नाचते नार तोऱ्यात -
लेखनविषय:
काव्यरस
.
नाचते नार तोऱ्यात फार नखऱ्यात माळुनी गजरा
चाळ ते पायी तालात छान डौलात खिळवती नजरा
ओठिचे हास्य मधुजाल गाल ते लाल भान हुरहुरते
होउनी दंग चोळीत तंग वेडात ध्यान भिरभिरते
हातची काकणे नाद घालुनी साद दावती मेंदी
ती अदा करतसे फिदा विसरुनी क्षुधा वाढती धुंदी
चमकती नयन सोडुनी तीर हृदयात थेट ते त्यांच्या
मेखला खास झुलवून हात अदबीन हाती ये त्यांच्या
भिंगरी गरगरा फिरत राही भरभरा सावजा पाठी
रंगता महल रंगात येतसे शीळ कुठुनशी ओठी
पापी ते पोट बोटात नोट थाटात ओढ गाठीची
थिरकतो ताल दावी कमाल ती नार नजर भेटीची
.
वाचने
2717
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
जबराट
छान!
तान तान तान ता..नानानानाना...
In reply to तान तान तान ता..नानानानाना... by अत्रुप्त आत्मा
सह्हीच!!
छान जमली आहे लावणी...
चपखल शब्दरचना.
वा..! जबरदस्त...! लावणी आवडली
आभार !
व्वाह