दगड
लेखनविषय:
इकडून एक दगड फेकला
तिकडून दगड वर्षाव आला
दगडालाही भाव आहे
दगडापासून भिती आहे
दगडाने डोके फोडतात
दगडातून देव घडवतात
दगड हाताळावा तरी कसा
ज्याचा त्याचा प्रश्न तसा
वेळेवर फेकला- जीत आहे
वेळ गेल्यावर- फजीत आहे
दगडात शहाणपणा नसतो
फेकणाऱ्यात नक्कीच असतो
दगडांची इमारत का बांधायची
दगडांची नुसती रास का रचायची
दगडा दगडाची गोष्ट फळली
दगड नसेल त्यालाच कळली !
.
वाचने
1570
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
दगडाची गोष्ट अवडली.
दगड! शिकवण! आठवण!
काही कडवी आवडली. छान.
आवडली. काल राष्ट्रवादी आणि
महाराष्ट्राला "--- दगडांच्या