मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वर्षा भोसले - आशा भोसले यांच्या मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

वेदनयन · · काथ्याकूट
नुकतिच मटा वर ईथे बातमी वाचली. सुन्न झालो. असे का व्हावे - कारण काय? एके काळी वर्षा रिडिफ वर लिहीत असत; ते मला खुप आवडे. पण गेल्या पाच-एक वर्षात त्या काय करीत ह्याचा पत्ता नाही. कुणाला माहित असल्यास जरुर सांगा. लवकर बर्‍या होत हिच ईश्वरचरणी प्रार्थना. रोहित

वाचने 5524 वाचनखूण प्रतिक्रिया 2

अभिमन्यु Wed, 09/10/2008 - 12:37
दिर्घ आजारपणामुळे असे झाले. देव त्यांना सुदृढ प्रकृती व सुबुद्धी देवो

सर्किट Wed, 09/10/2008 - 21:46
रिडिफ वर वर्षा भोसलेंच्या लिखाणाचा मीही नियमीत वाचक होतो. हिंदुत्त्व आणि हिंदुंबद्दल त्या अत्यंत परखड पणे लिहायच्या. सावरकरांचे हिंदुत्त्व कसे खरे, आणि संघपरिवाराचे कसे खोटे, हे लिहून त्यांनी बरेच शत्रू जमवले होते. नंतर अचानक त्या लिहीनाश्या झाल्या. त्यांच्या लेखनशैलीचा माझ्यावर खूप प्रभाव आहे, असे मला नेहमी वाटत असते. त्या पुन्हा लिहित्या होवोत, ही प्रार्थना. -- सर्किट