उर्दू ग़ज़लांचे भावानुवाद
लोकहो,
सध्या मराठी संकेतस्थळांवर सुप्रसिध्द उर्दू शायरांच्या उत्तमोत्तम ग़ज़लांचे "भावानुवाद" करण्याचे पेव फुटले आहे.
या नवीन, 'उमलत्या' अनुवादकांच्या तडाख्यातून ग़ालिबसारखे शायरही सुटलेले नाहीत. नुकतेच एका संकेतस्थळावर आमच्या आराध्य दैवताच्या, म्हणजेच मिर्झा असदुल्लाह खान बेग़ उर्फ 'ग़ालिब' यांच्या अत्यंत नावाजलेल्या ग़ज़लेचा असा भावानुवाद वाचण्याचे भाग्य लाभले.
या नवोदित अनुवादकांच्या लेखनकंडूमुळे, यापुढे ग़ालिब, मीर तक़ी मीर, फ़िराक़ गोरखपुरी, शक़ील बदायुनी , क़तील शिफ़ाई, जिगर मुरादाबादी, फ़ैज़ अहमद फ़ैज़, जोश मलिहाबादी, ख़ुमार बाराबन्क्वी यांच्यावर काय दिवस येतील याची चिंता आम्ही करतो आहोत.
मराठी ग़ज़ल लिहिणार्या एका तथाकथित नावाजलेल्या शायराने क़तील शिफ़ाईच्या काही ग़ज़लांचे असेच 'मराठीकरण' करून त्यांच्या ग़ज़लसंग्रहात छापल्याही आहेत. खरे तर क़तीलच्या ग़ज़लांवर झालेले मराठी बलात्कार, आम्हाला बघवले नाहीत. त्या भावानुवादाला केवळ
'धिंडवडे' हा एकच शब्द आम्हाला सुचतो.
मुळात कोणतीही एखादी ग़ज़ल मराठीत किंवा अन्य कोणत्याही भाषेत भाषांतरीत होत असतांना तिच्या लहजा मध्ये आमूलाग्र बदल होत असतो हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.
त्यामुळे ती ग़ज़ल तिच्या मूळच्या ताकदीने भाषांतरित होऊ शकत नाही.
त्यातल्यात्यात उर्दू ही अशी भाषा आहे की, जिची 'नज़ाकत' जगातील कोणत्याही भाषेला नाही. त्यामुळेच की काय कोण जाणे, जगातील सर्वोत्तम साहित्य या अत्यंत अर्वाचीन भाषेत निर्माण झाले.
दुसरी गोष्ट म्हणजे, दोन विभिन्न भाषांच्या संस्कृतीत फरक आणि तफावत असल्याने, एका भाषेतील प्रभावी प्रतीके दुसर्या भाषेत त्यांची ताकद टिकवू शकत नाहीत, हे वास्तव आहे.
'शमअ़'चा (ज्याचा मराठीत चुकीचा उच्चार शमा शमा असा करतात) उर्दू अर्थ मराठी 'दिवा' मधून प्रकट होत नाही. अशा वेळेस ओढूनताणून शमअ़ (अ खाली नुक़्ता आहे) चे भाषांतर करतांना सरळ दिवा म्हणून त्या शब्दाची किंमत कमी करायची याला काही अर्थ उरत नाही.
'ह़स्रत' या उर्दू शब्दाचा खरा अर्थ, केवळ एखादी अपूर्ण इच्छा एवढा मर्यादित नसून, अशी इच्छा जी कधीही पूर्ण होऊ शकणार नाही असा आहे. याचा भावानुवाद मराठीत काय होईल? या शब्दाला समान शब्द मराठीत आहे का?
त्यापेक्षा उर्दूचा रसास्वाद त्याच भाषेत घ्यावा. ग़ालिबचे शेर त्याच्याच भाषेत गरज पडल्यास एखाद्या जाणकाराकडून समजावून घ्यावेत. संकेतस्थळावर ग़ालिबच्या ग़ज़लांचे भावानुवाद करून आपले काव्यकौशल्य सिध्द करण्याचा अकारण आक्रस्थाळेपणा न करता, मूळ ग़ज़ल तिच्या अर्थासोबत प्रकाशित करावी , म्हणजे ज्यांना उर्दू येत नाही त्यांनाही त्याचा अव्यभिचारी आस्वाद घेणे शक्य होईल.
याबाबतीत आपली मते जरूर नोंदवावीत.
आपला,
(उर्दूप्रेमी) धोंडोपंत
वाचने
18900
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
सहमत आहे...
एक किरकोळ शंका
धन्यवाद दिगम्भा
पटले नाही
विकृत कल्पना
In reply to विकृत कल्पना by धोंडोपंत
मान्य
In reply to मान्य by आजानुकर्ण
गझल !!!
In reply to गझल !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्राध्यापक साहेब
In reply to प्राध्यापक साहेब by धोंडोपंत
अवांतर
In reply to अवांतर by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
म्हणूनच
In reply to म्हणूनच by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
स्कॉच
In reply to स्कॉच by कोलबेर
सुधारणा
In reply to गझल !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शिवाय तसव्वुफ
In reply to शिवाय तसव्वुफ by धनंजय
विसाल ?
In reply to विसाल ? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
आणखी काही अर्थ
In reply to आणखी काही अर्थ by धनंजय
आता कळले
In reply to आता कळले by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
तेच
In reply to शिवाय तसव्वुफ by धनंजय
किंचित असहमती
In reply to किंचित असहमती by दिगम्भा
किंचित सहमती
In reply to किंचित सहमती by धनंजय
माझीही किंचित सहमती
धोंडोपंताशी बहुतांशी सहमत...
In reply to धोंडोपंताशी बहुतांशी सहमत... by मनिष
आवडेल
In reply to आवडेल by आजानुकर्ण
येथे वाचता येईल
ठेवणीतले शब्द, आणि ताक आवडणे
द्विधा मनस्थिती