दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे
किती गोड ताज्या स्मृती त्या क्षणांच्या, तुझे ते बिथरणें वगैरे वगैरे
छुप्या पावलांनी हळूवार येणे, दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे
तुझा शब्द एकेक वेचायचो मी, उतावीळ होतो तुला ऐकण्याला
तुझे मात्र मिथ्या अती भाव खाणे, अबोलाच धरणे वगैरे वगैरे
तुझा केशशृंगार न्याहाळतांना, उभा फ़क्त होतो तुझ्या पायशाला
तरी लाजुनी तू; खळी लाल होणे, मुरकणे, इतरणे वगैरे वगैरे
कुणालाच नव्हती खबरबात काही, कुठे वाच्यता ना कुठे बोलबाला
तुझ्या आणि माझ्यात एकत्व येणे, स्वत:ला विसरणे वगैरे वगैरे
अनासक्त मी! हे तिला मानवेना, कसे डाव लटकेच खेळायची ती
वृथा आळ घेणे, मनस्ताप देणे, रुजूवात करणे वगैरे वगैरे
कधी द्यायची ती दुटप्पी दुजोरा, मुळी थांग पत्ता मनाचा न येई
मला पेच हा की पुढे काय होणे! मनाशी कचरणे वगैरे वगैरे
मुसळधार होती तुझी प्रेमवर्षा, किती चिंबलो ते कळालेच नाही
जणू थेंब प्रत्येक मकरंद धारा, मधाचे पखरणें वगैरे वगैरे
तुझी ठेव अस्पर्श तू रक्षिलेली, मिळाली मला; ते ठसे आज ताजे
स्मरे त्या क्षणांचे मदोन्मत्त होणे, कराग्रे विहरणे वगैरे वगैरे
"अभय" एक युक्ती तुला सांगतो मी, करावे खरे प्रेम मातीवरी या
भुई संग जगणे, भुई संग मरणे, भुई संग झरणे वगैरे वगैरे
- गंगाधर मुटे "अभय"
--------------------------------------------------------------------------
तुझा केशशृंगार न्याहाळतांना, उभा फ़क्त होतो तुझ्या पायशाला तरी लाजुनी तू; खळी लाल होणे, मुरकणे, इतरणे वगैरे वगैरेप्रचंड आवडेश...
छुप्या पावलांनी हळूवार येणे, दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे तुझा शब्द एकेक वेचायचो मी, उतावीळ होतो तुला ऐकण्याला तुझे मात्र मिथ्या अती भाव खाणे, अबोलाच धरणे वगैरे वगैरे तुझा केशशृंगार न्याहाळतांना, उभा फ़क्त होतो तुझ्या पायशाला तरी लाजुनी तू; खळी लाल होणे, मुरकणे, इतरणे वगैरे वगैरे कुणालाच नव्हती खबरबात काही, कुठे वाच्यता ना कुठे बोलबाला तुझ्या आणि माझ्यात एकत्व येणे, स्वत:ला विसरणे वगैरे वगैरेकितीदा असे काव्य हे वाचताना, मनाची अहा लागली पूर्ण तंद्री कसे शब्द ते देखणे-आशयो ही, सवे वृत्त आहे वगैरे वगैरे!!! :)
तुझी ठेव अस्पर्श तू रक्षिलेली, मिळाली मला; ते ठसे आज ताजे स्मरे त्या क्षणांचे मदोन्मत्त होणे, कराग्रे विहरणे वगैरे वगैरेक्या बात!! व्वाह!!!
कुणालाच नव्हती खबरबात काही, कुठे वाच्यता ना कुठे बोलबाला तुझ्या आणि माझ्यात एकत्व येणे, स्वत:ला विसरणे वगैरे वगैरेसुरेख!!
In reply to कुणालाच नव्हती खबरबात काही, by शुचि
तुझा शब्द एकेक वेचायचो मी, उतावीळ होतो तुला ऐकण्याला तुझे मात्र मिथ्या अती भाव खाणे, अबोलाच धरणे वगैरे वगैरेहे खासच !!
In reply to क्या बात है ! by परिकथेतील राजकुमार
In reply to सगळी कडे कोरडी जमीन्,दुष्काळ by श्री गावसेना प्रमुख
In reply to खूप आवडली by राही

तुझी ठेव अस्पर्श तू रक्षिलेली, मिळाली मला; ते ठसे आज ताजे स्मरे त्या क्षणांचे मदोन्मत्त होणे, कराग्रे विहरणे वगैरे वगैरेवाह वाह ! क्या बात थोड्या सारख्या ओळी वाटल्या म्हणून टाकतोय…
तनको तनको उधरे पद औचक I ' शंभु ' कसु पडयो पावतसे II दिनमेंह लगेह पगेह रहे I सब रैन कुहीसी जगावतसें II -छत्रपति संभाजीराजे
In reply to एकदम रोमँटिक .........वगैरे by जयवी
In reply to शृंगार हा माझा विषय नाही. by गंगाधर मुटे
In reply to शृंगार हा माझा विषय नाही. by गंगाधर मुटे
In reply to मुटेसाहेब, 'वगैरे वगैरे' हा by यशोधरा
In reply to "वगैरे" असा आहे by गंगाधर मुटे
In reply to "वगैरे" असा आहे by गंगाधर मुटे
In reply to शृंगार हा माझा विषय नाही. by गंगाधर मुटे
In reply to रदीफ नाही, काफिया. स्वसंपादन by यशोधरा
In reply to गझलेविषयी काहीच बोलल्या नाहीत by गंगाधर मुटे
In reply to :) by यशोधरा
In reply to नाही आवडले तर त्यात काय विशेष by गंगाधर मुटे
In reply to नाही आवडले तर त्यात काय विशेष by गंगाधर मुटे
In reply to गझल अतिशय आवडली. by इन्दुसुता
In reply to इंदुसुता यांच्याशी सहमत. by बॅटमॅन
In reply to बॅटमनसाहेब, करा की नक्कल by यशोधरा
तुम्ही म्हणताय ना की नक्कल केली से, की नाकारताय?पहिल्यांदाच मी म्हटले की नक्कल केली आहे, तर परत या प्रश्नाचे प्रयोजन काय? बाकी क्रेडिट देणे ओके आहे, पण मी माझे काव्य सर्वथैव वरिजिनल, औट ऑफ द ब्ल्यू आहे असा क्लेम तरी कुठे करतोय? लोक ते काव्य वाचून म्हणाले की पंडित कवींची मशिनरी बरी वापरलीये, त्याला मी होच म्हटले आहे. नाकारण्याचा प्रश्न येतच नै. पण मजा अशी आहे, की क्रेडिट द्यायचे तरी कुणाकुणाला? कवी म्हटला की बर्याच गोष्टी इतरांकडून तो उसन्या घेतच असतो. उल्लेख करायचा तरी कुणाकुणाचा. असो.
In reply to तुम्ही म्हणताय ना की नक्कल by बॅटमॅन
गझल मस्त... विशेषतः