निव्वळ कुतूहल, जिज्ञासा, गरज (ही शोधाची जननी आहे) या कारणांसाठीही निरीक्षणं घडतात. काही निरीक्षणं उद्देश न बाळगता होतात. इथे निरीक्षण-उद्देश म्हणणं थोडं चूक आहे; शुद्ध गणित बहुतांशी निरुपयोगी, निरुद्देश आहे पण त्यावर संशोधन चालतं ते शुद्ध जिज्ञासेपोटी. एखादी गोष्ट खोटी असेल अशी शंका येत असेल तर त्याच गोष्टीवर श्रद्धा कशी असू शकेल? अज्ञेयवादी असं या शंकेखोर/scepticism चं भाषांतर करता येईल. शंकेखोरपणा उलट अधिक अश्रद्ध स्थिती दर्शवतो. --- वर गॅलिलेओच्या दिव्याच्या प्रयोगाचा उल्लेख आहे. हा प्रयोग करण्यामागे श्रद्धा नव्हती; हे माहितीचं उपायोजन होतं. सैद्धांतिक भौतिकशास्त्राने सिद्ध केल्यामुळे, पदार्थामधून वीजप्रवाह गेला असता प्रकाशकिरण बाहेर पडू शकतात, वीज या उर्जेच्या एका प्रकाराचं रूपांतर प्रकाश या रूपात होऊ शकतं, याची त्याला माहिती होती. कोणते पदार्थ वापरून हे रूपांतर करता येईल याचा तो प्रयोग/शोध होता. --- श्रद्धा आणि विश्वास या शब्दांचे मोल्सवर्थ शब्दकोषा*त फार उपयुक्त अर्थ सापडले नाहीत: श्रद्धा (p. 801) [ śraddhā ] f (S) Reverence or veneration. 2 Implicit faith or belief. 3 (Cant.) Ventris crepitus. v सोड, कर, & सर, सुट, हो. विश्वास (p. 765) [ viśvāsa ] m (S) Trust, confidence, reliance: also faith, belief, assurance. उपास यांचा वरचा एक प्रतिसाद त्या बाबतीत, व्याख्या नसूनही, अधिक उपयुक्त वाटला. *दुवा शिकागो विद्यापीठाच्या संस्थळाकडे जातो.
In reply to एखादी गोष्ट खरी आहे का/ असू by ३_१४ विक्षिप्त अदिती
एखादी गोष्ट खोटी असेल अशी शंका येत असेल तर त्याच गोष्टीवर श्रद्धा कशी असू शकेल?:) असं वाटत नाही किंवा असं सरसकट असतंच असं नाही. निव्वळ कुतूहल, जिज्ञासा, गरज (ही शोधाची जननी आहे) आणि क्लिंटनचाही प्रतिसाद पहावा.
In reply to एखादी गोष्ट खोटी असेल अशी by यशोधरा
In reply to सहमत आहे by पैसा
In reply to ज्योताय, (श्रेयअव्हेरः यशो) by पिवळा डांबिस
In reply to ज्योताय, (श्रेयअव्हेरः यशो) by पिवळा डांबिस
In reply to प्रतिसाद आवडला by पैसा
या प्रश्नाचं उत्तर ज्याचं त्याने आपल्यापुरतं द्यावं.हीच तर ग्यानबाची मेख आहे ना! ज्याने त्याने आपल्यापुरतंच ठेवलं असतं तर चर्चेचा किंवा मतभेदाचा प्रसंगच कशाला आला असता? लेखात विज्ञान आणि सत्य यांचा उहापोह केला आहे. एखादी गोष्ट मी माझ्यापुरती ठेवली तरी ती सत्यच आहे असं ठरत नाही ना?
अगदी खरं सांगायचं तर एखाद्याची विज्ञानावरही श्रद्धा असू शकेल! विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, त्याच्या विरुद्ध अज्ञानच असू शकते. इथे मला अर्धवटरावांचं म्हणणं पटतंय की विज्ञान आणि श्रद्धा या एकमेकांच्या विरोधी गोष्टी नाहीत तर विज्ञान आणि अज्ञान किंवा भीती या एकमेकांच्या विरुद्ध गोष्टी आहेत.असहमत. विज्ञानावर जर एखाद्याची श्रद्धा असेल तर ती अंधश्रद्धाच म्हणायला हवी. मुळात विज्ञान हे स्वतःला नेहमी तावून्-सुलाखून घेत असतं. म्हणूनच जुनी तथ्यं पुन्हापुन्हा परिक्षीली जातात, काही स्वीकारली जातात काही नाकारली जातात. कोणत्याही बाबतीत, मग ते विज्ञान का असेना जर श्रद्धा बाळगली तर तो वैज्ञानिक दृष्टीकोन असू शकत नाही. मी मानतोय म्हणून ते (माझ्यापुरतं का असेना) सत्य आहे असा दृष्टीकोन वैज्ञानिक कसा असू शकेल?
In reply to या प्रश्नाचं उत्तर ज्याचं by पिवळा डांबिस
एखादी गोष्ट मी माझ्यापुरती ठेवली तरी ती सत्यच आहे असं ठरत नाही ना?आजचं सत्य उद्या तेच राहील याची खात्री नसते. गणपती होता की नव्हता केवळ या गोष्टीबद्दल माझं उत्तर मला माहित आहे. दुसर्याचं उत्तर तेच असेल असं सांगता येत नाही. पण म्हणून त्याला मी हसावं असं काही नाही. काही वर्षांनी मी चूक ठरू शकते. आज केवळ वादात "जितं मया" चं समाधान मिळवलं तरी काही वर्षांनी तेच सत्य असेल असेही नाही. श्रद्धा ही वैयक्तिक बाब आहे. त्याचे सामाजिक दुष्परिणाम अंधश्रद्धेइतके भयानक नसतात.
अगदी खरं सांगायचं तर एखाद्याची विज्ञानावरही श्रद्धा असू शकेल!हे मी समजूनच लिहिले आहे. अगदी तुमचं स्वतःचं उदाहरण घ्या. तुम्ही जे शिकलात किंवा जे काम करताय त्यावर तुमची श्रद्धा नसेल तर त्यावर आधारित संशोधनाचं काम तुम्ही करू शकणार नाही. निष्ठा याचा दुसरा अर्थ श्रद्धा आहे. न्यूटनपूर्वी अंधारयुग होतं समजा. न्यूटनने एक पाऊल टाकलं. आईन्स्टाईन त्याच्यापुढे गेला. नारळीकर, हॉकिंग आणखी पुढे गेले. उद्या आणखी कोणी याच्याही पुढे जातील. म्हणून न्यूटन आणि आईन्स्टाईन यांच्या कामाची किंमत आज शून्य समजायची का? ते विज्ञाननिष्ठ नव्हते तर अंधश्रद्धाळू होते असं आता म्हणायचं का? दुसरी गोष्ट. विज्ञान हे प्रवाही आहे. कालचे संशोधन आज जुने होते. आजचे उद्या जुने होईल. ज्यांची विज्ञानावर श्रद्धा आहे तेच हे प्रवाहित्व समजून घेऊ शकतील, आणि त्यांना ते बिनतक्रार मान्य असेल. उलट ज्यांची विज्ञानावर अंधश्रद्धा असेल तर ते म्हणतील की मला माहित आहे तिथेच सगळं संपलं. त्यापुढे काही असू शकत नाही. मी ज्याला श्रद्धा, विश्वास म्हणत आहे त्याचा अर्थ तुम्ही अंधश्रद्धा असा घेतला आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक काय ते मला वाटतं आता पुरेसं स्पष्ट लिहिलं आहे. बाकी ज्या मंडळींची स्वतःवर अंधश्रद्धा आहे त्यांच्याबद्दल मी काहीच बोलत नाहीये. पण तुमचे संस्कृत आणि मराठी शब्द पक्के आहेत याची माहिती आहे म्हणून इतकं लिहिलं. यापुढे काही गप्पाटप्पा असतील त्या खरडवहीत करू!
In reply to एखादी गोष्ट खोटी असेल अशी by यशोधरा
In reply to एखादी गोष्ट खरी आहे का/ असू by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to वरच्या प्रतिसादात एक by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to वरच्या प्रतिसादात एक by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to 'शब्दकोष' हे माझ्या by पिशी अबोली
In reply to नेटवर पाहिले तर कोश आणि कोष by बॅटमॅन
In reply to नेटवर पाहिले तर कोश आणि कोष by बॅटमॅन
In reply to अभिजन, बहुजन आणि मित्रप्रेम by ३_१४ विक्षिप्त अदिती
मराठी भाषेसाठी शुद्धलेखन हा एक महत्त्वाचा पैलू असल्यामुळे रहावलं नाही.असं मिपावर जाहीर लिहिल्याबद्दल हिला दहा दिवसांसाठी निलंबित करण्यात यावं असा प्रस्ताव मी मांडत आहे! एनी अनुमोदक? :)
In reply to कैच्या कै!! by पिवळा डांबिस
In reply to कैच्या कै!! by पिवळा डांबिस
In reply to अभिजन, बहुजन आणि मित्रप्रेम by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to ओके. by यशोधरा
एक एकदम अवांतर. मला हे मागेच बघितलं तेह्वा विचारायचं होतं, एक कुतुहल म्हणूनच केवळ.. तिकडे पण माझे मिपावरील लेखन किंवा मिपावरील नवे लेखन अशी स्वाक्षरी करता का हो?अवांतर आहे हे कबूल केलंत म्हणून बरं झालं. खरडवही असताना धाग्यावर जाहीर विचारणा करण्याचं कारण काय हा प्रश्न आहेच. पण इथे विचारलंत म्हणून इथे सांगतो. मी 'तिकडे' किंवा 'दुसरीकडे कुठेतरी' काय करतो याविषयी तुम्ही कृपया प्रश्न विचारू नयेत. कारण ते माझं मिपाबाहेरचं व्यक्तिगत आयुष्य आहे. फक्त एवढंच सांगतो, की 'तिकडचे' संपादक असले वैयक्तिक आणि खोचक प्रश्न चालवून घेत नाहीत.
In reply to व्याख्या by राजेश घासकडवी
In reply to > फक्त एवढंच सांगतो, की by यशोधरा
इकडच्या संपादकांची व्यक्तीस्वातंत्र्यावर श्रद्धा आहे, त्यामुळे दुसर्या संस्थळाच्या जाहिराती चालवून घेतात.सहमत आहे. संवाद आणि छायाप्रकाश या संकेतस्थळांची जाहिरात मलाही मिसळपाव या संकेतस्थळाच्या संपादकांनी चालवून घेतल्यामुळे पाहता आली.
In reply to सहमत by आजानुकर्ण
In reply to मी मिपाची जाहिरातही करते. by यशोधरा
बरं हे असो. एक एकदम अवांतर. मला हे मागेच बघितलं तेह्वा विचारायचं होतं, एक कुतुहल म्हणूनच केवळ.. तिकडे पण माझे मिपावरील लेखन किंवा मिपावरील नवे लेखन अशी स्वाक्षरी करता का हो?या मुद्द्याशी निदान तुम्ही स्वतः सुसंगत असावे या हेतूने छायाप्रकाश या संकेतस्थळावर तुम्ही मिपाची जाहिरात करावी असे सुचवावेसे वाटते. संवाद या संकेतस्थळावर मिपाची जाहिरात सापडली आहे.
In reply to दुरुस्ती आवश्यक by आजानुकर्ण
In reply to छायाप्रकाशवर करता येत नाही, by यशोधरा
In reply to निदान by आजानुकर्ण
In reply to येईल की. बरेच काही करता येईल. by यशोधरा
In reply to या तिरप्या प्रतिसादांच्या by धन्या
In reply to good to see you too. by यशोधरा
In reply to हे by प्रसाद गोडबोले
In reply to अजून बराच वाव आहे. by मोदक
In reply to लिहिणारा आयडी किती तिरपा आहे by कवितानागेश
In reply to एका अँगलने लेख उत्तम आहे. by अर्धवटराव
In reply to एका अँगलने लेख उत्तम आहे. by अर्धवटराव
In reply to +१ by प्यारे१
भारतीय तत्वज्ञान>> तुम्हाला हिंदु तत्वज्ञान असे म्हणायचे आहे का ?
In reply to भारतीय ?? by प्रसाद गोडबोले
In reply to एका अँगलने लेख उत्तम आहे. by अर्धवटराव
In reply to एका अँगलने लेख उत्तम आहे. by अर्धवटराव
In reply to >>>रिचर्ड लेन्स्की नावाच्या by प्यारे१
ह्याबद्दल अधिक माहिती कुठं मिळेल????मी या विषयावर एक लेखमाला लिहिलेली आहे.
In reply to ह्याबद्दल अधिक माहिती कुठं by राजेश घासकडवी
त्या शिवाय Flat Earth Society खरेच अस्तित्वात आहे! त्यांचे विचार वाचण्यासारखे आहेत! In reply to चांगला लेख by विकास
" एकुणच सगळेच अनुभव हे इंदिर्यां मार्फत येत असतात , आणि इन्द्रियां मार्फत येणारे अनुभव डिल्युजनल असतात (जसे मृगजळ / पाण्यात सरळ काठी वाकडी दिसणे / पृथ्वी सपाट भासणे इ.इ. ) ... कदाचित हे सगलंच खोट आहे ...मी गाढ स्वप्नात निजलोय ... इतक्या गाढ की ह्या गोष्टी खर्या भासताहेत ... आणि "मी आहे (कारण मी हा विचार करतोय ) " ह्या व्यतिरिक्त हे बाकी काही सत्य आहे हे कोणत्याही प्रकारे प्रुव्ह करता येणार नाही . "वेड लागलं मला वेडं लागलं वेडं लागलं =))
फार उत्तम लेख आहे. आवडला.