आज्याची शिकवन
लेखनप्रकार
मी तवा सातवीत आसन
मी माजे दोन चुलतभाउ सादारन यकाच वयाच
आमी तवापासुन आज्याच्या बीड्या चोरुन पीवाचो. त्याची पन यक झम्मड हाय
आजा म्हन्जे गावचा सरपंच. पन लई पेताड. सकाली उटला क आंगोल धवाचे आदी भट्टी वर हजर न दुपारचा
जेवला क बेड्यान (सुद मराटीत - बैलांचा गोठा) झोपाचा आनी संद्याकाली उतरली क गावचे कामाला लागाचा.
म्हन्जे तेला भेटाचा आसन तर संद्याकालीच. पन गावान धाक जबरा. यकदा क आवाज टीपवला क कोनाची टाप नाय सामनी यवाची
तर क झाल्त ,
आमाला रोज बीड्या लागाच्या आनी खीच्यान पैस कुटल ?
रोज दुपारच्या टायमाला आमी सगले आज्याची वाट बगाचू. यकदा क आजा झोपला क हलूच जावून तेच्या बीड्या पलवाचू.
सुरवातीला आज्याला कई कलाचा नई पन नंतर नंतर तेला शक याला लागला
दुपार झाली
आजा बेड्यान चिप परला व्हता. फुल्ल तर्राट.
आमची टोली हलूच त्याजेजवल सरकु लागली . यकानी मना फुर लोटला बीड्या काराला. मी गेलू न जसा बंडलाला हात लावला
आज्यान चटाककन माजा हात पकरला बोल
मी थरथरलू, पोटान गोला.आता क कराचा ? आज कई खर नाय . आजा न बा दोगेव मिलुन चामडी लोलवनार.
आज्याचा यक डोला उगडला
"बाला आज नूको न्हेव. आज कमी हायत" आजा
मी थंनगार
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ल्ला सगला काय नावानच हाय)
वाचने
11981
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
लै भारी
भारी
तू अन तुजा
छान खुपच छान
मस्त.
आज्या द
आवडल
आई शपथ...
मजा आली
धन्य आहात!
लय भारी !
लई भारी...
माताय!
In reply to माताय! by चतुरंग
सहमत आहे :)
>
काश
जबराट
मजेशीर
मस्त
+१
ज ह ब ह रा हा
जल्ला लय