७२ मिनिटांचा हिशोब - पुरुष जनहित मे जारी.
रविवारची सकाळ. दिवाणखान्यात सोफ्यावर बसलेलो मी. टिव्ही वर चिकनी चमेली के शीला की जवानी. मात्र त्याकडे जराही लक्ष नाही. एका हातात चहाचा कप. दुसर्या हातात पोह्याने भरलेला चमचा, जो ‘आ वासलेल्या’ तोंडाच्या अगदी जवळ येऊन तसाच थांबलेला. विस्फारलेले डोळे समोरच्या पेपरावर खिळलेले. अजूनही विश्वास बसत नव्हता. पण वस्तुस्थितीचे भान आले तेव्हा जाणीव झाली की बातमी "दैनिक फेकानंद" मध्ये आली असल्याने तिला हसण्यावारी नेणे शक्य नव्हते. हि बातमी दिवाणखान्यामधून स्वयंपाकघरापर्यंत पसरण्याआधी तिचा छडा लावणे गरजेचे होते. मी त्या वर्तमानपत्रातील तेवढे कात्रण नेमके कापून उरलेल्याची व्यवस्थित सुरंगळी करून रद्दीच्या पिशवीत भिरकावून दिेली आणि विचारमग्न अवस्थेतच अंत:पुराकडे प्रस्थान केले. कुठेतरी खोलवर आतवर अंतकरणात दडलेला पुरुषी अहंकार दुखावला गेला होता.
तर मित्रांनो काय होती ती बातमी जी आपल्या पुरुषांच्या प्रधानगिरीला आव्हान देणार होती हे ऐकायची तुम्हाला उत्सुकता नक्कीच लागून राहिली असणार.
तर ऐका,
आपले वाचा,
" भारतीय महिला ७२ मिनिटे जास्त काम करतात. "
बसला ना झटका...!!
असेच आणखी दोनचार झेलायची तयारी करून खाली सविस्तर वाचा.
---------------------------------------------------------------------------------------------
आधुनिक भारताच्या अत्यानुधिक महिलांच्या कर्तृत्वावर शिक्कामोर्तब करणारे वृत्त -
वृत्तसंस्था, झुमरीतलैया
भारतीय महिला दिवसभरात भारतीय पुरुषांच्या तुलनेत सरासरी ७२ मिनिटे अधिक कार्यालयीन काम उपसत असल्याचे एका गुप्त सर्वेक्षणानुसार समोर आले आहे. भारतातील प्रमुख शहरांमध्ये केलेल्या या सर्वेक्षणात प्रत्येक शहरात हीच बाब कमी-अधिक फरकाने अधोरेखित झाली आहे. "नारी शक्ती तिथे युक्ती अन पुरुषांपासून मुक्ती" हे ब्रीदवाक्य असलेल्या "सखी तू होऊ नकोस दुखी" या संघटनेतर्फे करण्यात आलेल्या अभ्यासात भारतभर महिला मनुष्यबळाचे प्रमाण क्षणोक्षणी वाढत असल्याचे दिसून आले आहे.
(बातमी इथेच थांबली असती तर काही प्रश्न नव्हता, पण तिच्या उत्तरार्धात पत्रकारसखीने खास बायकांच्याच शैलीत मारलेला तिरकस टोमणा मात्र संभाव्य धोक्याची चाहूल देणारा होता... तर ऐका... आपले वाचा...)
कामाच्या बाबतीत भारतीय पुरुष भारतीय महिलांपेक्षा पिछाडीवर असले, तरी भारतीय पुरुषांनी वेतनाच्या बाबतीत ही कसर भरून काढली आहे. निर्धारित वेळ काम करूनही पुरुष कर्मचाऱ्यांना महिला कर्मचाऱ्यांच्या तुलनेत १७ टक्के अधिक वेतन मिळत असल्याचे देखील या सर्वेक्षणात सामोरे आले आहे.
---------------------------------------------------------------------------------------------
वाक्यावाक्याला भारतीय पुरुष असा उल्लेख वाचून आजवर स्वत:ला जेवढा "भारतीय" असल्याचा अभिमान वाटत होता तेवढीच आता "भारतीय पुरुष" असल्याची लाज वाटू लागली होती. काही नाही, मी ठरवले, या बातमीला उत्तर द्यायचेच. खून का बदला खून, आंख का बदला आंख, तसेच सर्वेक्षण का बदला सर्वेक्षण.... मात्र मला एकट्याला सर्वेक्षण करणे शक्य नसल्याने मी केवळ निरीक्षण करून एक अहवाल बनवायचे ठरवले अन लागलीच कामाला लागलो. महिन्याभरात स्वताच्याच ऑफिसमधील महिला कर्मचार्यांच्या निरीक्षणावरून भारतीय बायकांचे ऑफिसकाम प्रत्यक्षात कसे चालते यावर मी एक दसकलमी अहवाल बनवला. बस तोच पुरुष जनहित मे जारी तुमच्या समोर सादर करत आहे.
७२ मिनिटांचा हिशोब - पुरुष जनहित मे जारी.
१) सकाळी कार्यालयात शिरल्या शिरल्या या कामाच्या जागेवर न जाता सरळ प्रसाधनगृहाकडे कूच करतात आणि मेकअप शेकअप करत बसतात. कारण घरून आंघोळ अन नीटनेटकी तयारी करून निघाल्या असल्या तरी प्रवासामुळे (भले तो दहा मिनिटांचा अन वातानुकुलीत बसने का असेना) विस्कटलेले केस, ड्रेस, मेकअप वगैरे ठिकठाक करूनच यांना ऑफिसमधील आपल्या इतर सहकार्यांना दर्शन द्यायचे असते.
२) जागेवर आल्यानंतरही कॉम्प्युटरची कळ न दाबता या आधी इतर महिला सहकार्यांवर एक नजर मारतात. आज कोणी काय नवीन विशेष घातले आहे का याचा आढावा घेतला जातो. असल्यास खोट्या खोट्या स्तुतीसुमनांचा मारा होतो. कारण पुढच्यावेळी आपण जेव्हा काहीतरी नवीन घालून येऊ तेव्हा आपलीही अशीच दखल सर्वांनी घ्यावी हा सुप्त हेतू.. गिव एंड टेक.. तू मला लाईक कर मी तुला लाईक करते..!
३) तासाभराने चहा येतो. तेव्हा बरेच पुरुष मुकाट्याने चहा पिऊन लगेच कामाला सुरुवात करतात तर काही जण सिगारेटचा झुरका मारायला बाहेर पॅंट्रीमध्ये जातात, मात्र सिगारेट-चहा संपताच परत येतात. बायकांच्या गटात मात्र चहा आल्या की खुर्च्याच एकमेकींच्या दिशेने वळतात, डब्यातून चिवडा-फरसाण अन क्रीमची बिस्किटे काढली जातात. एकमेकींशी देवाणघेवाण केली जाते. आणि सावकाश गप्पा मारत ज्याला गॉसिपिंग असेही बोलतात त्याच्या जोडीने हा टी-टाईम साजरा केला जातो.
४) त्यानंतर होते दुपारी जेवायची वेळ. ही वेळही काटेकोरपणे पाळली जाते. कारण कितीही अर्जंट काम असले तरी या फारवेळ उपाशी राहू शकत नाहीत. जेवणही यांचे सावकाश असते. डब्यात रोजच्याच भाज्या असतात तरीही त्याची पाककृती उगाचच्या उगाच जेवणाबरोबर चघळली जाते. तसेच जेवण झाल्यावर देखील या तश्याच गप्पा मारत बसून राहतात, लगेच उठत नाहीत. इतर सारे उठले की उलट यांच्या गप्पा जास्त रंगात येतात आणि चुगलीचा कार्यक्रम जोर शोर से चालतो. जाऊ, भावजय, नणंद हे दुर्मिळ शब्द फक्त इथेच ऐकू येतात.
५) पुरुष बापुडे जेवतात आणि डबा तसाच बॅगेत भरून घरी आणतात. या मात्र तिथेच ऑफिसच्या पाणवठ्यावर डबा घासून, पुसून, सुकवून, लखलखीत करूनच बॅगेत भरतात. डबेही यांचे काही कमी नसतात. खाणार जेमतेम दिड चपात्या मात्र लोणचे, पापड, सॅलाड, भाजी, चपाती असे सतरा डबे असतात. धुणीभांडी स्वताच करायची असल्याने वेळप्रसंगी ताट वाटी चमच्याचेही लाड चालतात.
६) जेऊन जागेवर आल्यावर यांचा फोनचा कार्यक्रम सुरू होतो. सर्वप्रथम नवर्याला फोन लागतो ते जेवण कसे झाले होते हे विचारायला. पण अर्थातच, तो एक पुरुष असल्याने आणि त्याच्या ऑफिसला असल्याने बरेवाईट काय ते खरेखोटे न सांगता एका शब्दात चांगलेच होते बोलून फोन ठेऊन देतो. त्यानंतर घरी फोन लावला जातो. कोणाचा सासरी लागतो तर कोणाचा माहेरी, मात्र लागतो जरूर. तिकडचे हालहवाल काय आहेत यावर तो फोन किती चालतो हे ठरते.
७) पुन्हा तास दीड तासाने चहाचा कार्यक्रम सकाळसारखाच पार पडतो. एवढ्या गप्पा या दिवसभरात कश्या मारू शकतात, एवढे विषय कुठून येतात या बद्दल कोणालाही शंका नसावी. विवाहीत बायकांकडे चार विषय जास्तच असतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते विषय सर्वच बायकांच्या सामाईक आवडीचे असतात. तसेच प्रत्येकीकडे त्यावर काही ना काही तरी सांगण्यासारखे असतेच असते.
८) संध्याकाळी ऑफिस सुटायच्या तासभर आधी यांना निसर्गनियमानुसार पुन्हा भूक लागते. यावेळी कोणी चहा तर आणून देणार नसतो. मग एकेकीच्या डब्यातून संत्री केळी अन सफरचंद निघतात. अगदी घरच्यासारखे सुरीने कापून वगैरे ही फळे खाल्ली जातात. इथे ही गप्पा मारणे हे ओघाने आलेच. निव्वळ खाण्यासाठी म्हणून या तोंड कधीच उघडत नाहीत.
९) ऑफिस सुटायच्या दहा ते पंधरा मिनिटे आधीच यांचा कॉम्प्युटर बंद होतो. कारण पुन्हा दिवसभराचा शीण घालवायचा तर तेवढा तगडा मेक अप हा हवाच. याच दरम्यान ऑफिसमधील सार्या बायका रंगरंगोटी करायला रेस्टरूमवर गर्दी करत असल्याने आणि प्रत्येकीला किमान सात-आठ मिनिटे लागत असल्याने यात वेटींगचा एक्स्ट्रा टाईम देखील हिशोबात धरल्यास उत्तम.
१०) उशीरा ऑफिसमध्ये थांबणे हा प्रकार यांच्या बाबतीत अभावानेच आढळतो आणि आढळला तरी रोज रोज नसतो. यांना वरचेवर थांबवायची त्यांच्या बॉसलाही भिती वाटते, न जाणो दुसर्या दिवशी ऑफिसमध्येच भाज्या निवडायला घेऊन आल्या तर......
तर मित्रांनो........ हे असे असते. यावरून असे म्हणता येईल की मुळातच या भारतीय बायका भारतीय पुरुषांच्या मानाने संथ असून त्यांना दिवसभरात तेच काम करायला ७२ मिनिटे जास्त लागत असण्याची शक्यता असल्याने हा सर्व्हे सर्वस्वी चुकीचा आहे असे नाही म्हणता येणार.
या अहवालाशी सहमत असाल नसाल तरी इथे याच खाली मोठ्या संख्येने स्वाक्षरी करा. येत्या अमावस्येच्या आधी आपल्याला याची एक प्रत दैनिक फेकानंदच्या कार्यालयात सादर करायची आहे. पुढील कार्यक्रमाची रुपरेषा लवकरच, तुर्तास शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज..!!
धन्यवाद,
अहवाल सादरकर्ता - तुमचा पुरुषमित्र अभिषेक
तळटीप - सदर लेख कल्पनेवर आधारीत असून आपल्या जवळपास असेच काहीसे द्रुष्य दिसल्यास तो निव्वळ योगायोग समजावा........ आणि हो, हलकेच घ्या हं. ;)
वाचने
14542
वाचनखूण
प्रतिक्रिया
65
लय भारी..
कल्पक आहे
In reply to कल्पक आहे by श्रीरंग_जोशी
एक्स्ट्राचा वेळ नाही घेतला हो
In reply to एक्स्ट्राचा वेळ नाही घेतला हो by तुमचा अभिषेक
बरं बरं
In reply to बरं बरं by श्रीरंग_जोशी
उपाय शोधायच्या फंदात पडू नका.
In reply to उपाय शोधायच्या फंदात पडू नका. by तुमचा अभिषेक
केवळ कल्पकच नाही
मुळातच या भारतीय बायका भारतीय
In reply to मुळातच या भारतीय बायका भारतीय by शुचि
हा हा.. मग आपणच सांगा आता ससा
In reply to हा हा.. मग आपणच सांगा आता ससा by तुमचा अभिषेक
कथेत जिंकतं कोण हे आपणच सांगा
In reply to कथेत जिंकतं कोण हे आपणच सांगा by शुचि
त्या ससा कासव कथेच्या बरेच
In reply to त्या ससा कासव कथेच्या बरेच by तुमचा अभिषेक
आमच्या संस्कारक्षम वयात,
In reply to आमच्या संस्कारक्षम वयात, by शुचि
चला ठिक आहे, आम्ही चलाख ससे
In reply to आमच्या संस्कारक्षम वयात, by शुचि
मी तुझ्याशी सहमत हा शुचि
अगगगगगगं.....
हा हा.. ते शेक अप चा असाही
खट्याक.......
कोणासाठी बायका एवढे प्रसाधन
In reply to कोणासाठी बायका एवढे प्रसाधन by शुचि
छान..
सांख्यिकी विदा नसल्याने सदर
In reply to सांख्यिकी विदा नसल्याने सदर by अन्या दातार
फार मार लागलाय का रे लातूर
In reply to सांख्यिकी विदा नसल्याने सदर by अन्या दातार
काय ओ, लेखात लिहिले आहे ना,
In reply to काय ओ, लेखात लिहिले आहे ना, by तुमचा अभिषेक
जरासे कन्फ्युजन झाले ओ
In reply to जरासे कन्फ्युजन झाले ओ by अभ्या..
राव माझ्या लिखाणावरच्या गप्पा
खुशखुशीत लेख..
मस्त
ह.ह. पु.वा.
In reply to ह.ह. पु.वा. by कोमल
तुमची लिंक गंडलीय..
In reply to तुमची लिंक गंडलीय.. by तुमचा अभिषेक
लिंक तर गंडलीय खरीच..
In reply to तुमची लिंक गंडलीय.. by तुमचा अभिषेक
अतिशयोक्ती हा ही विनोदाचाच एक भाग आहे..
In reply to अतिशयोक्ती हा ही विनोदाचाच एक भाग आहे.. by मस्त कलंदर
समर्थन कसले हो, तेवढेच दोन
In reply to अतिशयोक्ती हा ही विनोदाचाच एक भाग आहे.. by मस्त कलंदर
मी तुझी पंखा झाले या
७२ मिनिटांचा हिशोब - पुरुष
७२ मिनिटांचा हिशोब - पुरुष जनहित मे जारी.टायटल असे हवे होते.पुरुष हित मे जारी चार बायका एकत्र आल्या की वेळ कसा भुरकन निघुन जातो ,त्यात हे ७२ मिनट कुठे लागतातIn reply to ७२ मिनिटांचा हिशोब - पुरुष by श्री गावसेना प्रमुख
पुरुषजन हित मे जारी असे करूया
विवाहीत बायकांकडे चार विषय
अतिशयोक्ती अलंकार
In reply to अतिशयोक्ती अलंकार by पैसा
क्या बात है.. तसा माझा अनुभव
In reply to क्या बात है.. तसा माझा अनुभव by तुमचा अभिषेक
लेख आवडला
In reply to लेख आवडला by पैसा
कुठेही महिला जास्त सिन्सिअर
In reply to कुठेही महिला जास्त सिन्सिअर by बॅटमॅन
या!
In reply to या! by पैसा
सार्थक झालं म्हणायचं वाट
In reply to सार्थक झालं म्हणायचं वाट by बॅटमॅन
बरं
In reply to बरं by पैसा
दावा तुमचा, सबब विदा तुम्ही
In reply to दावा तुमचा, सबब विदा तुम्ही by बॅटमॅन
माझच्चं खरं
In reply to माझच्चं खरं by पैसा
विधानाला आधार देणे हे तुमचे
In reply to विधानाला आधार देणे हे तुमचे by बॅटमॅन
करा.
In reply to करा. by पैसा
ह्याप्पी जर्नी.
In reply to लेख आवडला by पैसा
नाही हो पैसाजी.. अविश्वास का
In reply to नाही हो पैसाजी.. अविश्वास का by तुमचा अभिषेक
इतर ठिकाणच्या
In reply to इतर ठिकाणच्या by पैसा
म्हणजे इथे एका महिलेच्या जागी
In reply to म्हणजे इथे एका महिलेच्या जागी by तुमचा अभिषेक
नाही
In reply to नाही by पैसा
ऑफिसटाईममध्ये नसतोच जास्त..
In reply to अतिशयोक्ती अलंकार by पैसा
अभिनंदन
In reply to अभिनंदन by श्रीरंग_जोशी
:)
In reply to अभिनंदन by श्रीरंग_जोशी
का हो श्रीजो, तुमचा डोळा की
In reply to का हो श्रीजो, तुमचा डोळा की by शुचि
नाही बुवा...
In reply to अतिशयोक्ती अलंकार by पैसा
मी नोकरी सोडल्यावर गेल्या
In reply to मी नोकरी सोडल्यावर गेल्या by शुचि
बघा! ही एकटीच दोघींचं गॉसिप
In reply to बघा! ही एकटीच दोघींचं गॉसिप by प्यारे१
हाहाहा खरय गेल्या ऑफीसमध्ये
माझी बायको एवढे घरकाम करते की
In reply to माझी बायको एवढे घरकाम करते की by तुमचा अभिषेक
अस्सं
In reply to अस्सं by पैसा
हे म्हणजे मार खायची लाईन झाली
प्रतिसादाला प्रत्युत्तर देण्यासाठी सत्कारणी लावलेला वेळ..
In reply to प्रतिसादाला प्रत्युत्तर देण्यासाठी सत्कारणी लावलेला वेळ.. by अनन्न्या
चला ७२ नाही १२ मिनिटे तर
अभिच्या कथा इतर समुहावर
In reply to अभिच्या कथा इतर समुहावर by अविनाशकुलकर्णी
धन्स काका.. फक्त ही कथा नसून