-पाऊस -
हिरव्यागार शेताचा मालक मी जरी
सोबत आता फक्त रणरणती सावली ,
खळाळत्या नदीला ना ओंजळभर पाणी
भरलेली विहीर तर कधीच आटली ,
ठिगळ लावतच जगतो मी शेतकरी
ते तरी किती पुरणार...धरणी सुद्धा फाटली
…पण उजळेल आता तिची कुस
……उद्या पडेलच की पाऊस …!!!
गावात खांब आलाय विजेचा
अजून काम राहिलंय थोडं ,
लावेन मग दिवा शंभर चा
लकाकेल मस्त माझं झोपडं ,
देव आहे माझ्या पाठीशी
कसं होईल काही वेडंवाकडं,
....तोरण म्हणून बांधीन ऊस
.....उद्या पडेलच की पाऊस !!!
एक सर झाली की पेरणी करेन ,
गुरांबरोबर चार दिस मीही राबेन ,
तरारेल मग शेत जोमाने ,
डाव सगळा मांडेन मी नव्याने,
भुईला करून टाकेन हिरवं शिवार ,
बैल गाडीवर मग होईल सवार ,
.....कापडं नवीन घालेन असेल माझाच कापूस
.....उद्या पडेलच की पाऊस !!!
मातीत मिसळले बरेच
आधीच हाय खाऊन ,
प्रश्न सुटतील का पण
अशी आत्महत्या करून ,
दोन दिवस नुसतं पाणी पिऊन
आता कळशी गेलीये संपून ,
उद्या पाऊस पडला की
ठेवील गच्च भरून ,
आजची रात्र फक्त सरायला हवी ......
.....उद्या पडेलच की पाऊस !!!
----फिझा.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1586
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
विरोधाभास
आवडली कविता ....
आजची रात्र फक्त सरायला हवी ..
In reply to आवडली कविता .... by जेनी...
मुद्दाम यमक जुळवले नाहीये
In reply to आजची रात्र फक्त सरायला हवी .. by जेनी...
....उद्या पडेलच की पाऊस
कविता आवडली