ट्रेफिक सेन्स
लेखनविषय:
काव्यरस
सखे पाहून तुज साडीत लाल,
थांबलो,जाहलो मी बेहाल,
पाहून तनास हळद पिवळी,
सावरलो नजर झाली बावळी ,
पाहून हातात चुडा हिरवा,
भासलीस मज तू ट्रेफिक सिग्नलच नवा,
चाललो पुढे मी आधार शोधण्या नवा
वाचने
4374
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
कैच्याकै कविता.. घ्या तोंड गोड करा. :) आकारावर जाऊ नका, खाऊन पहा.
अवांतर : अशा वेळी काही विडंबक मित्रांची फार्फार आठवण येते बुवा. ;)
अजून एक विडंबक होते इथे एके काळी, पण आता ते फारचं सभ्य झालेत असे समजते..असो.. ;)
In reply to कैच्याकै कविता.. घ्या तोंड by गणामास्तर
मित्रा तुझी जिलबी बेताल
थांबलो, चक्रावलो, झालो मी बेहाल,
अर्ध्या हळकुंडाचा लेवून रंग पिवळा,
झालास तू रे बेभान; मिपावरचा बावळा
पाहून हातात तुझ्या कळफलक काळा,
भासलास तू शाळेतला फळा,
(जिलबीच आहे.. साहित्यमूल्य शोधू नये! ;-))
रंगीबेरंगी कविता. तुम्हाला तुमची सखी पाहता ट्राफीक सिग्नल आठवतो.
आम्हाला अजून काही :(
असो. एकेकाचे व्हिजुअलायझेशन.
काव्यरस:
कॉकटेल रेसिपी>>> =)) भूछत्री कोडाइकनाल ला टफ देणार हा नवा पर्याय =))
बाकि ट्रॅफिक बरच जाम झालय,अशी प्रतिक्रीया नोंदवितो ;-)
आरश्यात पाहुन मी हलविले गाल,
काहि मिनिटात जाहलो हलाल,
खायला आज-काल अवडतात केळी,
नायतर चालते जिलबी पिवळी,
खाऊनी मनात ओरडतो पारवा,
हाच का तू मला दिलास गारवा,
चाललो पुढे मी शोधण्या नवा थवा........ हुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र हाहाहाहाहाहा हुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र.......... ;-)
हिहिहि
मला तं कसलं भारी सुचलय =))
पण जौदे .. काँडु काकाला अवडत नै म्हणुन मी नै लिवनार ज्जा :-/
In reply to हिहिहि by जेनी...
ए बालिका...अस्सं नै ज्जा....!!! :-/
महिला विभाग प्रमाणेच , नव कवी विभाग हि सुरु करावा. म्हणजे आमच्या सारख्या काव्य प्रेमी लोकांना शांत पणे कवितांचा आस्वाद घेता येइल.
(टवाळ लोक्स उगीच मध्ये मध्ये करणार नाहीत )
महिला विभाग प्रमाणेच , वाचनमात्र विभाग हि सुरु करावा. म्हणजे आमच्या सारख्या शांतता प्रेमी लोकांना शांत पणे कवितांचा आस्वाद घेता येइल. ;)(टवाळ लोक्स उगीच मध्ये मध्ये म्हणजे काय मूळ कवितेला नायतर वाचकांच्या डोळ्यांना झाकतेत काय. वाचा आणि करा की कौतुक पाहीजे तितके.)
In reply to कायपण by अभ्या..
मध्ये मध्ये टवाळ अभिप्रायांनी कवितेचा रसभंग होतो.
यातूनच एखादे स. त. कुडचेतकर पुढे येतील, आहात कुठे?
In reply to कायपण by अभ्या..
तेच की. गळवे घेऊन अतिहळवे झाल्यावर कसं चालायचं?
अस्मितागळवे
घेऊन हळवे
कुणाचे जळवे
सकळ तळवे
=)) =)) =))
अस्मितागळवे
घेऊन हळवे
कुणाचे जळवे
सकळ तळवे
मूडच वळवे
टेन्शन पळवे
In reply to हे पण ;) by अभ्या..
पायाचे तळवे
इकडे वळवे
अगं ए हळवे
हितं बघ जळवे =)) =))
पाहून सखे तुझिया गळा मंगलसूत्र
झालो मी पुरता गलितगात्र
सोबत तुझा तो नवरा की
जणू हवालदार हावरा
फाडली माझी सर्वांसमोर...पावती
आणि पुन्हा विचारतो
सिग्नल नव्हता तरी का घातली?
का घातली... गाडी?
In reply to पुढल्या ओळी अशा असाव्यात by संजय क्षीरसागर
शेवटच्या ओळीत गाडीऐवजी एका क्षेत्राचे द्व्यक्षरी नावसुद्धा चालेल. किंबहुना भरपेट जेवल्यावर होणार्या पँटसारखं फिट्ट बसेल.
=)) =)) =)) =))
लगे रहो
कैच्याकै कविता.. घ्या तोंड