वृक्षारव
लेखनविषय:
काव्यरस
पाचोळा माझाच पेटला
झळा लागुनी दग्ध विशाखा
अंगावर जळली पाने पण
आत अबाधित बहर अनोखा
ना सूडाचा लेश तसूही
ना रिपुकांचा जंगम विळखा
डाव मांडला ऋतुचक्राचा
ना कोणी मज आपला परका
कुणी न माझा असो तरीही
"मी" माझ्यातिल उत्कट झोका
पवनाचे हुंकार झेलतो
जरी कधी असतो तो धोका
.........................अज्ञात
वाचने
2051
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
सुंदर :)
अंगावर जळली पाने पण आत अबाधित बहर अनोखाआणि
कुणी न माझा असो तरीही "मी" माझ्यातिल उत्कट झोकाअतिशय सुरेख!
व्वाह!
खरच उत्कट अभिव्यक्ती.
चांगली आहे. आवडली.
>>>ना सूडाचा लेश तसूही
ना रिपुकांचा जंगम विळखा
डाव मांडला ऋतुचक्राचा
ना कोणी मज आपला परका
सुरेख.
संन्यस्त वृक्ष!
माणसानं शिकण्यासारखं काही.
फक्त...
सलाम सलाम आणी सलाम !
कविता आवडली.
वा वा सुरेख कल्पना अन काव्यही.
पाचोळा माझाच पेटला
झळा लागुनी दग्ध विशाखा
परिस्थितीचे सत्य मान्य केले आहे या वृक्षामहानी !
डाव मांडला ऋतुचक्राचा ह्याची जाणीव सुध्दा आहे आणि म्हणूनच कदाचित ना सूडाचा लेश तसूही आहे
पवनाचे हुंकार झेलतो
हे जबरदस्त आवडले ...ह्यातून जो दुर्दम्य आत्मविश्वास ध्वनित होतो, तो फार आवडला, त्याचे कारणही तसेच आहे म्हणा,
अंगावर जळली पाने पण
आत अबाधित बहर अनोखा
हे त्याला फक्त माहितीच नाही तर याची त्याला खात्री आहे.
In reply to पाचोळा माझाच पेटला by इन्दुसुता
व्वा इंदुसुता, उत्तम विवेचन केलंत आपण. मनःपूर्वक आभार. :)
आहा! आवडली रचना.
सर्वांचेच मनापासून आभार. :)
सुंदर