✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्रेमाची चाणक्यनीती (अर्थात मुली पटवायचे डावपेच)

च — चाणक्य, Sat, 04/27/2013 - 14:32
ऐक राजा चाणक्यनीती प्रेमात येते कशी उपयोगी प्रेम जरी ह्रुदयाचा खेळ खेळता डोक्याने यश निर्भेळ चाणक्य सांगतो काही युक्त्या येती फळा जर भावना सच्च्या सर्वात आधी हे जाण तू प्रेमास तुझिया प्रमाण तू दुसरा करीतो म्हणोनी केले प्रेमवीर असे पराभूत झाले जी तुला बहू आवडे प्रेमाचे तिला असे वावडे काय करशील अश्या प्रसंगी? ऐक सांगतो युक्ति जंगी विषय हलके टाळ तू बुद्धिचातुर्य दाव तू स्वप्निल गोष्टीस नकोच थारा जुळतात कुठे त्या शोध तारा असेल काय जे प्रिय तिला त्यात असावी गति तुला काम जरासे वेळ घेते जुळता तारा गति येते स्वप्नील पाखरू जर असेल ते कविता करायचे शिकून घे कार्य समजू नको सोपे स्वप्ने आवरणे काम मोठे येता पाऊस, धुके, वारा पुरुष मित्रास नकोच थारा संशय घ्यायचे काम नाही परी विषाची नको परीक्षा असता स्वभाव बहु बडबडा काय करावे सवाल खडा बोलायास तिला बहु आवडे जरी पसंत ना तुला ते काम ऐसे करीत जावे बडबडीत नाव आपुलेच यावे जमवून जर हे आणलेस तू युद्ध अर्धे जिंकलेस तू पुरुषस्वभाव हा जाण तू राजा होतात खच्ची नाव दुजे येता उगी समजती मग ही दुस-याची ईथे आपणा वाव नाही क्वचित काही प्रेमळ ऐकता नाही हुरळून जायचे स्वभाव आहे बडबडा हे ना कधी विसरायचे कसे ओळखावे ईथे मने लागली जुळायला जेव्हा शब्दांपेक्षा जास्त ईथे नजर लागते बोलायला ऐक आता सांगतो काय करावेस तू सुंदर अश्या कोणाच्या पडलास जर प्रेमात तू सौंदर्याला जरी असतो सौंदर्याचा अभिमान फार ऐकवू नकोस परि तिलाच तिच्या दिसण्याचे गुणगान फार कारण आहे सरळसोपे ऐकवीतात तिला हेच सारे तू आहेस वेगळा असे वाटावे तिला शस्त्र ईथे हे परजायचे विषय अनोळखी काढायचे सौंदर्याला सौदर्याच्या जग बाहेरचे फिरवायचे ती रति म्हणोनी तू मदन व्हावास ऐसे नाही नीटनेटके रहात जावे गंड नको कसलाच काही ईथे स्पर्धा असते फार हेर ठेवावेत दोन-चार कुठे जाते, काय करते माहिती असावी तपशीलवार आता संगतो हुकुमी एक्का प्राण लाव कानाला सौंदर्यापेक्षा जास्त लक्ष द्यायचे तिच्या घराला तिला जवळच्या जनांकडून तुझी स्तुती कानी पडावी मग काय बिशाद आहे ती दुस-या कुणाची व्हावी उद्दिष्ट्य आता तुझे हेच असायला पाहिजे तिच्याच घरात तिने तुझे नाव ऐकायला पाहिजे हा प्रकार हाताळण्या कसब असावे लागते चुकता नेम ईथे एकदा काठिण्यपातळी वाढते ईथे जमायचे तर झटकन जमून जाते अति समय लागता नाद सोडून द्यायचे ऐक चाणक्य तुला सांगतो मंत्र बहु उपयोगी जो डाव जिंकता न येइ तिथे मोहीम थांबवावी आता येइ प्रश्न कळीचा कुणी पुढाकार घ्यायचा तू प्रश्न टाकायचा का तिचा प्रश्न झेलायचा जटील आहे ऊत्तर तरी सांगतो ढोबळ तत्त्वे प्रसंगानुरूप वागावे पुरुषाने हे खरे नाना प्रकार मुलींचे आपला प्रकार ओळखावा न येता ओळखता चाणक्यास पुसावा कुणी झटकन निर्णय घेतसे ....(प्रकार -१) कुणी वेळ लावीतसे..........(प्र-२) कुणी जरासे घाबरट तर्.......(प्र-३) कुणी बिनधास्त बोलतसे...... (प्र-४) कुणाच्या घरी पिता करारी......(प्र-५) कुणी मातेचे राज्य बघे........(प्र-६) कुणाला मर्दानीपणा आवडे......(प्र-७) कुणी सौम्यपणात रमे.........(प्र-८) कुणाला आवडे घोडे, हत्ती.....(प्र-९) तर कुणाला फुलपाखरे........(प्र-१०) एक, तीन, पाच सात आणि नऊ तू प्रश्न पुसायचा नको वेळ लाऊ दोन, चार , सहा आठ आणि दहा समोरून प्रश्न येइल असे काय ते पहा विषम प्रकारात वरच्या लगाम नाही सोडायचा सम प्रकारात मात्र जपायचे तू कोमल मना राजा पुरे झाली एवढी प्रेमातली चाणक्यनीती शिकता येत नाही कधी घरातच सारी युद्ध्नीती

प्रतिक्रिया द्या
20015 वाचन

💬 प्रतिसाद (31)

भारी रे चाणक्या !

पुष्कर जोशी
Sat, 04/27/2013 - 14:51 नवीन
भारी रे चाणक्या !
  • Log in or register to post comments

हीहीही

अभ्या..
Sat, 04/27/2013 - 14:59 नवीन
=)) =)) =)) =)) लैच दांडगा अनुभव बाबा. ____/\____ आम्हाला टैम्प्लीज ;)
  • Log in or register to post comments

खुप मोठ्ठि व लांबडी कविता

अविनाशकुलकर्णी
Sat, 04/27/2013 - 15:15 नवीन
खुप मोठ्ठि व लांबडी कविता
  • Log in or register to post comments

खरंय अकु

चाणक्य
Sat, 04/27/2013 - 22:00 नवीन
पण आता विषयच असा आहे की....... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

हा हा हा

परिकथेतील राजकुमार
Sat, 04/27/2013 - 15:21 नवीन
अप्रतिम हो चाणक्यशेठ ! एकदम ज ह ब र्‍या !!
  • Log in or register to post comments

आयला हे तर युवतीपटवणसूत्रच की

बॅटमॅन
Sat, 04/27/2013 - 15:40 नवीन
आयला हे तर युवतीपटवणसूत्रच की हो!!!! आवृत्ती करीन म्हंटो याची दररोज, कृतिशील उपासनेचे फळ लौकर मिळेल इन्शाल्लाह ;)
  • Log in or register to post comments

सिम्प्लिफाय करा राव... हिर इज माय टु सेंट

अग्निकोल्हा
Sat, 04/27/2013 - 15:53 नवीन
पोरगी असता तरणी ताठी करिअर ओरिएंटेडच असे ख्याती फक्त तिच्या फ्रेंडसर्कलसोबत सुरेख जुळवुन घ्यायची क्लुप्ती हमखास फळा येतसे... लळा तिच्याच फ्रेंडसर्कलचा हवा सहवास त्यांचा आनंदवावा, अन पगार महिना आकडी सहा पोरगि गळा पडतच असे. _____ पोरगी असता तरणी ताठी करिअर ओरिएंटेड नसे हीच ख्याती मग अंगभुत गुण व धाडसे हीच नीती मुलिचे मन जिंकतसे... रात्रि मस्त पहावा चित्रपट ओल्ड स्कुल पहाटे पहाटे तोडून गुलाबाचे फुल अंगणातल्या तिच्या स्कुटि धोका पत्करुन नावे ठेवावे कृति ही वाटे पोरकट लिहणाराही वाटे बावळट परंतु मुलीचा विरोध मात्र सफाचट या कृतिने हमखास होतसे _____ पोरगी असता तरणी ताठी दिसे एकटीच तुम्हाला निर्वाणापाशी (निर्वाणा हे डिस्कोचे नाव आहे) गोल चेहरा व चौकस अन निरागस भाव डोळ्याशी लेडी लक उदंड ते जाहले कॉलगर्ल भले ति नसे पबचे तिकीट, ड्रिंक्स,व जेवण विकत घेणे पुरेसे वरुन आपल्या ह्युमर, विटी जोक्स, व नॉन्सेन्सला ती भरभरुन हसे विकेंड साजरा होइ.
  • Log in or register to post comments

(No subject)

टवाळ कार्टा
Sun, 04/28/2013 - 06:24 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

चाणक्य, कविता आवडली!

संजय क्षीरसागर
Sat, 04/27/2013 - 22:59 नवीन
शिकता येत नाही कधी घरातच सारी युद्धनीती
एकदम बॉस!
  • Log in or register to post comments

"मुली पहाण्यातले फ्रस्ट्रेशन"

आदूबाळ
Sat, 04/27/2013 - 23:37 नवीन
"मुली पहाण्यातले फ्रस्ट्रेशन" असा काहीतरी धागा आला होता ना काही महिन्यांपूर्वी - त्याला सणसणीत उत्तर आहे तुमची कविता.
  • Log in or register to post comments

चायला तो "दाखवण्याच्या"

टवाळ कार्टा
Sun, 04/28/2013 - 06:25 नवीन
चायला तो "दाखवण्याच्या" प्रोग्रामसाठी होता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

उशीर झाला.

प्रभाकर पेठकर
Sun, 04/28/2013 - 03:38 नवीन
अरेरे..! बराच उशीर झाला आहे आता. मुलालाच सांगतो वाचायला.
  • Log in or register to post comments

मजेदार आहे हो चाणक्यनीती !!

इन्दुसुता
Sun, 04/28/2013 - 07:22 नवीन
मजेदार आहे हो चाणक्यनीती !! :D
  • Log in or register to post comments

जबराट !

मदनबाण
Sun, 04/28/2013 - 07:23 नवीन
जबराट ! युक्त्या काही असतात खास मिळते ज्याचे फळ झकास प्रेम रसाचा आस्वाद मग चाखता येईल अपार.... ;)
  • Log in or register to post comments

जबरदस्त !

अप्पा जोगळेकर
Sun, 04/28/2013 - 11:52 नवीन
जबरदस्त !
  • Log in or register to post comments

चाणक्य=निती

अत्रुप्त आत्मा
Sun, 04/28/2013 - 15:16 नवीन
चाणक्य=निती =))
  • Log in or register to post comments

आवडली ही कविता फर्मास..

चावटमेला
Tue, 04/30/2013 - 12:38 नवीन
आवडली ही कविता फर्मास.. युक्त्या आहेत खूप झक्कास. जरि दिसती साध्या सरळ अवघड आहे एक एक वळण तरि सांगतो एक क्लृप्ती छोटी खिशामाजी ठेवी सदा चाणक्य नीती :)
  • Log in or register to post comments

छ्प्पर फाड ..एकदम मस्त

नि३सोलपुरकर
Tue, 04/30/2013 - 13:02 नवीन
" पुरुषस्वभाव हा जाण तू राजा होतात खच्ची नाव दुजे येता उगी समजती मग ही दुस-याची ईथे आपणा वाव नाही "...... हे तर.१०००००% ____/\______
  • Log in or register to post comments

_/\_ _/\_ _/\_

सुहास झेले
Tue, 04/30/2013 - 13:24 नवीन
अशक्य भारी... :) :)
  • Log in or register to post comments

झकास जमली आहे कविता..

भडकमकर मास्तर
Tue, 04/30/2013 - 15:52 नवीन
झकास जमली आहे कविता.. :) अवांतर : स्वतःसाठी किती उपयोग केला या नीतीचा?
  • Log in or register to post comments

लै भारी..

विसोबा खेचर
Tue, 04/30/2013 - 16:25 नवीन
लै भारी..
  • Log in or register to post comments

भारीभ़क्कम अभ्यास...

सुरमईश्याम
Tue, 04/30/2013 - 16:38 नवीन
भारीभ़क्कम अभ्यास...
  • Log in or register to post comments

आता स्त्रियांची मदत पण करा.

प्रीत-मोहर
Wed, 05/01/2013 - 16:54 नवीन
आता स्त्रियांची मदत पण करा. चिकणे पोरगे कसे पटवावे ह्याची ही नीती लिहाच म्हणते मी.
  • Log in or register to post comments

फक्त गोड हसले की काम होते

टवाळ कार्टा
Wed, 05/01/2013 - 17:42 नवीन
फक्त गोड हसले की काम होते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

टवाळ कार्ट

चाणक्य
Fri, 05/03/2013 - 09:46 नवीन
बरोबर सांगतायत. मुलांना वेगळं पटवायची गरजच काय ? हसलं की झालं की काम. 'हसली की फसली' म्हणतात ..पण मुलगी हसल्यावर फसणारी खरतर मुलंच असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

गोड हसताना अलगद डोळा मारला,तर

मदनबाण
Sun, 05/05/2013 - 09:27 नवीन
गोड हसताना अलगद डोळा मारला,तर नजरेचा तो तीर वर्मी बसतो ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य

@चिकणे पोरगे कसे पटवावे

अत्रुप्त आत्मा
Fri, 05/03/2013 - 07:59 नवीन
@चिकणे पोरगे कसे पटवावे ह्याची ही नीती लिहाच म्हणते मी.>>> =)) नै नै...आधी चिकणी पोरं मंजे काय? याची व्याख्या ठरवा! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

चिकणे पोरगे

टवाळ कार्टा
Wed, 05/01/2013 - 17:44 नवीन
चिकणे पोरगे
आता कसे स्पष्टपणे लिहिले ....उगाचच गुण, स्वभाव वगरे जड शब्द नाहीत
  • Log in or register to post comments

मस्तच..

उपास
Fri, 05/03/2013 - 02:08 नवीन
जवळ जवळ सर्व क्लृप्त्यांशी सहमत :)
  • Log in or register to post comments

फलश्रुती राहिली होती....

ज्ञानोबाचे पैजार
Sun, 05/05/2013 - 09:19 नवीन
नित्य करावे स्त्रोत्र पठण, दुर होईल त्याचे एकले पण, मग चाणाक्य देवा अर्पण, पत्रिका करावी लग्नाची,
  • Log in or register to post comments

भर उन्हाळयात येई गारवा विसरा

कंजूस
Sun, 05/05/2013 - 13:57 नवीन
भर उन्हाळयात येई गारवा विसरा बालकवी हा आला तरुणकवी .
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा