मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रेशिमगाठी

क्रान्ति · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
ती व्याकुळ होउन गाते भावार्त, निरागस गाणी तरुण व्यथांची अन् मनस्मरणीवर जपते विस्मरली नावे विरलेल्या शपथांची ती केविलवाणे हसते भरल्या डोळ्यांच्या रित्या करून पखाली दंव जसे फिकटते, विरते सुकतात आसवे तशीच थबकुन गाली ती अलिप्त होउन लिहिते कधि तिचीच असुनी नसते अशी कहाणी वाचून मनाशी म्हणते 'इतकी अगतिक का असते कुणी दिवाणी?' भिरभिरत एकटी फिरते भंगून विखुरल्या स्वप्नांच्या वाटांनी फिरफिरुन रोज सावरते घरकूल कैकदा विस्कटले लाटांनी मुखवटे कितीक घडविते लावून वर्ख ती फसव्या हास्यासाठी हट्टाने बांधत बसते तुटल्या नात्यांच्या सुटल्या रेशिमगाठी

वाचने 3340 वाचनखूण प्रतिक्रिया 16

मुखवटे कितीक घडविते लावून वर्ख ती फसव्या हास्यासाठी हट्टाने बांधत बसते तुटल्या नात्यांच्या सुटल्या रेशिमगाठी
मस्त!! तुफान!!! भन्नाट !!!!

इन्दुसुता Wed, 02/27/2013 - 08:03
ती अलिप्त होउन लिहिते
आजकाल तिने लिहीणेही सोडून दिले आहे.
हट्टाने बांधत बसते तुटल्या नात्यांच्या सुटल्या रेशिमगाठी
त्या अश्या बांधल्या जात नाहीत हे तिला कसे आणि कधी समजणार, कोण समजवणार? ती एकदा दिसली मजला आरश्यात पाहता पाहता मी ओळखले तिजला नाही आसवात हरवून जाता कवितेवर प्रतिसाद देण्यासाठी जीव थार्‍यावर नाही. या निमित्ताने नानांची एक जुनी कविता आठवली " हे अताशा मला काय होते" असे काहीसे शीर्षक होते....

जेनी... गुरुवार, 02/28/2013 - 01:16
क्रांती ... तु खरच शतजन्मी मीरा ! मी तुझ्या दोन कविता आईला वाचुन दाखवल्या . जस्ट फक्त इमॅजिन कर किती कौतुकाने ऐकत होती ती .. खुप छान वाटलं मला .. थॅंक्स डीअर .

शैलेन्द्र गुरुवार, 02/28/2013 - 17:21
मुखवटे कितीक घडविते लावून वर्ख ती फसव्या हास्यासाठी हट्टाने बांधत बसते तुटल्या नात्यांच्या सुटल्या रेशिमगाठी
काळजावर रेघ उमटावी असे शब्द .. सलाम..