संमोहरमल
लेखनविषय:
काव्यरस
भोर प्रभाती चंद्रकोर कोकीळ शीळ अन मनकवडी
हळुवार स्पर्श झुळुकेचा लाघव पक्षांची लाडी गोडी
गूढ साद अवती भवताली क्षितिजावर लाली थोडी
पर्णफुलांवर वसंत सण अंगणभर जगणारी कोडी
नील सरोवर प्रतिबिंबाविण थांग न त्या खोली वेडी
मेघ ढाळतो ऋतू तयातुन जीवन हसण्याची नाडी
मन हृदयी स्वप्ने जरतारी कुणी तरी नकळत धाडी
व्योम प्राणमय लयलाटेवर सुख दु:खे कडवी जोडी
काठ किनारे शब्दांचे रसरंग क्षणांच्या कावेडी
पाऊलठसे संमोहरमल मृगजळी तरंगे तन होडी
.....................अज्ञात
वाचने
2965
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
वा, सुरेख!
कवितेतील लय आवडली.
अहाहा! काय वर्णावी शब्दांनी
वेगळे शब्द! छान आहे कविता.
इंदुसुता,
In reply to इंदुसुता, by अज्ञातकुल
सुंदर. फार आवडले.
In reply to इंदुसुता, by अज्ञातकुल
(No subject)
In reply to इंदुसुता, by अज्ञातकुल
छान आहे
सुंदर कविता.
संमोहरमल?
गतकाळातील संमोहनाचे गारूडअसा तुम्ही प्रतिसादात त्या शब्दाचा दिलेला अर्थ नीटसा कळला नाही. म्हणजे 'गतकाळातील संमोहनाचे गारुड' हे कळते आहे पण संमोहरमल कळत नाही :-(आहा!!!!!!!!! बोरकरांची आठवण
फारच सुंदर मनमोहक!
कवितेचा आशय देण्याबद्दल
आहा!!
व्वा! खूप आवडली!
सुंदर
सुंदर