मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मध्यस्थ

शैलेश हिंदळेकर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
भेट आपुली पहिली वहिली अशी ठरवली नव्हती नकोच होते मला कुणी गं आपल्या अवती भवती चार फुटांचे अंतर होते दोघांमध्ये तेव्हा सवाल माझ्या हृदयीचा तुज कैसा ऐकू यावा मनात राहून गेले सारे शब्द मनातील माझे माझ्यासम बोलणे राहिले तसेच अधुरे तुझे पुन्हा भेटशील एकांती तू वाट पाहू मी किती नको आणू पण कुणी बरोबर मध्यस्थ सोबती

वाचने 688 वाचनखूण प्रतिक्रिया 1