नौदलातील आयुष्य -१
साहेब दारू प्यायलो नसतो तर मला हे काम करणे अशक्य होतेहे स्पष्टीकरण तुम्हाला पटते? मला ती एक सबब वाटते.
नरो वा कुंजरो वा याचा खरा अर्थ मला तेंव्हा समजलातुमची दारुवरची मते वाचल्याने, तुम्हाला ही सबब पटली ह्याचे आश्चर्य वाटले. असो, आजही परिस्थीती बदललेली नाही. आज आपण तंत्रज्ञानात प्रगती केली असूनसुद्धा अशी कामे माणसाला हाताने करावी लागत आहेत आणि त्याने ती करावी अशी अपेक्षाही आहे हे अतिशय लज्जास्पद आहे. - ('नरो वा कुंजरो वा' याचा खरा अर्थ अजुनही न समजलेला) सोकाजी
In reply to ह्म्म्म by सोत्रि
In reply to ह्म्म्म by सोत्रि
In reply to सबब by सुबोध खरे
त्यावेळी मी एक अननुभवी(फक्त २ वर्षाचा अनुभव) डॉक्टर होतो त्यामुळे लोकांनी सांगितलेले सहज पटत असे. दुर्दैवाने मी एक नवनिर्मिती करू शकणारा लेखक नाही. याची मला जाणीव आहे म्हणून कोणताही बदल न करता प्रामाणिक पणे जसेच्या तसे लिहित आहे.पटले, मुद्दा मान्य होण्यासारखा आहे. :) - (समंजस) सोकाजी
In reply to सबब by सुबोध खरे
In reply to ह्म्म्म by सोत्रि
In reply to हे स्पष्टीकरण तुम्हाला पटते? by अर्धवटराव
दारु पिल्यावर संवेदना बोथट होतातका तीव्र होतात? काही काही संवेदना अतीतीव्र झाल्याचे पण दिसते. आमच्या इथला एक ऑफसेट मशीन ऑप्रेटर दिवसा तीन हेल्पर घेऊन काम करायचा पण रात्री ओव्हरटाइम असल्यास दारु पिउन कामाला यायचा (डेली पीणारा होता) एकच हेल्पर घेऊन त्याच क्वालीटीचे काम आटपायचा. अगदी एकदा हेल्परचा हात मशीनमध्ये उलटा पिरगळला जाउन तो खेचला जात असताना इतर सहकारी आरडाओरड करीत होते पण या दारुड्याने क्षणार्धात एक पहार मशीनमध्ये घालून त्याला वाचवलेले सुध्दा पाहिले आहे. दारु पिऊन मी जास्त अॅलर्ट असतो असे तो म्हणायचा, त्याने केलेले काम परफेक्ट असायचे. त्यातली त्याची मानसिकता आणि सवयीचा भाग मी डिफाईन करु शकत नाही. फक्त हा एक अनुभव पाहिला आहे.
In reply to अग आई ग्ग! by स्पंदना
सोत्री साहेब जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे म्हणतात.तो वंश आजही असावा का? असा माझा प्रश्न असल्याने मला ती सबब वाटते. - (काही गोष्टी अनुवांशिक नसाव्यात अशा मताचा) सोकाजी
In reply to सोत्री साहेब जावे त्याच्या by सोत्रि
In reply to येथे वंश म्हणजे "टु स्टेप इन by स्पंदना
येथे वंश म्हणजे "टु स्टेप इन वन्स शुज" असा अर्थ आहे.तो 'अभिप्रेत' अर्थ लक्षात आला होता. :)
त्याच्या बाबतीत हे जस्टीफाय होते आहे.ह्या मताशी अजुनही सहमत नाही. हे जरा मृदंगासारखे होते आहे - दारुची नशा वाइट पण तिच नशा आधार होऊ शकते हे जस्टीफाय होणे. - (नशा हा आधार होऊ शकत नाही असे मानणारा) सोकाजी
In reply to येथे वंश म्हणजे "टु स्टेप इन by सोत्रि
In reply to मला वाटतं, कोणतंही तत्व हे by ५० फक्त
काही, व्यवसायांमध्ये नशेमध्ये राहणं हे क्रमप्राप्त आहे, त्याला उपाय नाहीह्यावर डॉक्टरांचे मत जाणून घेण्यास आवडेल. - (उत्सुक) सोकाजी
In reply to मला वाटतं, कोणतंही तत्व हे by ५० फक्त
In reply to येथे वंश म्हणजे "टु स्टेप इन by सोत्रि
In reply to नशा हा आधार by सुबोध खरे
आयुष्यात इतक्या प्रचंड आवाजाची मला कधीच सवय नव्हती त्यातून हा आवाज सकाळी ९ पासून ते संद्याकाळी ५ पर्यंत सतत असे.या वरूनच माझ्या उमेदीच्या काळातले काही अनुभव आठवले. त्यावेळी अनेक मोठ्ठ्या ऑटॉमोबील उत्पादन विभागात काम केलय. तिथं इंजीन चाचणी करण्यासाठी एक छोटीशी साउंड प्रूफ खोली असते (त्याला टेस्ट बेड म्हणतात). तिथं ऑटॉमेशन असलं तरीही त्यात एक माणूस असावा लागतो. तो बहुतेक ठिकाणी गावाकडून आलेला गरजू आणि शिकाउ जास्तीत-जास्त आयटीआय झालेला उमेद्वार असायचा. त्यामुळे ते युनिअन मध्ये येत नाहीत. इंधन, पाणी, धूर यांच्या नळ्यांवर लक्ष ठेवणे, त्या यंत्रावर इंजीन 'डॉक' करणे अशी कामे असतात. आणि त्या खोलीबाहेर चकचकीत ठिकाणी एक इंजिनीअर संगणकावर सगळी माहिती साठवणे वगैरे व्हाइट क्वालर कामे करत असतो. त्या खोलीत खूपदा आम्हाला काम करावं लागायचं. प्रचंड आवाज, ट्र्याक्टरवगैरेचे प्लांट असतील तर इंजिन चालू असताना जमिनही हादरत असायची. दोन्-तीन तासातच वेड लागाची पाळी यायची. आणि काम जोखमीचं असायचं. त्या काळात प्रोपेलर शाफ्ट तुटण्याची उदाहरणंसुद्धा बघितली होती. सेफ्टीचे नियम, इअर मफ्स वगैरे प्रकरणं कागदावरच असायची (आहेत). सेफ्टी मॅनेजर्स विजीटला आली की काही नाटकं करावी लागाची. मला आश्चर्य तिथं आठ-आठ तास काम करणार्यांचं वाटायचं. पण नंतर लक्षात आलं की ती माणसं तिथं काम करून थोडी बहिरी झालेली होती. बहुतेकांच्या हाताला जखमा झालेल्या असायच्या (इजिनाची हाय प्रेशर (४० बार) वॉल्व निघाल्यामुळे एकाचीतर करंगळी तुटली होती). वाईट वाटायचं पण काहिही करू शकत नव्हतो. त्याकाळात त्यांना एका पाळीला आठ हजार रुपये मिळायचे. काही महाभाग तर सलग तीन पाळ्या करायचे आणि महिन्याला वीस-वीस हजार घरी पाठवायचे. आणि तीन-चार वर्षात 'म्हातारी' होउन कायम न होताच निघून जायची. परत नविन भरती सुरू.
In reply to नौदलातील आयुष्य -१ by विनोद१८
In reply to नवीन शब्द by सुबोध खरे
In reply to सुबोध खरेंनी लिहिलेला अनुभव by अमोल खरे
In reply to नशेमध्ये राहणं हे क्रमप्राप्त by सुबोध खरे
In reply to माझे मत by निनाद मुक्काम …
फार छान! पुभाप्र!