मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझा बाप

अनिल तापकीर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
भासला माझा बाप मज वटवृक्षासमान देई आम्हास सावली,सोसुनी तप्त ऊन नाही आम्हास लागू दिली, दुखाची झळ लेकरे सुखात राहावी हीच त्याची तळमळ झिजला, कष्टला,राबला अपार धैर्याने रोखले संकटांचे डोंगर आईसारखी माया करुनी ठेविला बापाचा धाक गाउनी अभंग संतांचे मार्ग दाविला नेक

वाचने 4847 वाचनखूण प्रतिक्रिया 6

ब़जरबट्टू 09/05/2013 - 17:18
कवितेसारखे सुरात वाचायला गेलो तर अडखळ्लो, म्हन्णुन शेवटी गद्य म्हणून वाचली... पण छान प्रयत्न....

Bhagwanta Wayal 10/05/2013 - 12:23
बापावर कविता लिहिणारे खुप कमी लोक असतात त्यात तुम्ही एक कविता आवडली, खास करून शेवटवे चरण.... "आईसारखी माया करुनी ठेविला बापाचा धाक। गाउनी अभंग संतांचे त्यांनी मार्ग दाविला नेक॥"