दारु पुराण
काव्यरस
दारुपुराण सांगतो मी,तुम्ही ऐका शांतचित्ता
ऐका एका दारुड्याची कथा ॥धृ॥
रोज येतो दरु पिऊन
बाटली खिशामद्ये घेऊन
सांगे रुबाबात येऊन
चल वाढ मला भोजन
रोज हवी मच्छी मटण
बायको आण्ल सांगा कुठुन
रागाने ऊठतो पेटून
अर्ध्या जेवणावर ऊठुन
होते त्याची चालू,ही बडबड आता
ऐका एका दारुड्याची कथा ॥१॥
मुले कावरीबावरी होऊन
आईच्या पदराखाली लपून
ऊपाशी पोटी जाती झोपून
याची थोडीही नाही त्याला जाण
आई त्यांची कष्ट करुन
देई मुलांना चांगले शिक्षण
मुलेही हुशार आणि गुणवान
फेडतील आईचे त्यांच्या ऋण
मुलेच खरी तिची संपत्ती व सत्ता
ऐका एका दारुड्याची कथा ॥२॥
दहा तारखेला होतो पगार
जमे सारा मित्र परिवार
दरु पिऊन चाले जुगार
कोणी पिऊन होतात तर्र..
कुणा सुचेना आपले घर
कोणी पडती भर रस्त्यावर
घरी बायको पोरांना घोर
हवलदाराचा खातात मार
अशा त्यांच्या खोडी,किती वर्णाव्या मी आता
ऐका एका दारुड्याची कथा ॥३॥
पैसे संपल्यावर सारं
सारे मित्र होती पसार
घरी येई जेंव्हा आजार
कोणी लाविना त्याला हात भार
याने केला मनी विचार
हा सारा माया-बाजार
गेला वेसन्मुक्ति केंद्रावर
ऊपचार घेतले त्याने सत्वर
सुटली त्याची दारु,हे सांगे भगवंता
ऐका एका दारुड्याची कथा ॥४॥
वाचने
5364
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
मस्त गाणं आहे
In reply to मस्त गाणं आहे by संजय क्षीरसागर
+१
"ऐका सत्य नारायणाची कथा" या
In reply to "ऐका सत्य नारायणाची कथा" या by Bhagwanta Wayal
आयला!
In reply to आयला! by संजय क्षीरसागर
तिर्थ घेतल्यावर व प्रसादाच्या
निष्पाप.
In reply to निष्पाप. by प्रभाकर पेठकर
दारुड्या व्यसनमुक्त होणार
चुकीने दारू पुरण असे वाचले..
In reply to चुकीने दारू पुरण असे वाचले.. by शैलेन्द्र
जमेल जमेल न जमायला काय झालय.
दारुपुराण
In reply to दारुपुराण by दिपक वायळ
मग टाइमपास तरी काय करू?
-
In reply to - by अमोल केळकर
दुसरी एखादी चाल लावली तरी
प्रतिक्रियेबद्दल सर्वांचे