कोल्हापुरी चटणी (कांदा-लसूण-मसाला तिखट)
ओले मसाले :
कांदा पाउण किलो लांब लांब पातळ चिरलेला व सावलीत थोडा सुकवून घेतलेला.
लसूण ३०० ग्रॅम पाकळ्या सोलून
आले सुमारे ३ इंच ,जाडसर, साल काढून
कोथिंबीर १ मोठी जुडी निवडून बारीक चिरलेली.
कोरडे मसाले :
धणे २५० ग्रॅम
जिरे १०० ग्रॅम
तीळ १५० ग्रॅम
खसखस ५० ग्रॅम
खोबरेकीस ४०० ग्रॅम
गरम मसाले :
लवंगा ७-८
हळकुंडे ६-७ ठेचून लहान तुकडे केलेली.
मेथ्या १ मोठा चमचा (टेबलस्पून)
मोहरी १ मोठा चमचा
इतर सर्व प्रत्येकी १० – १० ग्रॅम
बदामफूल दगडफूल
दालचिन जायपत्री
रामपत्री तमालपत्री
शहाजिरे नाकेश्वर
त्रिफळ काळी मिरी
मसाला वेलची खडा हिंग
जमवाजमव झाली. ही आदल्या दिवशीच करून ठेवावी लागते. दुसऱ्या दिवशी जेवण बिवण आवरून चटणीच्या नादाला लागले.
प्रथम खलबत्त्यात हळकुंडे ठेचून घेतली. मग खडा हिंग जाडसर कुटून घेतला. नंतर . आले अन लसूण किंचित ठेचून घेतले.
हे करताना कढईत दीड वाटी तेल तापत ठेवले (जेमतेम कांदा भाजला जाण्याइतपतच घ्यावे) . ते तापल्यावर चिरून सुकवलेला कांदा त्यात घातला. तांबूस होईपर्यंत मंद गॅसवर परतला. आता परात तिरकी करून त्यात वरच्या कडेला कांद्याचा ढीग घातला अन त्यातले तेल पूर्ण निथळून बाजूला काढले. हेच तेल नंतर चटणीत घालायचे आहे.
आता सर्व कोरडे मसाले एक एक करून भाजून घेतले. खरपूस भाजले जावे पण डागलू नयेत, इतपत. (मी यासाठी मावेओ वापरला.) पेपरवर पसरून ते थंड होऊ दिले.
आता पुढचे काम झटापटीचे.
सर्व गरम मसाले एक एक करून अर्धी वाटी तेलात परतले. तांबूस रंग येताच झटपट काढले पाहिजेत हे काम अतिशय तरल अवधान राखून करावे लागते. नाहीतर मसाले तोंड काळे करतात अन चटणीच्याही तोंडाला काळे फासतात. यात हिंग, हळकुंडे, दगडफूल अन शहाजिरे यांचा नंबर सर्वात शेवट ठेवावा म्हणजे तेलात जळके कण रहात नाहीत.
आता हे सर्व थंड व्हायला ठेवले अन जरा दम खाऊन मग एक कप कॉफी पोटात ढकलली.
मग सगळे समान डब्यांमध्ये भरले. म्हणजे कांदा वेगळा, आले-लसूण वेगळे, कोथिंबीर एका कॅरीबॅगेत , कोरडे मसाले एका डब्यात, गरम मसाले दुसऱ्या डब्यात अन इतर साहित्य म्हणजे मिरचीपूड, मीठ इ. वेगळे. अन हे बाचके घेऊन गेले डंकात !
डंकवालीने शिस्तीत एक एक सोपस्कार केले. प्रथम दोन वाट्या मिरचीपूड अन तळलेले गरम मसाले यांचा घास डंकाच्या मुखात भरवला अन ढांग ट्याक सुरु केले.
पहिला घास चावून होताच कोरडे मसाले मुसळाखाली ढकलले.
मसाले एकजीव झाल्यावर उरलेली मिरचीपूड अन मीठ घातले. आतापर्यंत मसाल्यांचा दरवळ घमघमू लागला होता.
मग आले लसूण, कोथिंबीर अन सर्वात शेवटी कांदा. पुन्हा सुमारे १० मिनिटे ढांग ट्याक ! की झाली खमग मरून कलर चटणी तयार !
डब्यात भरून घरी आणली. त्यात कांदा अन मसाले तळून राहिलेले तेल मिसळले अन रात्रभर झाकणाला फट राखून ठेवून दिले. कारण चटणी ओली असताना खडे होतात. दुसऱ्या दिवशी जरा सुकल्यावर हे खडे हाताने चोळून चटणी एकसारखी करून घ्यावी लागते. आता चिनी मातीच्या बरणीत भरून झाकण कपड्याने बांधून ठेवायचे, की वर्षभर टिकण्याची निश्चिंती !
रोजच्या भाजीत हीच चटणी घाला एक-दीड चमचा अन साध्या भाजीलासुद्धा नॉनव्हेजसारखी लज्जत येते की नाही बघा !
मी तर नॉनव्हेज खात नाही . मग ताज्या ताज्या चटणीचा स्वाद घ्यायला केली बैगन मसाला करी !

In reply to बाब्बो.... by दिपक.कुवेत
मे महिन्यात आमच्या कोल्हापूर सांगली भागात गल्लोगल्ली कांडप मशिनांचा ठणठणाट जोरात ऐकू येत असतो. घरोघरी बायकांची पावसाळ्याची बेगमी सुरु होते. पापड कुरडया, सांडगे यांच्याबरोबरच एक महत्वाचा विषय म्हणजे चटणीअगदी अगदी. लहानपणी आईबरोबर असा बर्याचदा गिरणीत जायचो. बाकी ते मिठाचं एकदम खरं हं. खडे मीठाची चव ब्रँडेड मिठाला येत नाही.
In reply to मस्त! चव तर काय येते पदार्थाला!! by अनन्न्या
In reply to बरेच दिवसांपासून एक प्रश्न by रेवती
In reply to माझ्या मते असं करण्यामागे by सस्नेह
In reply to निषेध! निषेध!! निषेध!!! by मोदक
In reply to ए बरं झालं बै पाक्रु दीलिस ती by जेनी...
In reply to हे हे हे... by दिपक.कुवेत
In reply to काळं तिखट. by प्यारे१
In reply to +१ by कपिलमुनी
In reply to सोबत कांदा हवा.. बुक्की मारून by मोदक
In reply to 'धनी.... ओ धनी, भाकर खावून by प्यारे१
In reply to मग एक कप कॉफी पोटात ढकलली. - by ५० फक्त
In reply to सर्व प्रतिसादकांना धन्यवाद्स. by सस्नेह
In reply to या चटणीचा by ऋषिकेश
In reply to तसा स्टँडर्ड ब्रँड कोणताच by सस्नेह
In reply to अगं सासुबैना मीच आणुन दीला by जेनी...
In reply to आँ? by पैसा
In reply to आँ? by पैसा

In reply to वॉव ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to आणि सासू-सून एक झाल्यावर....? by सस्नेह
In reply to आणि सासू-सून एक झाल्यावर....? by सस्नेह
In reply to तर मग १ आणि १ = ११ ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to तुमच्यासाठीइस्पूकाठीइस्पूकठीइ by जेनी...



In reply to आँ? by पैसा
In reply to आँ? by पैसा
In reply to आँ? by पैसा
...अगागागागागागा... 
In reply to आँ? by पैसा
In reply to कालच बनविले. by प्रभाकर पेठकर
In reply to टेस्ट कशी काय वाटली काका ? by सस्नेह
In reply to कालच बनविले. by प्रभाकर पेठकर
In reply to कालच बनविले. by प्रभाकर पेठकर
In reply to जखमेवर मसाला. by रेवती
In reply to ज्या मिसळच्या करंटचे आंम्ही by अत्रुप्त आत्मा
In reply to हक्काची मसालावाली लवकर येवो.. by सस्नेह
In reply to हक्काची मसालावाली लवकर येवो.. by सस्नेह
In reply to आग. by प्रभाकर पेठकर
In reply to वा... कोल्हापुरी मसाला ! by मदनबाण
In reply to येशेल तेल by सस्नेह
In reply to वडाकोंबडा हा मालवणी पदार्थ. by मदनबाण
In reply to येशेल तेल by सस्नेह
In reply to जबरदस्त! by नगरीनिरंजन
लहानपणी आईबरोबर कांडपात जायचो आणि त्या धडाक-थडाकच्या आवाजात मसाल्याचा वास घेत तंद्री लावून बसायचो ते आठवले.अतिशय सहमत. काय तो आवाज अन काय तो वास!!! सगळंच तंद्री लावणारं.

मस्त