मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ऋण मातीचे..

राघव · · जे न देखे रवी...
ऋण मातीचे कसे विसरले? कुठे सोडली लाज मुलांनी? पैशाच्या माजात गोठती श्वास कोवळे कणाकणांनी.. का अब्रुचे धिंडवडे अन् देहाचे बाजार निघावे? व्यापाराचा बाज निराळा, पाप जोडती मणामणांनी.. चहुबाजूंना कोंदटलेली डबकी-नाल्या-उघडी गटारे, एक झराही दुर्लभ झाला, घाण पसरते मणामणांनी.. वाट कुणाची बघतो आपण? स्वयंप्रेरणा कुठे निमाली? मशाल जळावी प्रत्येकाची अज्ञानाच्या कणाकणांनी.. पहार बनुनी प्रहार करता ठिणग्यांची आरास उठावी, घाव घालण्या दगडांवरती देह झिजावा कणाकणांनी.. शिवरायांची माती अपुली प्राण शिंपुनी मान* धरावा, मातीमधुनी फुलत उठावे जीवन अपुले कणाकणांनी.. मुमुक्षू [*मान: अभिप्रेत अर्थ - अभिमान]

वाचने 4093 वाचनखूण प्रतिक्रिया 13

प्राजु 11/09/2008 - 20:30
अप्रतिम काव्य आहे. हे बे एरियाच्या संमेलनात पाठ्वऊन द्या. पहार बनुनी प्रहार करता ठिणग्यांची आरास उठावी, घाव घालण्या दगडांवरती देह झिजावा कणाकणांनी.. शिवरायांची माती अपुली प्राण शिंपुनी मान* धरावा, मातीमधुनी फुलत उठावे जीवन अपुले कणाकणांनी.. हे एकदम अत्युच्च्य!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

सर्किट 11/09/2008 - 22:03
अप्रतिम काव्य आहे. हे बे एरियाच्या संमेलनात पाठ्वऊन द्या. असेच म्हणतो. अधिक माहितीसाठी http://www.misalpav.com/node/2901 -- सर्किट

मदनबाण 12/09/2008 - 07:43
मस्त कविता.. वाट कुणाची बघतो आपण? स्वयंप्रेरणा कुठे निमाली? मशाल जळावी प्रत्येकाची अज्ञानाच्या कणाकणांनी.. हे फार आवडल.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

राघव 12/09/2008 - 19:44
प्रतिसाद दिलेल्या व न देऊ शकलेल्या सगळ्यांचे मनापासून आभार! :) मुमुक्षू