आस
लेखनविषय:
काव्यरस
मन नाही नाही म्हणते पण
हृदयात आस घन कळवळते
दरवळ मृगजळ मेघांचा
अंतरी आर्त अन वादळते
गोकुळ स्वप्नांची सलगी
जिरवून कथानक वावरते
तापल्या काहिली तृप्त
माळभर धुंधुर माया हिरवळते
ओठात शब्द स्वर कंठातिल
भावना लास्यमय ओघवते
आशेस किनारा वाळूचा
दर्पणी कामना विरघळते
....................अज्ञात
वाचने
2145
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
वादळ ते असे आहे का?
पहिले कडवे खूप आवडले.
In reply to वादळ ते असे आहे का? by यशोधरा
"वादळ ते" नाही. ते "वादळते" असेच आहे. आदळते, ओघळते, भांभावते तसे वादळते
In reply to "वादळ ते" नाही. ते "वादळते" by अज्ञातकुल
वळ मृगजळ मेघांचा
अंतरी आर्त अन वादळते
अंतरी काय वादळते? हे समजले नाही..
In reply to वळ मृगजळ मेघांचा by यशोधरा
मृगजळ मेघांचा दरवळ आला की अंतरात " आर्त " वादळते.
प्रत्येक कवितेत एखादा तरी अवघड, वापरात नसणारा शब्द तुम्ही वापरता.
ते सहज होत असेल, तर ठीक आहे - पण तसा स्वतःला आग्रह करु नका ही कळकळीची विनंती.
तुमच्या कविता मला आवडतात पण दरवेळी एखाद्या तरी शब्दाला ठेचकळल्यासारखे वाटते.
अर्थात हा माझा प्रश्न आहे, तुमचा नाही याचीही जाणीव आहेच :-)
In reply to अवघड शब्द ... by आतिवास
कुठला शब्द अवघड वाटला आज ?. शब्द सहज येतात त्यासाठी माझा कुठलाही अट्टाहास नसतो. असो प्रांजळ प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार :)
:)
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
:)
__/\__!!
In reply to __/\__ by मिसळलेला काव्यप्रेमी
तुमचा प्रतिसाद नसला की चुकल्या चुकल्यासारखे वाटते :)
छान लिहीता तुम्ही.
In reply to छान लिहीता तुम्ही. by साऊ
मनःपूर्वक आभार :)
कविता आवडली.
वादळ ते असे आहे का?