हवं असं कुणीतरी

प्रिया ब जे न देखे रवी...
आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर असो तुझा साथ काटेरी वाटेवर विश्वासाचा घट्ट हात शोधात अशा मी प्रेमा तुझ्या ओवाळून टाकीन जीव तुजवर , होशील का तू माझा सख्या ? ना कधी सोडून जाईन ना अंतर तुला मी देईन वचन हे माझे नाहीत नुस्तेच शब्द , नाही हे खोटे, ना हे म्रुगजळ, तुझे आश्रू सामावण्यात - सदैव माझी ओंजळ एकट्याने जगणे नाही हे इतके सोपे एकमेकांवर अवलंबून जगण्यात देखील वेगळीच मजा असते " काळजी करू नकोस , आहे मी " असे एकच प्रेरणादायी वाक्य अनेक अडचणींना सामोरे जाणे होते ज्याने शक्य पटेल तुला हे नक्की कधीतरी तेव्हा तू ही म्हणशील , हवं असं कुणीतरी -- प्रिया
वर्गीकरण
लेखनविषय:

7 टिप्पण्या 1,790 दृश्ये

Comments

अभ्या.. नवीन

वा वा. काय कविताय. मस्त एकदम. लै म्हणजे लैच आवडली आहे. :) पुढील कवितांसाठी शुभेच्छा.

चित्रगुप्त नवीन

...." काळजी करू नकोस , आहे मी " .... यावरून "भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे" आठवले. (स्वगतः हल्ली स्त्र्यायडी खरा की लटका हे कळेनासं झालंय)