आत्महत्या बळीच्या तू रोख वामना
आत्महत्या बळीच्या तू रोख वामना
.
लाजुनी पाहिले ना रोखून पाहिले
तूज ग्रंथाप्रमाणे वाचून पाहिले
वाढला हा दुरावा स्नेहात का तुझ्या
लाख गुन्हे तरी मी झाकून पाहिले
साथ देण्यास माझे मी हात जोडले
मख्ख मुद्रेत त्याने त्रासून पाहिले
क्रोध ताब्यात माझ्या मी आणतो म्हणे
चांदणे मस्तकाला घासून पाहिले
नम्रता रोमरोमी भिनते म्हणून मी
गाढवांच्या पुढेही वाकून पाहिले
काल अग्नीपरीक्षा त्यांनीच घेतली
कोंबड्यासारखे मज भाजून पाहिले
पूर्ण झाले उणे मी मातीत मिसळता
हातचे मी तरी ना राखून पाहिले
सोंग केलेय त्याने ना ऐकले जणू
प्रश्न भाग्यास जेव्हा टाकून पाहिले
आत्महत्या बळीच्या तू रोख वामना
मी ’अभय’दान इतुके मागून पाहिले
- गंगाधर मुटे
------------------------------------------------
वृत्त : अभयकांती....@
लगावली : गालगा गालगागा गागाल गालगा
------------------------------------------------
@ - अशा वृत्ताची नोंद आहे किंवा नाही, ते शोधावे लागेल.
पण हे वृत्त हरवून जाऊ नये म्हणून मी तात्पुरते नाव दिले आहे.
ही लय मला खूप आवडली. मस्त ठसकेबाज आणि ठेकेबाज गझलेची चाल तयार होतेय.
गेय गझलेसाठी फ़ारच मोहक आहे हे वृत्त.
------------------------------------------------
In reply to . by आशु जोग
वामन म्हणजे वामनच
अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही पुराणकाळातील गोष्टी करताय .
आम्हाला वाटलं बळीराजाच्या आजच्या स्थितीबद्दल काही भाष्य करताय.
बळीराजा आज सुखात आहे. कारण आज वामन उरला नाही.In reply to . by आशु जोग
पण वामनाने बळीराजाला पाताळात गाडल्यापासून, अगदी पुरातन काळापासून शेतकरी जो दरिद्रीत गेला तो काही केल्या सुबत्तेत येतच नाहीये, हे कटू आहे.
म्हणजे शिवाजी महाराज, जिजामाता यांच्या काळात सुद्धा तो दारीद्र्यात होता का ?
महाराजांना आपण शेतकर्यांचा राजा म्हणतो.In reply to पण वामनाने बळीराजाला पाताळात by आशु जोग
तुम्हीच सांगा ज्याने शेतकर्याला पाताळात गाडले त्यानेच शेतकर्याच्या पुनरुत्थानाही जबाबदारी घ्यायला नको काय?
मुटेजी आपले शेतीविषयक लेख आम्ही वाचतो
पण एक शंका म्हणून विचारतो
आज वामन कोठून आणायचा ?
In reply to तुम्हीच सांगा ज्याने शेतकर् by आशु जोग
In reply to आशु जोग.. यांच्याशी सहमत!!!.. by मृगनयनी
वामना'पेक्षा शेतकर्यांना गाडणार्या "कृषिमन्त्र्या"ना मुटेंनी हा प्रश्न विचारला असता.. तर अधिक उचित ठरले असते.गेली अनेक वर्षे हेच काम करत आलोय. पुढेही तेच करणार आहे. मात्र केवळ सध्याचेच कृषिमंत्री 'वामन' आहेत असे नसून यापूर्वीचे सर्वच कृषिमंत्री, पंतप्रधान हे वामनाचेच वंशज होते, हेही लक्षात घ्यायला हवे. राजकिय सोईचे तत्वज्ञान मांडणे अजून तरी मला शिकता आलेले नाही.
In reply to कविता आवडली by पैसा
"काल अग्नीपरीक्षा त्यांनीच घेतली कोंबड्यासारखे मज भाजून पाहिले"अगदी अगदी!
In reply to मस्तच. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to . by आशु जोग
आजच्या आत्महत्या पुराणातला काही हजार वर्षापूर्वीचा वामन कसा रोखणार?याचे उत्तर कठीण नाही,वेगवेगळ्या तर्हेची उत्तरे जशी मला देता येईल, तशी बहूतेक मिपाकर सुद्दा उत्तर देऊ शकतील. या पेक्षा शेतकर्यांच्या आत्महत्या वामन नाही रोखणार तर कोण रोखणार? हाच प्रश्न अत्यंत जटील आहे. याचे उत्तर सध्यातरी कोणाकडेच नाही. शेतकर्यांच्या आत्महत्त्या एकहाती रोखू शकेल असा मनुष्य सबंध भुतलावर तरी आज उपलब्ध नाहीये. शेतकर्यांच्या समस्या सोडविण्याचे सामर्थ्य ना कृषिमंत्र्यात आहे ना पंतप्रधानात. शेतकर्यांना न्याय देण्यासाठी संपूर्ण व्यवस्थाच बदलने गरजेचे आहे.
In reply to . by आशु जोग
मला वाटते वामन आता नाही. तो चिरंजीव नाही.वामन नाही? कवितेत वामन शब्द आल्याबरोबर दोन वर्षात माझा धागा पहिल्यांदाच गाजायला आणि वाजायला निघाला आहे. वामन अजूनही तुमच्या आणि माझ्या मनात जिवंतच आहे. आणि वामनी वृत्ती? ती तर अजरामर आहे. खुर्चीवर बसणारा प्रत्येक सत्ताधारी शेतकर्याला गाडायलाच निघतो. काही सत्ताधारी वामनाचेही बाप निघतात. वामनाने बळीराजाला एकचदा गाडले. हे तर दररोज गाडतात.
In reply to मस्तच. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपण बरेच प्रश्न उपस्थित केले आहे. प्रतिसादातून त्या सर्व प्रश्नांचा उहापोह करणे शक्य होत नाही. मात्र एकएक मुद्दा घेऊन चर्चा केल्यास काहीतरी उपयोगाचे होऊ शकते.
प्रश्न मी नाही उपस्थित केले, आपण जे लिहिलत ते जबाबदारीने समजावून द्या
शंकांचे निरसन करावे
In reply to तुमच्या लिखाणात तुम्ही by आशु जोग
तुमच्या लिखाणात तुम्ही म्हटल्याप्रमाणे वामन कोठून आणायचावामन आणायचा असे मी कुठे म्हटले? वामन म्हणजे काय बकरीच पिल्लू आहे? की बांधला गळ्याला दोर आणि आणले ओढत! शिवाय वामन कोठून आणायचा याचा विचारही करता येईल पण कशाला आणायचा याचे कारण तर मला तुमच्याकडून जाणून घ्यावे लागेल ना?
In reply to तुमच्या लिखाणात तुम्ही by गंगाधर मुटे
तुम्हीच सांगा ज्याने शेतकर्याला पाताळात गाडले त्यानेच शेतकर्याच्या पुनरुत्थानाही जबाबदारी घ्यायला नको काय?
वामन आणायचा असे मी कुठे म्हटले?
संपादकमहोदय
मुटेकाका यांची वरील दोन विधाने पहावीत. हा धागा सिरीयस असेल तर इथे असला कालापव्यय नको.
जे लिहीलं त्याचा खुलासा मिळाला तर बरे होइल.
मुटेकाका,
तुमचेच मुद्दे तुम्ही खोडून काढताय.
आणि एकूण तुम्ही काय लिहिलय हेही तुम्हाला सांगता येत नाहीये
शीर्षकदेखील तुम्ही स्पष्ट करु शकत नाही.
In reply to . by आशु जोग
In reply to तुमच्या सामोर पेश करायचे काय? by गंगाधर मुटे
शेतकर्यांच्या आत्महत्या वामन नाही रोखणार तर कोण रोखणार? हाच प्रश्न अत्यंत जटील आहे. याचे उत्तर सध्यातरी कोणाकडेच नाही. शेतकर्यांच्या आत्महत्त्या एकहाती रोखू शकेल असा मनुष्य सबंध भुतलावर तरी आज उपलब्ध नाहीये. शेतकर्यांच्या समस्या सोडविण्याचे सामर्थ्य ना कृषिमंत्र्यात आहे ना पंतप्रधानात. शेतकर्यांना न्याय देण्यासाठी संपूर्ण व्यवस्थाच बदलने गरजेचे आहे. बळीराजा डॉट कॉम पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.
वामन आणायचा असे मी कुठे म्हटले? वामन म्हणजे काय बकरीच पिल्लू आहे? की बांधला गळ्याला दोर आणि आणले ओढत!
शेतकर्याच्या पुनरुत्थानाही जबाबदारी वामनाने घ्यावी यासाठी त्याला तो कुठे आहे, याचा शोध घेऊन मी त्याला पकडून आणून तुमच्या सामोर पेश करायचे काय? की वामनाला चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि मी त्याचा बॉस आहे असे समजून शो कॉज नोटीस द्यावा? बळीराजा डॉट कॉम पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.कवी- गन्गाधर मुटे...यांची ही वामना'कडे (पदर पसरुन) अभयदान मागणारी प्रार्थना किन्वा कविता वाचल्यावर ----... 'एका (विद्रोही) कवीमनाच्या मानसिक हिन्दोळ्यांचे (वाट्टेल तसे) हेलकावे'... असेच वर्णन करावेसे वाटते.... :) असो... :) :) मुळात कवीला हे मान्य आहे.. की काही हजारो वर्षांपूर्वी ज्या वामनाने(भगवान महाविष्णु'च्या बटुअवताराने) बळी'नामक एका राजाला पाताळात गाडले होते.. तो वामन-बटु बळीला पाताळात गाडून कधीच तपश्चर्येला दक्षिणेकडे निघून गेला. आणि नन्तर आपले अवतारकार्य सम्पवून पुन्हा महाविष्णुच्या मूळरूपातही समाविष्ट झाला. पण अजून तो लाखो वर्षांपूर्वीचा तेजस्वी वामनबटु कवीच्या मनात मात्र कायमस्वरूपी घर करून आहे. त्यामुळेच कवी वामनाकडे याचना करीत आहे. पण सध्या होणार्या शेतकर्यांच्या आत्महत्यांना सर्वस्वी जबाबदार असलेले आणि मुख्य म्हणजे.... सध्या जिवन्त असलेले प्रत्यक्ष कृषीमन्त्री किंवा पन्तप्रधान हे 'जबाबदार' लोक देखील आत्महत्या थाम्बवण्यासाठी काहीही करू शकत नाही / शकलेले नाही/ शकणारही नाही........ हे अन्तिम सत्यही कवी नाकारू शकत नाही. ..(केवढा मोठा दैवदुर्विलास्स्स!!!!! ) आणि कवीची खरी कुचम्बणा येथेच्च सुरु होते.... कारण कवी प्रत्यक्ष रीत्या "कृषिमन्त्र्या"ना काहीच करू शकत नाही.. कदाचित कवीला येथे "कृषिमन्त्र्या"चा चेहरा पाहिला..की बहुधा वामनबटु'कडून पाताळात गाडल्या गेलेल्या "बळीराजा"चा चेहरा आठवत असावा!!! =)) =)) फक्त फरक इतकाच्च की वामनबटुने 'त्या'बळीच्या मस्तकावर पाऊल ठेवून त्याला पाताळात गाडले...आणि या बळी-मन्त्र्या'च्या मात्र मुखकमलावर वामनाचा पाय पडलेला दिस्तोये... त्यामुळेच ते 'मुखकमल'कायमचेच वाकडे घडवून दिल्यासारखे वाट्टे!!!! असो.... सान्गण्याचा मुद्दा.. इतकाच.. की सध्या'च्या शेतकर्यांच्या होणार्या आत्महत्यांना जबाबदार असणार्या सध्या'च्या कृषिमन्त्र्या'वर उर्फ बळी-मन्त्र्या'वर कवी'चा राग नाही... किन्वा जरी असला.. तरी तो इथे व्यक्त करण्याची हिम्मत कवीमध्ये नाही...( हा हा.. न जाणो... पुढच्या साहित्य सम्मेलनात कवी'वर बन्दी वगैरे घातली तर्र्र? ;) ) मग.. हा राग कवी वामना'वर व्यक्त करतो... कधी वामनाला बकरीचे पिल्लू.. तर कधी चतुर्थश्रेणी कामगार म्हणवून घेतात...आणि स्वतःची विद्रोही 'भडास' काढतात...त्यामुळे आपल्याला कळतच्च नाही.. की कवीचे दु:खाचे नक्की कारण काय आहे?--- कवीला नक्की राग कश्याचा आहे?.... गलिच्छ राजकारण्यांमुळे हतबल शेतकरी आत्महत्या करताहेत याचा.. की लाखो वर्षांपूर्वी वामनाने बळीला पाताळात गाडले.. याचा? बरं.. वरती एका ठिकाणी आशू जोग' यांनी विचारलेला एक प्रश्न मात्र कवीने अनुत्तरीतच ठेवला.. तो म्हणजे "शिवाजींच्या काळात शेतकरी आत्महत्या करीत होते का?.. आणि जर नसतील.. तर मग सध्याच्या आत्महत्यांना 'वामन' कसा काय जबाबदार ? आणि या प्रश्नाचे उत्तर मात्र कवीने अत्यन्त खुबीने टाळलेले आहे....असो!...... एकन्दरीत कवी'चा राग नक्की कुणावर आणि का आहे.. ह्याचे उत्तर तर सर्वांनाच माहित आहे..... असो!... बाकी वामन म्हणा..परशुराम म्हणा... किन्वा गौतम बुद्ध म्हणा..... सगळे 'आपल्या' भगवान महाविष्णुचेच्च अवतार... नाही का?... प्रत्येक अवतारात लोकांच्या कल्याणासाठीच्च आणि उद्धारासाठीच्च कार्य केले गेले आहे.. नाही का? :) :) :)
In reply to शेतकर्यांच्या आत्महत्या वामन by मृगनयनी
कवी- गन्गाधर मुटे...यांची ही वामना'कडे (पदर पसरुन) अभयदान मागणारी प्रार्थना किन्वा कविता वाचल्यावर ----... 'एका (विद्रोही) कवीमनाच्या मानसिक हिन्दोळ्यांचे (वाट्टेल तसे) हेलकावे'... असेच वर्णन करावेसे वाटते....तसे करण्याचा रसिक/समिक्षक/टिकाकार या नात्याने तुम्हाला अधिकार आहे.
मुळात कवीला हे मान्य आहे.. की काही हजारो वर्षांपूर्वी ज्या वामनाने(भगवान महाविष्णु'च्या बटुअवताराने) बळी'नामक एका राजाला पाताळात गाडले होते.. तो वामन-बटु बळीला पाताळात गाडून कधीच तपश्चर्येला दक्षिणेकडे निघून गेला. आणि नन्तर आपले अवतारकार्य सम्पवून पुन्हा महाविष्णुच्या मूळरूपातही समाविष्ट झाला. पण अजून तो लाखो वर्षांपूर्वीचा तेजस्वी वामनबटु कवीच्या मनात मात्र कायमस्वरूपी घर करून आहे. त्यामुळेच कवी वामनाकडे याचना करीत आहे.हे कविला मान्य आहे, हे तुम्हाला कोणी सांगीतले? दोन तीन प्रतिसादावरून एखाद्या कविला काय वाटते, हे ठरवणे, हा फारच उथळपणा झाला.
पण सध्या होणार्या शेतकर्यांच्या आत्महत्यांना सर्वस्वी जबाबदार असलेले आणि मुख्य म्हणजे.... सध्या जिवन्त असलेले प्रत्यक्ष कृषीमन्त्री किंवा पन्तप्रधान हे 'जबाबदार' लोक देखील आत्महत्या थाम्बवण्यासाठी काहीही करू शकत नाही / शकलेले नाही/ शकणारही नाही........ हे अन्तिम सत्यही कवी नाकारू शकत नाही.यात कसला आला दैवदुर्विलास्स्स ??????
आणि कवीची खरी कुचम्बणा येथेच्च सुरु होते.... कारण कवी प्रत्यक्ष रीत्या "कृषिमन्त्र्या"ना काहीच करू शकत नाही..अपुर्या माहितीच्या आधारे केलेले भाष्य. भाष्य करायची हौस भागविण्याचा प्रकार.
कदाचित कवीला येथे "कृषिमन्त्र्या"चा चेहरा पाहिला..की बहुधा वामनबटु'कडून पाताळात गाडल्या गेलेल्या "बळीराजा"चा चेहरा आठवत असावा!!! फक्त फरक इतकाच्च की वामनबटुने 'त्या'बळीच्या मस्तकावर पाऊल ठेवून त्याला पाताळात गाडले...आणि या बळी-मन्त्र्या'च्या मात्र मुखकमलावर वामनाचा पाय पडलेला दिस्तोये... त्यामुळेच ते 'मुखकमल'कायमचेच वाकडे घडवून दिल्यासारखे वाट्टे!!!!एखाद्याच्या शारिरिक व्यंगावर केलेले हिणकस भाष्य.
सध्या'च्या शेतकर्यांच्या होणार्या आत्महत्यांना जबाबदार असणार्या सध्या'च्या कृषिमन्त्र्या'वर उर्फ बळी-मन्त्र्या'वर कवी'चा राग नाही... किन्वा जरी असला.. तरी तो इथे व्यक्त करण्याची हिम्मत कवीमध्ये नाही.अपुर्या माहितीच्या आधारे केलेले भाष्य.
कधी वामनाला बकरीचे पिल्लू.. तर कधी चतुर्थश्रेणी कामगार म्हणवून घेतात...आणि स्वतःची विद्रोही 'भडास' काढतात...मला वाट्ते कदाचित हा माझ्या वरील प्रतिसादाच विपर्यास असावा. वामन कुठून आणायचा याला ते दिलेले उत्तर होते.
कवीला नक्की राग कश्याचा आहे?.... गलिच्छ राजकारण्यांमुळे हतबल शेतकरी आत्महत्या करताहेत याचा.. की लाखो वर्षांपूर्वी वामनाने बळीला पाताळात गाडले.. याचा?दोन्हीचा. राजकारणी आणि वामन या दोघांचाही राग आहे. दोनपैकी एकच पर्याय मी निवडला पाहिजे, यासाठी मी पाखंडी धर्मवादी किंवा बेगडा धर्मनिरपेक्षतावादी नाहीये.
एका ठिकाणी आशू जोग' यांनी विचारलेला एक प्रश्न मात्र कवीने अनुत्तरीतच ठेवला.. तो म्हणजे "शिवाजींच्या काळात शेतकरी आत्महत्या करीत होते का?.. आणि जर नसतील.. तर मग सध्याच्या आत्महत्यांना 'वामन' कसा काय जबाबदार ? आणि या प्रश्नाचे उत्तर मात्र कवीने अत्यन्त खुबीने टाळलेले आहेपहिला बळी शेतकर्यांचा गंगाधर मुटे - Mon, 20/05/2013 - 21:37 ही पोस्ट वाचा. तुमच्या पोस्टच्या आधीची पोस्ट आहे ती.
एकन्दरीत कवी'चा राग नक्की कुणावर आणि का आहे.. ह्याचे उत्तर तर सर्वांनाच माहित आहे..पण मला माहित नाहिये. सर्वांच्या मनात काय आहे, हे छाती ठोकून सांगायला मी काही तुमच्यासारखा अंतर्ज्ञानी किंवा अंतर्यामी नसेल बहूतेक.
बाकी वामन म्हणा..परशुराम म्हणा... किन्वा गौतम बुद्ध म्हणा..... सगळे 'आपल्या' भगवान महाविष्णुचेच्च अवतार... नाही का?... प्रत्येक अवतारात लोकांच्या कल्याणासाठीच्च आणि उद्धारासाठीच्च कार्य केले गेले आहे.वामन-परशुराम-गौतम बुद्ध यांच्या तुलनेचं प्रयोजन कळलेल नाही. मात्र एवढे मात्र म्हणता येईल आजचे सत्ताधारी सुद्धा जनकल्याणाचाच नारा देत असतात. देशवासियांना स्वस्तात खायला मिळाले पाहिजे याच धोरणापायी शेतकरी देशोधडीला लागत असतो. त्या अर्थाने दिल्लीचे सत्ताधारी देखील सगळे 'आपल्या' भगवान महाविष्णुचेच्च अकरावे अवतार आहेत, असे कुणी म्हणत असेल तर मी आक्शेप नोंदवणार नाही. :)
In reply to तुमच्या सामोर पेश करायचे काय? by गंगाधर मुटे
In reply to . by आशु जोग
In reply to माझे कुठलेच विधान उलटसुलट by गंगाधर मुटे
In reply to . by आशु जोग
आणखी एक उलटे विधान.चला.एकदाचा या मुद्द्याचा सोक्षमोक्ष लावून टाकू. कोणते विधान माझे उलट सुलट आहे? सांगा.
In reply to . by आशु जोग
संपादक पाहतील योग्य काय तेआणि वारंवार संपादकांना का मध्ये घातले जात आहे?
In reply to सरकार निष्क्रिय । नेते धरणे by अविनाशकुलकर्णी
यांच्या बद्दल कुणाची ब्र काढायची हिम्मत नाहीआशा आहे की, हे वाक्य मला उद्देशून नसेल.
अन वामनाच्या शेंडीला का हात घालता???वामनाने बळीराजाला पाताळात गाडले, असा परंपरागत समज आणि पौराणिक पुरावा आहे म्हणून.
In reply to हे वाक्य मला उद्देशून नसेल. by गंगाधर मुटे
वामनाने बळीराजाला पाताळात गाडले, असा परंपरागत समज आणि पौराणिक पुरावा आहेआमच्या पुराणांचया माहीती नुसार बळीला पाताळी धाडल्या नंतर तिथला राजा बनवण्यात आले , शिवाय वर्षातुन एकदा पृथ्वीवर यायची मुभाही देण्यात आली .(की जो दिवस ओणम म्हणुन साजरा होतो केरळात ) असो. स्वतःच्या क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी (आणि हिंदु लेचेपेचे अहिंसक आहात म्हणुन ) पौराणिक घटनांचे अर्धेमुर्धे संदर्भ उचलुन वाट्टेल तसा अर्थ लावण्याच्या मनोवृत्तीचा निषेध !!
In reply to धागा थोडासा भरकटत चाललाय असे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to नाटकी बोलतात साले! by गंगाधर मुटे
बटू वामन - शेतकर्यांना आत्महत्तेस बाध्य करून पाताळात गाडणारे सर्व सत्ताधारी म्हणजे बटू वामनाचेच वारस होय.वामनाने बळी'ला पाताळात गाडले.. ते महाविष्णु'च्या पाचव्या अवतारात!...त्यानन्तर सहाव्या अवतारात महाविष्णुने "परशुरामा"चा अवतार घेतला.. सातव्या अवतारात महाविष्णु- राम होता.. आठव्या अवतारात- कृष्ण.. होता... रामाच्या युगात.---सर्व शेतकरी, जनता.. आबादीआबाद होते. आजही आपण सुबत्तापूर्ण राज्याची तुलना "रामराज्या"बरोबर करतो. जनकराजाला -पक्षी: रामाच्या सासर्यांना- शेत नान्गरत असतानाच जी पेटी सापडली--तिच्यात 'देवी- सीता' होती...द्वापारयुगात.. भगवान श्रीकृष्णाचा भाऊ- 'बलराम' याला "हलधर" असेही म्हटले जाते... त्याच्या काळात / राज्यातही शेतकर्यांची स्थिती उत्तम होती. बलराम हा स्वतः शेतकरी होता..नान्गर हे त्याचे शस्त्र होते.. अगदी कलीयुगाच्या सुरुवातीलाही आकाश राजाच्या भाताच्या शेतीमध्ये एका शुभ्र-सहस्त्रदलकमलामध्ये लक्ष्मीस्वरूपा- देवी पद्मावती... ही सापडली गेली.. व पुढे ती तिरुपती-बालाजीची द्वीतिय पत्नी बनली.... तात्पर्यः- विष्णुच्या वामनावतारानन्तर त्याचे ४ अवतार होऊन गेले...तेव्हा शेतकर्यांची स्थिती ही अत्यन्त सम्पन्न होती..अर्थात तेव्हाचे राजे'देखील त्यांच्या "क्षत्रिय"धर्माला जागणारे होते. 'शेतकरी' हे आपले अन्नदाते आहेत... असेच समजून त्यांच्या गरजा पुरवण्यास आणि त्यांचे रक्षण करण्यास ते नेहमीच समर्थ असत!...अर्थात वामन-बटु-अवतारानन्तर देखील सर्व लोक 'बळी-राजा'ला महान विष्णुभक्तच्च मानत असत!.. किम्बहुना आजही मानतात. सप्तचिरंजीवींमध्ये वामनाने सुतल-पाताळात गाडलेल्या "बळी"राजाचेही नाव आजही आनन्दाने घेतले जाते. हाहा.. अर्थात लाखो-अब्जावधी वर्षांपूर्वी "वामनाने बळीला पाताळात गाडले" ही (पुराणातली) गोष्ट अगदी सोयीस्करपणे लक्षात ठेवुन सध्याच्या मॉडर्न युगात- वामन-कुळा'चा उद्धार करणार्यांचा पुराणातील सर्वच गोष्टींवर अगदी प्रगाढ विश्वास असणार.. हे तर आता उघडच आहे... नाही का?... :) त्याचबरोबर वामनानन्तरच्या सगळ्या युगांमध्ये जर शेतकरी आनन्दाने, सुबत्तेने आयुष्य जगत होता.. आणि आत्ताच्च अगदी कलीयुगाच्या मध्यात..फालतू, स्वार्थी, अप्पलपोट्या बळी घेणार्या बळीमन्त्री उर्फ -कृषी-मन्त्री- @#$%$#@&$ यांच्या गलिच्छ कारभारामुळे आणि सिस्टीममुळे जर शेतकरी आत्महत्या करत असतील.. तर त्याला 'वामन'-बटु जबाबदार कसा काय?... असा प्रश्न आम्हाला तरी पडतो...की उगीचंच वामनाला किन्वा वामन'कुळाला शिव्या घालण्यासाठी कारणं शोधण्यासाठी "बळी-राजा"चं नाव वारंवार पुढे करत रहायचं?... आणि ज्या वामना'ला आणि वामनकुळाला शिव्या घालण्याचा मोह अनेकांना आवरत नाही..... त्यांनी कृपया हेही लक्षात ठेवावे.. की ह्या वामनाचे मूळ रुप असलेल्या भगवान विष्णु'चा नववा अवतार म्हणजे- "गौतम बुद्ध"... त्यामुळे वामनाला घातलेल्या शिव्या या.. बाय डीफॉल्ट- बुद्धांनाही लागतात.... हे विसरू नये... आणि शेतकर्यांबद्दल आणि त्यांच्या आत्महत्यांबद्दल खरोखर कळवळा असेल... तर वामनाला किन्वा वामनकुळाला शिव्या घालण्यापेक्षा.. गेल्या अनेक वर्षांपासून बळीमन्त्री उर्फ कृषीमन्त्री.. जे कुणी आहेत... त्यांना आणि त्यांच्या कुळाला """उघड""पणे शिव्या घालाव्यात!!!!..परन्तु ज्या विष्णु-अवताराचा- वामनबटु'चा शेतकर्यांच्या आत्महत्यांशी काडीचाही सम्बंध नाही... त्याला कृपया बोल लावू नयेत!...अन्यथा हे बोल विष्णु'च्या ९व्या अवतारासाठीदेखील आहेत.. असे आम्ही मानू........काळजी घेणे... कृपया....... :)
In reply to शेतकर्यांच्या आत्महत्ये बाबत by मदनबाण
In reply to मुद्गल पुराण बरेच अलीकडचे आहे by प्रचेतस
In reply to . by आशु जोग
In reply to वामनामुळे आत्महत्या होताहेत by अविनाशकुलकर्णी
In reply to च्यामारी हा धागा होता काय आणि by पिंपातला उंदीर
अभिव्यक्तीचा हे जातीयवादी लोक प्रचंड विपरीत अर्थ काढत आहेत.हे मिपा आहे , इथे सगळे सुशिक्षित जबाबदार भारतीय नागरिक लोक आहेत , "जातीयता पाळने " इज अ वेरी स्ट्रॉन्ग वर्ड ! ब्राह्मण लोक फक्त "संकट समये प्राप्ते वयं पंचाधिकं शतम " ह्या वाक्याचे अनुसरण करत आहेत. राग नसावा . त.टी : खालील स्वाक्षरी नीट पाहणे .
In reply to नाही अमोल by प्रसाद गोडबोले
In reply to नाही अमोल by प्रसाद गोडबोले
त्या ज्या समाजाच्या हातात आहेत त्यांच्या विषयी सदर कवी चकार अक्षर सुध्दा का काढत नाही ... एखादी येवुदेना मस्त फक्कड कविता त्यांच्याही विषयी . तर मग बोलुयात .मी आजवर बरेच काही लिहिले आहे. तुम्ही वाचले नाही, हा माझा दोष नाही. उदा. http://www.baliraja.com/node/38 ही लिंक बघा. जे जे आलेत ते शेतकर्याच्या नरडीला नख लावूनच गेले. तलाठ्यापासून तहसीलदारापर्यंत, दलालापासून व उद्योगपतीपर्यंत आणि गावच्या सरपंचापासून ते देशाच्या पंतप्रधानापर्यंत सर्वांनीच त्याने पिकविलेल्या मालास उत्पादनखर्चापेक्षा कमी भाव देऊन शेतमालाची लयलूट करण्यासाठी हातभार लावला. त्यांच्या चुकीच्या धोरणाच्या फटक्यानेच शेतकर्याचा संसार उध्वस्त झाला. शेतीला अवकळा येण्याला केवळ आणि केवळ शासनयंत्रणाच कारणीभूत आहे. शेतीचे प्रश्न सुटत नाहीत कारण शेतकरी कधी शेतीच्या मुद्द्याच्या आधारावर मतदानच करीत नाही. जाती-पाती धर्म-पंथाच्या आधारावर मतदान करण्याचा या देशातल्या लोकशाहीला रोगच जडला आहे. निदान शेतकर्याने तरी यातून बाहेर यावे. जो शेतीचे प्रश्न सोडविणार नाही त्याला मतदानच करायचे नाही, मग तो उमेदवार त्याच्या जाती-धर्माचा का असेना, असा निश्चय करायलाच हवा. दिलेले आश्वासन पूर्ण न करणार्याला निवडणूकीच्या मैदानात लोळवायलाच हवे.
In reply to त्या ज्या समाजाच्या हातात by गंगाधर मुटे
In reply to नाही अमोल by प्रसाद गोडबोले
एक खुलासा
मी वामन हा शब्द ब्राह्मण या अर्थाने वापरला नाही. शिवाय शेतीच्या र्हासाचे कारण ब्राह्मण आहेत, असा थिल्लर विचार मी आजवर केलेला नाही. ब्राह्मण नसणारे आणि शेतकर्याच्या जातीत त्याच्याच पोटी जन्म घेणारे म्हणजे शेतकर्यांचे हितचिंतक असतात, हेही खरे नाही. शेतकर्याला ब्राह्मणांपेक्षाही त्याच्या स्वजातीयांनी जास्त लुटले आहे, हा आजवरचा आणि आजचा इतिहास आहे. www.baliraja.com/wangeamarrahe या लिंकवर आपणास बरेच काही वाचायला मिळू शकेल.In reply to एक खुलासा by गंगाधर मुटे
शेतकर्याला ब्राह्मणांपेक्षाही त्याच्या स्वजातीयांनी जास्त लुटले आहे, हा आजवरचा आणि आजचा इतिहास आहे.हे क्लॅरीफिकेशन पाहुन बरे वाटले . असो. (कुठे काही "अन्याय्य" बोलुन गेलो असेन तर क्षमाप्रार्थी आहे . )
छान..