कर्माचरण
लेखनविषय:
राम नाम राहो देवा सदा माझ्या मुखी।
आयुष्य हे निघोनिया गेले फुका-फूकी॥धृ॥
जनांसंगे गेलो देवा तिर्थ यात्रेला ।
दगडच्या मुर्तिमध्ये तुला शोधियेला।
नाही भेटलास तिथं झालो मी रे दु:खी।
आयुष्य हे निघोनिया गेले फुका-फूकी॥१॥
उपवास केले नाना नवस सायास ।
लागला ना कधी देवा तुझा निजध्यास।
मंदिरात जाऊनिया नाही झालो सुखी ।
आयुष्य हे निघोनिया गेले फुका-फूकी॥२॥
ऐकले मी कीर्तन कथा प्रवचन ।
आवरेना तरी माझे चंचळ मन ।
केले अवगुण ते ही चातुर्याने झाकी ।
आयुष्य हे निघोनिया गेले फुका-फूकी॥३॥
वाचले ग्रंथ पोथ्या केले पारायण ।
नाही कळ्ले तरी कोठे आहे नारायण।
भक्तिच्या नावावर केली फेका-फेकी ।
आयुष्य हे निघोनिया गेले फुका-फूकी॥४॥
राम नाम राहो देवा सदा माझ्या मुखी।
आयुष्य हे निघोनिया गेले फुका-फूकी॥
वाचने
2312
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
झालीये कविता
प्रतिक्रियेबद्दल मनपूर्वक आभार
भक्तिच्या नावावर केली फेका-फेकी ।
वा! छान ..
बहुतांपरि संकटे साधनांची, व्रते दान उद्यापने ते धनांची, दीनाचा दयाळू मनी आठवावा.... प्रभाते मनी राम चिंतीत जावा!
शोधीशी मानवा राऊळी मंदीरी,
नांदतो देव हा ह्या तुझ्या अंतरी.
प्रतिक्रियेबद्दल सर्वांचेच मनपूर्वक आभार
मस्त! असा साधारण एक कोटी जप केला की नक्की काही तरी होणार.
In reply to राम नाम राहो देवा सदा माझ्या मुखी। by संजय क्षीरसागर
उपहास समजला.
पण काहीच न करण्यापेक्षा ही सुरुवात चांगली नाही का माऊली?
In reply to उपहास समजला. by प्यारे१
मुक्काम येण्याची शक्यता शून्य.
In reply to चुकीच्या मार्गावर कितीही चाललात तरी by संजय क्षीरसागर
खरंच? ठाऊक नव्हतं ब्वा!
सांगितल्याबद्दल धन्यवाद.
चुकिच्या मार्गावर चाललो काय किंवा सरळ मार्गावर शेवटी मुक्काम तर येणारच, यात काय शंकाच नाही.
खुप छन प्रतिसाद दिल्याबद्दल मनपुर्वक आभार..!
In reply to चुकिच्या मार्गावर चाललो काय by Bhagwanta Wayal
सध्या जिथे आहोत तोच तर मुक्काम आहे कारण स्वतःलाच तर गाठायचंय!
चांगली कविता. गेय आहे.
In reply to चांगली कविता by पैसा
प्रतिक्रियेबद्दल धन्य्वाद..! पण "गेय" कळले नाही
कविता आवडली.
In reply to चांगली झाली आहे by सुधीर
धन्यवाद...!
चांगली