बटाटा
लेखनविषय:
काव्यरस
केला जरी सर्व भाज्यांनी टाटा
उरतो केवळ मी बटाटा
उन्ह-पाऊस-थंडीत राहतो मी
सान-थोर सर्वांस भावतो मी
गाव-शहर असो पाऊल-वाटा
सर्वत्र दिसतो मी बटाटा
पार्टी असो वा उपास
करती जन माझा तपास
गोड अथवा तिखट
कुरकुरीत वा चिवट
परिस्थिती असो बिकट
असतो मी सदैव निकट
असा मी बटाटा
वाचने
3932
वाचनखूण
प्रतिक्रिया
12

In reply to (No subject) by स्पंदना
हा शुद्ध अन्याय आहे. समोर जे दिसतंय ते त्याक्षणी खाता येत नाही. नुसता फोटो बघून पोटात आगडोंब उसळला.
In reply to (No subject) by स्पंदना
कवितेखाली हे असले फोटो टाकण्याचा दुष्ट्पणा सुचणार्या अपर्णातै चा तीव्र णिशेढ!!!
खरं आहे...! बटाटा भगवंतापेक्षाही सर्वव्यापी झालेला आहे. ;)
बटाट्याच्या जिलब्या कुठं मिळतात म्हणे? :#
बटाट्याचा अतिरेक झाल्याने जरा सध्या तिटकाराच आहे..पण बटाटाकाव्य आवडले.
बटुची कविता आवडली. :)
राजा,
आपल्या कवितेच्या रुपातील प्रतिभा - 'बटाटा एकमेव तारक कंद भाजी' ने बहरुन आली आहे.... मला तर ती भाजीबाजारातील 'राजा' पदवीस पात्र असल्याचे मान्य आहे.
In reply to 'बटाटा एकमेव तारक कंद भाजी' by शशिकांत ओक
@ मला तर ती भाजीबाजारातील 'राजा' पदवीस पात्र असल्याचे मान्य आहे.>>> तरिही असला राजा लोकमान्य की
लोक-सहनकारकहा प्रश्न उरतोच!
खड ,खड चुंबन
दंताडा दंताडी चे लग्न जाहले ,दिवस मजेत जावू लागले .
चुंबन घेता खड~खड होई ,ओठांचे मिलन ना होई ,
आगळे वेगळे ऐसे चुंबन ,तृप्त होईना कधी मन ,
त्रासून त्यांनी लावली कवळी ,चुंबनाची चव ती कळली ,
एकदा मात्र गंमत घडली ,चुंबन घेता कवळी पडली .
खड ,खड चुंबन
दंताडा दंताडी चे लग्न जाहले ,दिवस मजेत जावू लागले .
चुंबन घेता खड~खड होई ,ओठांचे मिलन ना होई ,
आगळे वेगळे ऐसे चुंबन ,तृप्त होईना कधी मन ,
त्रासून त्यांनी लावली कवळी ,चुंबनाची चव ती कळली ,
एकदा मात्र गंमत घडली ,चुंबन घेता कवळी पडली .
स्वतःची व्यथा दंताजींच्या नावे कथा तर नव्हे?
(No subject)