चंद्रकांता - १.१ - नजरकैदेतली राजकन्या
लेखनप्रकार
अनेक दिवसांत अद्भुतरम्य असं काही वाचलं नव्हतं. अचानक "चंद्रकांता" ही देवकीनंदन खत्री यांची सुप्रसिद्ध कादंबरी आंजावर मिळाली. त्यावरची टीव्ही मालिका आठवत असेलच. मालिकेने मूळ कादंबरीला न्याय दिला नाही असं (लेखकाच्या नातवासह) अनेकांचं म्हणणं होतं.
मिपाच्या वाचकांसाठी ही कादंबरी मराठीत आणण्याचा विचार आहे.
____________________________
विस्तीर्ण अशा सपाट पठारावर एक दगडी उंचवटा होता. मावळत्या संध्याकाळी त्यावर बसून दोन तरूण आपापसांत बोलत होते. बाविशीचा वीरेंद्रसिंह नौगढच्या राजा सुरेंद्रसिंह यांचा एकुलता मुलगा होता. दुसरा तरूण तेजसिंह हा सुरेंद्रसिंहांचे दिवाण जीतसिंह यांचा पुत्र होता. तेजसिंहाचे डोळे विलक्षण चलाख होते. कमरेला खंजीर लटकावलेला होता. हातातली गोफण गोल गोल फिरवत तो चहोंबाजूंकडे सावध नजर ठेवून होता. लहानपणापासून वीरेंद्रसिंह आणि तेजसिंह जिगरी दोस्त.
"तेजसिंह", वीरेंद्र म्हणत होता, "तुझ्यासारखा मित्र मला लाभला हे माझं खरंच नशीब आहे. माझे कितीतरी संदेश तू जिवावर खेळून चंद्रकांतापर्यंत पोचावालेस आणि तिचे मला आणून दिलेस. नौगढ आणि विजयगढ मध्ये पाच कोसांचं अंतर आहे, पण या दोन राज्यांची मनं एकमेकांपासून शेकडो योजनं दूर आहेत. या पत्रात चंद्रकांताने काय लिहिलं आहे पहा - 'दिवस मोठे कठीण येत आहेत, राजकुमारा, लवकर ये!' मला तिच्याकडे घेऊन चल तेजसिंह!"
"तुम्हाला विजयगढला घेऊन जाणं सहज शक्य आहे. पण मला नुकतीच खबर लागली आहे की चंद्रकांताच्या वडिलांनी, राजा जयसिंहांनी तिच्या महालाभोवती पहारा बसवला आहे."
"पहारा? कशामुळे?"
"राजे जयसिंह यांचा एक मंत्री आहे. त्याच्या मुलाला - क्रूरसिंहला तुमच्या आणि चंद्रकांताच्या प्रेमाबद्दल कळलं. त्याने बापाकारावी ही बाब जयसिंहांच्या कानावर घातली. क्रूरसिंह चंद्रकांतावर लट्टू झाला आहे. त्याने नाजिम अली आणि अहमद खाँ या आपल्या दोन ऐयारांना चंद्रकांताच्या महालावर पहारे द्यायला बसवलं आहे. त्यांचा बंदोबस्त मी करत नाही तोवर आपण विजयगढमध्ये पाऊल ठेवणंसुद्धा धोक्याचं आहे." गोफणीचा फास खेळवत तेजसिंह म्हणाला.
"आता तू काय करणार आहेस?"
"मी आता विजयगढला जाऊन चपलाची भेट घेतो. चपला स्वतः ऐयारा आहे. तिचा चंद्रकांतावर भारी जीव आहे. संपूर्ण विजयगढमध्ये तिच्याइतका समर्थ साथीदार मला मिळणार नाही. मी शत्रूच्या हालचालींचा वेध घेतो आणि आपल्याला खबर पोचवतो."
"तू यशस्वी होशील याची मला खात्री आहे तेजसिंह. माझा भरवसा माझ्या युद्धकौशल्यावर आहे, पण तू युद्धनिपुण तर आहेसच, पण कुशल ऐयार देखील आहेस."
"मला तर अशी बातमी लागली आहे की काही दिवसांपूर्वी क्रूरसिंहाचे ते दोन ऐयार - नाजिम आणि अहमद - नौगढला येऊन महाराजांची भेट घेऊन गेले. काय कपट त्यांच्या मनात होतं कोण जाणे! नेमका मी तिथे नव्हतो…"
"तेजसिंह, तुला त्या दोन ऐयारांवर विजय मिळवायचा आहे, आणि त्यांना तुला कैद करायचं आहे. असो. आता तू नीघ , आणि शक्य तितक्या लवकर माझी आणि चंद्रकांताची भेट होईल याची तरतूद कर…"
तेजसिंह आपल्या कामगिरीवर पायी रवाना झाला. वीरेंद्रसिंहाने चंद्रकांताच्या विचारात किंचित उसासे सोडत आपल्या किल्ल्याच्या दिशेने घोडं वळवलं.
( वाचकांना आवडलं तर क्रमशः )
वाचने
9909
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
ऐयार म्हणजे?
In reply to ऐयार म्हणजे? by यशोधरा
ऐयार
In reply to ऐयार by निनाद मुक्काम …
धन्यवाद निनाद. घरुन पाहीन.
In reply to ऐयार म्हणजे? by यशोधरा
माझ्या अल्प
In reply to माझ्या अल्प by इरसाल
ओह ओके. धन्यवाद.
In reply to माझ्या अल्प by इरसाल
भारतात हेराला आपल्या
माझ्या माहितीप्रमाणे
वा वा!
मोठे भाग टाका
वाचत आहे.
सुरेख !
In reply to सुरेख ! by सस्नेह
'इंद्र्भुवन गुहा'
चंद्रकांता नाव वाचताच, त्या
माझी आवडती मालिका होती ही,
आवडतय!
चंद्रकांता काही काळ खुप
In reply to चंद्रकांता काही काळ खुप by मृत्युन्जय
इच्छारुपी
मस्त हो!! आवडेश एकदम वर लोक
मालिका पाहिली नव्हती. हा भाग
आवडले!
वाट पहातोय.
प्रतिसादांसाठी सर्वांना
सुरूवात आवडली.