आन्जी: शतशब्दकथा: पैला नंबर
लेखनप्रकार
आमच्या म्हाडिक गुर्जींना बाळ झालं. म्हंजे त्यांच्या बायकोला वो.
गोरी मिटट पोरगी. मी कडे घेतलं की खिदळायची.
आमी सर्वे मऊ हून जायचो.
नादच झाला तिला कडेवर घेऊन हिंडायचा. कुटंकाबी जावा.
म्हाडिक बै सारखी वरडाय लागली, “आन्ज्ये, अगं घे की पोरीला ...”
अंक्या म्हणला, आता तुजा पैला नंबर पक्का.
पण मला कटाळा यायला.
सारखी बबली माझ्यासंगं.
कुणी मला खेळायला बी घेईना.
झाडावर चढता यीना, पळता यीना, मारामारी तर बंदच.
हात बी दुखायला लागला. बबली जड लई.
एक दिस कुणाचं ध्यान नाही ते बगितलं.
जोरात चिमटा काढला बबलीला.
रडली लई. खच्चून.
आता अजाबात येत न्हाई ती माझ्याकडं.
पैला नंबर गेला म्हणा.
जाउंदे.
(केवळ शंभर शब्दांत - शीर्षक सोडून शंभर शब्द- अनुभव मांडण्याचा हा प्रयोग.)
वाचने
12492
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
शंभर नंबरी लिहिलंय. :)
जमलंय!
मस्त आहे!
मस्त प्रकार आहे हा!
जबरी!
आवडले.
मस्तय.
हम्म्म ... असं 'मऊ दिसलं, कि कोपराने खणणारे' लोकं असतात खरे .
पण तिचा पैला नंबर गेला ते वाईट झालं , बरं नाही वाटलं.:(
शंभर शब्दात खूपच प्रभावी लेखन.
भारी लिहीलेय.
सर्व प्रतिसादकांचे आणि वाचकांचे आभार.
लयच भारी!!!
हाहाहा!
मस्तच लिवलंय.
खरचं छान लिहिलय.
छान जमलय :) :)
नव्या वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.
लै भारी, बाॅस.. बबलीपेक्षाही भारी..:-) शतशब्दकथा आवडली.
In reply to भारी बरं का.. by चिगो
चिगो,'शतशब्दकथा'हा एक चांगला शब्द सुचवलात तुम्ही.
आभार.
आता इथून पुढं तुम्ही दिलेला शब्द वापरेन.
आवडेश .... चिकणं लिवलय ;)
आवडलं लई... खच्चून.
+१
शंभर नंबरी लिहिलंय.