आयटीच्या गोष्टी - ऑन द बेंच
In reply to झकास.... by मन१
In reply to श्री. धन्याश्वर राव, सांगाच ओ by ५० फक्त
In reply to वरील काही प्रतिसादांबाबतः- by मन१
बेंचमुळे करिअरची, रेझ्युमेची वाट लागते असे काही वर लिहिलेले दिसले. किती जण रेझ्युमीवर मी दोन्-चार महिने बेंचवर होतो असे लिहितात?बेंचवर गेल्याने तंत्र कौशल्याची वाट नक्कीच लागते. कारण विशिष्ट सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचं ज्ञान कापरासारखं उडून जाणारं असतं. जर एखादया संगणक तंत्रज्ञानावर तुम्ही महिना दोन महिना काम केले नाहीत तर ते तुम्ही विसरु शकता. नविन नोकरीसाठी अर्ज करताना सहसा दोन महिन्यांपेक्षा जास्त बेंच कालावधी दाखवला जात नाही. कारण दोन महिने मॅनेजेबल असतात. किंबहूना गेले दोन महिने बेंचवर आहे म्हणून दुसरी नोकरी शोधतोय अशी मखलाशी केली जाते. खरं कारण असतं, एवीतेवी बेंचवर आलोय तर थोडं नॉलेज रीफ्रेश करुन बाहेर ट्राय करायला काय जातंय. मिळाली दुसरी नोकरी तर तीस टक्के पगारवाढ कुठेच जात नाही. पंचवीस टक्के तर डोळे झाकून देते समोरची कंपनी. दोन महिन्यांपेक्षा जास्त बेंच कालावधी रीझ्युमेवर दाखवणं म्हणजे आपल्याच पायावर कुर्हाड मारून घेण्यासारखे आहे. ही व्यक्ती दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी बेंचवर आहे याचा अर्थ बरेच वेळा ही व्यक्ती प्रोजेक्ट मिळण्यास लायक नाही असा सरळ सरळ अर्थ घेतला जातो.
In reply to बेंचमुळे करिअरची, रेझ्युमेची by धन्या
मिळाली दुसरी नोकरी तर तीस टक्के पगारवाढ कुठेच जात नाही. पंचवीस टक्के तर डोळे झाकून देते समोरची कंपनी.तुमच्या दुःखांची यादी वाचून मला आणखीनच भरून येतं आहे. म्हणजे बेंचवर दोन महिने काढून आधीच वर्षाचा १६ टक्के पगार फुकट घ्यावा लागतो. त्यात फक्त २५ टक्के पगारवाढीची नोकरी शोधायला वेळ मिळतो.
ही व्यक्ती दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी बेंचवर आहे याचा अर्थ बरेच वेळा ही व्यक्ती प्रोजेक्ट मिळण्यास लायक नाही असा सरळ सरळ अर्थ घेतला जातो.आणि मग काय, नाइलाजाने फक्त १० टक्के पगारवाढीची नोकरी स्वीकारावी लागते? इतके दुःखप्राय अनुभव गाठीशी नसल्याने 'सहानुभूती' देणं शक्य नाही.
In reply to वरील काही प्रतिसादांबाबतः- by मन१
In reply to रेझ्युमे by आजानुकर्ण
In reply to नै म्हंजे उगाच एक भोचक शंका. by आनंदी गोपाळ
साधारण कितपत पगार असतो हो आय्टी वाल्या विंजिनेर लोकांस्नी?पोटापाण्याची सोय होण्याईतकापासून ते कितीही. (या कितीहीच्या जागी तुम्हाला जो मोठयात मोठा आकडा वाटेल तो टाका. कदाचित एखादया आयटीवाल्याला तुमच्या आकडयापेक्षाही जास्त पगार असू शकेल.)
In reply to पुढे सविस्तर लिहिनच... by धन्या
काही जण बीएस्सी, एमएस्सी, बीसीए, एमसीए (काही वेळा चक्क बीए, बिकॉमही) या पदव्या मिळवलेले असतात
यातल्या "बीए बीकॉमला" चक्क का केले ते कळाले नाही.
आयटी / आयटीईस / सर्व्हिस बेस्ड / प्रॉडक्टबेस्ड कंपन्यांमधल्या लोकांचा परफॉर्मन्स ट्रॅक करणारी / प्रोजेक्ट रेव्हेन्यू कॅल्क्यूलेट करणारी व्यक्ती बीकॉम वाली असू शकते.
गारेगार एसीमध्ये, गुबगुबीत खुर्चीवर बसून, फारसे कष्ट न करता मिळालेला पगार एखाद्या बीकॉम वाल्याने प्रोसेस केलेला असू शकतो. ;-)In reply to चक्क बीए, बिकॉमही..?? by मोदक
In reply to चक्क बीए, बिकॉमही..?? by मोदक
यातल्या "बीए बीकॉमला" चक्क का केले ते कळाले नाही.अगदी अगदी !!! हे सो कॉल्ड इंजिनीअर्स पण भारी असतात. हल्लीच एक इंटरव्यू घेतला. साडेपाच वर्षे अनुभव. आणि Array searching चे प्रकार सांग असे म्हटल्यावर कॉलेजनंतर ते कधी लागले नाही असे सांगितले. ही ज्ञानाची पातळी असेल तर बीए-बीकॉमलाच कशाला १२वीतील अनेक पोरांना जास्ती चांगले काम करता येईल. (इंजिनीअर्स या जमातीवर एकदा लिहायचे आहे) (नॉन इंजिनीअर्स) विमे
In reply to यातल्या "बीए बीकॉमला" चक्क का by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to यातल्या "बीए बीकॉमला" चक्क का by विश्वनाथ मेहेंदळे
बीए-बीकॉमलाच कशाला १२वीतील अनेक पोरांना जास्ती चांगले काम करता येईल.मुळात भारतीय सर्विस इंडस्ट्रीमधील आयटी कंपन्यांमध्ये ८० ते ९० टक्के कामासाठी इंजिनियर (बीई) वगैरे लोकांना बसवणे हेच मोठे अंडरयुटिलायझेशन आहे. सपोर्ट, मेंटेनन्स, ticket resolution वगैरेसाठी Data Entry Operator levelचे प्राथमिक ज्ञान असलेला कोणताही ग्रॅज्युएट चालेल. डेवलपमेंट वगैरे कामे सुद्धा अशा लोकांना गूगल सर्च किंवा वेगवेगळ्या टेक्निकल फोरम्स वरील सॅम्पल कोड वापरुन करता येतील. नाहीतरी बऱ्याच आयटी कंपन्या बीएस्सी बीकॉम वगैरेंना घेऊन चारचार वर्षाच्या बाँड्सवर ही कामे करुन घेतच आहेत. माझ्या आठवणीनुसार पाचसहा वर्षापूर्वी अशा 'सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना' आठएक हजार रुपये महिना पगार मिळत असे. आताची कल्पना नाही.
In reply to अगदी by आजानुकर्ण
In reply to अगदी by आजानुकर्ण
In reply to अच्युत गोडबोलेंची आठवण झाली by श्रीरंग_जोशी
In reply to हो by आजानुकर्ण
In reply to अगदी by आजानुकर्ण
मुळात भारतीय सर्विस इंडस्ट्रीमधील आयटी कंपन्यांमध्ये ८० ते ९० टक्के कामासाठी इंजिनियर (बीई) वगैरे लोकांना बसवणे हेच मोठे अंडरयुटिलायझेशन आहे.परत तेच. मुळात या इंजिनियर लोकांना फार काही येत नसेल तर त्यांना अशी कामे दिली तर ते अंडरयुटिलायझेशन कसे ?? कठीण कामे दिली तर काय तीर मारणार आहेत हे ? की इंजिनियर ही डिग्री आहे म्हणून त्यांना भारी मानायचे ?? (एक वैयक्तिक प्रश्न :- तुम्ही इंजिनियर आहात का, शिक्षणाने?? )
सपोर्ट, मेंटेनन्स, ticket resolution वगैरेसाठी Data Entry Operator levelचे प्राथमिक ज्ञान असलेला कोणताही ग्रॅज्युएट चालेल. डेवलपमेंट वगैरे कामे सुद्धा अशा लोकांना गूगल सर्च किंवा वेगवेगळ्या टेक्निकल फोरम्स वरील सॅम्पल कोड वापरुन करता येतील.विचारांची पातळी लक्षात आली..... आधी कीव वाटली मग खाली वाचून कळले की आपण मॅनेजर आहात. तेव्हा तुम्हाला माफ. चालू द्या जे काही चालू आहे ते.
In reply to मुळात भारतीय सर्विस by विश्वनाथ मेहेंदळे
विचारांची पातळी लक्षात आली..... आधी कीव वाटली मग खाली वाचून कळले की आपण मॅनेजर आहात. तेव्हा तुम्हाला माफ. चालू द्या जे काही चालू आहे ते.यात पातळीचा काय संबंध आहे? भारतात ज्या कंपन्यांना आयटी लीडर्स वगैरे म्हटले जाते तिथली ऐंशी नव्वद टक्के कामे सपोर्ट आणि मेंटेनन्सची असतात. ती कामे हाताळण्यापुरते ज्ञान आजकाल गूगलवर सहज मिळते. असो तुमची माफी मिळाल्याने धन्य झालो. माफ केल्याबद्दल शतशः आभारी आहे.
In reply to हो by आजानुकर्ण
हो मी इंजिनियर आहे....... शून्यापासून कोड लिहावा लागला आहे.ते ठीक आहे पण म्हणून ते न येण्याचे समर्थन करता कामा नये. हे म्हणजे एखाद्या फिजिक्स शिकलेल्याने मला न्यूटन चा नियम येत नाही कारण तो मला कधी थेट वापरावा लागला नाही असे म्हणण्यासारखे झाले.
याचे कारण भारतातल्या आयटी कंपन्यांमध्ये package customization, enhancements, वगैरेच कामे होतात. त्यामुळे एवढे सगळे शिकूनही या ज्ञानाचा कुठेही practical उपयोग झाला नाही.
सपोर्ट, मेंटेनन्स, ticket resolution वगैरेसाठी Data Entry Operator levelचे प्राथमिक ज्ञान असलेला कोणताही ग्रॅज्युएट चालेल. डेवलपमेंट वगैरे कामे सुद्धा अशा लोकांना गूगल सर्च किंवा वेगवेगळ्या टेक्निकल फोरम्स वरील सॅम्पल कोड वापरुन करता येतील.तुमचे मत बदलल्यात मला व्यक्तिश: रस नाही पण तिथे माझ्या प्रोफेशन बद्दल चुकीचा संदेश जात आहे म्हणून लिहितो आहे. यातले कुठलेही काम गूगल सर्च ने करता येत नाही. गूगल सर्च बद्दल बोलायचेच झाले तर ते Development साठी पण करता येते. कसलेले प्रोग्रामर्स सुद्धा online reference शोधतात आणि वापरतात. आणि त्यात काहीही गैर नाही. नक्की काय आणि कुठे शोधायचे आणि ते कसे वापरायचे हेच माहित नसेल तर काय करणार? शिवाय reinventing wheel चा प्रकार कशाला करायचा? हे म्हणजे hardware मध्ये काहीतरी नवीन करणाऱ्याला तू डायोड किंवा IC स्वतः तयार करतोस का असे विचारण्यासारखे आहे* अजूनही मुद्दा कळला नसेल तर एक आव्हान आहे. मी काही बिसिनेस प्रोब्लेम्स देतो. त्यांची उत्तरे मला द्या. पण अट अशी की गुगल करूनच प्रोग्राम शोधून दाखवायचे. स्वतः १०% पेक्षा जास्त कोड लिहायचा नाही किंवा बदल करायचे नाहीत. स्वीकारताय ??? अंडरयुटिलायझेशन बद्दलच्या प्रश्नांना शिताफीने बगल दिलीत ते लक्षात आले हं माझ्या :-) त्यांना मुळात काहीच फारसे येत नसते हे एकदा कबुल केले की अंडरयुटिलायझेशनचा मुद्दा रद्दबातल होतो. * उदाहरण चुकले असेल पण आशय समजून घ्या.
In reply to हो मी इंजिनियर आहे....... by विश्वनाथ मेहेंदळे
ते ठीक आहे पण म्हणून ते न येण्याचे समर्थन करता कामा नये. हे म्हणजे एखाद्या फिजिक्स शिकलेल्याने मला न्यूटन चा नियम येत नाही कारण तो मला कधी थेट वापरावा लागला नाही असे म्हणण्यासारखे झाले.न येण्याचे समर्थन कुठे आहे? मी अमुकतमुक गोष्ट शिकलो होतो. ती मला त्यावेळी चांगली येत होती हे माझ्या तत्कालीन गुणांवरुन वगैरे वगैरे कळू शकते. मात्र माझ्या प्रोफेशनमध्ये मी ती कधीही वापरली नाही त्यामुळे मला ती आता तितकीशी चांगली किंवा अजिबातच येत नाही हा साधा कार्यकारणभाव आहे. शिकलेली एखादी गोष्ट जर वापरली नाही, वारंवार आठवली नाही (recite), तर मेंदू ती विसरतो हे साधे फंक्शन आहे. मात्र तुम्ही प्रत्येक गोष्ट डिफेन्सिवली घेतली तर तुम्ही दुसऱ्या माणसाची नक्की काय क्वालिटी आहे हे तपासू शकणार नाही. उदा. मी सुद्धा फिजिक्स शिकलो आहे. दोनवर्षे हायर सेकंडरी आणि एक वर्षे इंजिनियरिंगच्या पहिल्या वर्षाला. मलाही न्यूटनचे जे काही चार नियम आहेत ते पूर्णपणे येत नाहीत. न्यूटनचा नियम येण्याने किंवा न येण्याने मी आता जे काम करतो आहे त्याच्या क्वालिटीमध्ये काहीही फरक पडत नाही. तीच गोष्टऍरे सर्चिंग आणि सॉर्टिंगची. या गोष्टी कशा केल्या जातात याची थियरी मी शिकलो होतो ती मला माहीत होती. मात्र तो अल्गोरिदम मी स्वतः इंप्लिमेंट करण्यासाठी क्वचितच वापरला आहे. त्यामुळे जर तो पुन्हा वापरायचा असेल तर मला तो एकदा घासूनपुसून घ्यावा लागेल. आता मी दहा वर्षापूर्वी फिजिक्स किंवा अँरे सॉर्टिंग शिकल्याने दर सहा महिन्याला (किंवा जी काही स्मरणशक्तीची क्षमता असेल त्यानुसार मला रोजच्या कामासाठी आवश्यकता नसूनही) मी न्यूटनचा नियम किंवा अँरे सॉर्टिंग पाठ करत राहावे अशी अपेक्षा वेडगळपणाची आहे. त्याऐवजी माझ्या क्षेत्रात जे काही नवे चालू आहे ते शिकत राहणे मला फायद्याचे वाटते.
तुमचे मत बदलल्यात मला व्यक्तिश: रस नाही पण तिथे माझ्या प्रोफेशन बद्दल चुकीचा संदेश जात आहे म्हणून लिहितो आहे. यातले कुठलेही काम गूगल सर्च ने करता येत नाही. गूगल सर्च बद्दल बोलायचेच झाले तर ते Development साठी पण करता येते. कसलेले प्रोग्रामर्स सुद्धा online reference शोधतात आणि वापरतात. आणि त्यात काहीही गैर नाही. नक्की काय आणि कुठे शोधायचे आणि ते कसे वापरायचे हेच माहित नसेल तर काय करणार? शिवाय reinventing wheel चा प्रकार कशाला करायचा? हे म्हणजे hardware मध्ये काहीतरी नवीन करणाऱ्याला तू डायोड किंवा IC स्वतः तयार करतोस का असे विचारण्यासारखे आहे*तुमचे प्रोफेशन जर टिकेट रिझॉल्युशन, सपोर्ट आणि मेंटेनन्स प्रकारचे असेल आणि तुम्ही गूगल सर्च वगैरे वापरत नसाल तर तुम्ही work smart ऐवजी work hard करत आहात एवढेच म्हणेन. तुमचे प्रोफेशन मी याआधी लिहिलेल्या कामापेक्षा जर थोड्या वेगळ्या प्रकारचे असेल तर तशी जरा बरी १०-१५ टक्के कामे भारतात होतातच की. मी ते कुठे नाकारले आहे? तरीही तुम्हाला वाटत असेल की भारतातील आयटी प्रोफेशन हे अगदी उच्च दर्जाचे innovational आणि ground breaking वगैरे काहीतरी आहे आणि तिथे अतिउच्चशिक्षित व्यक्तीच लागतात तर तुम्ही तो गैरसमज दूर करुन घेतल्यास तुम्हालाच फायदा होईल.
शिवाय reinventing wheel चा प्रकार कशाला करायचा? हे म्हणजे hardware मध्ये काहीतरी नवीन करणाऱ्याला तू डायोड किंवा IC स्वतः तयार करतोस का असे विचारण्यासारखे आहे*एक्झॅक्टली. कसे बोललात. सगळ्या न्यू जनरेशन लँगवेजेस हे अत्यंत एफिशियंट सर्चिंग आणि सॉर्टिंग एपीआय देतात. नव्या ३-४-५ जी एल प्रॉग्रॅमिंग लँगवेजेसच्या लायब्ररीजचा अभ्यास करुन ऑलरेडी ट्राईड अँड टेस्टेड एपीय लगेच वापरता येतो. साडेपाच वर्षे अऩुभव असलेल्या इंजिनियरला 'तुला हे एपीआय वापरता येतात का? असल्यास कसे वापरायचे ते एक्सप्लेन कर' वगैरे प्रश्न विचारणे मला सयुक्तिक वाटते. मात्र त्याला सर्चिंग अल्गोरिदम सांग हे reinventing wheel आहे. मात्र नुकताच कॉलेजमधून पासआऊट झालेल्या मुलाला अधिक थिअरेटिकल असा अल्गोरिदमबाबतचा प्रश्न विचारला तरी चालेल.
अजूनही मुद्दा कळला नसेल तर एक आव्हान आहे. मी काही बिसिनेस प्रोब्लेम्स देतो. त्यांची उत्तरे मला द्या. पण अट अशी की गुगल करूनच प्रोग्राम शोधून दाखवायचे. स्वतः १०% पेक्षा जास्त कोड लिहायचा नाही किंवा बदल करायचे नाहीत. स्वीकारताय ???तुम्ही अजूनही माझ्या प्रतिसादाचे मर्म समजावून घेतलेले नाही. बिझिनेस प्ऱॉब्लेमची उत्तरे ही support, maintenance, ticket resolution. server availability, data failure वगैरे जी ब्रेड अँड बटर म्हणतो त्या स्वरुपाची कामे आहेत का? भारतात जशी टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, पटनी, वगैरे बॉडी शॉपिंग कम कन्सल्टन्सी करणाऱ्या कंपन्या आहेत तशाच थॉटवर्क्स, मॅथवर्क्स, इंट्यूट वगैरे कंपन्याही आहेत. मात्र एकूण आयटी एम्पलॉईजचा रेशो पाहिला तर जास्त प्रकारची कामे कोणती चालतात हे तुमच्या लक्षात येईल. बिझिनेस प्रॉब्लेमची उत्तरे गूगल करुन मिळतात हे मी कुठे लिहिले होते ते दाखवावे. ज्या स्वरुपाची लो-एंड कामे मुख्यत्वे होतात त्याची उत्तरे गूगलवर सहज मिळतात हा माझा दावा होता.
मुळात या इंजिनियर लोकांना फार काही येत नसेल तर त्यांना अशी कामे दिली तर ते अंडरयुटिलायझेशन कसे ??अंडरयुटिलायझेशनच्या मुद्द्याला बगल दिलेली नाही. इंजिनियर लोकांना फार काही येत नाही हे तुमचे इंटरप्रिटेशन साडेपाच वर्षाचा अनुभव असलेल्या व्यक्तीला साडेपाच वर्षापूर्वी शिकलेला अँरे सर्चिंग अल्गोरिदम येत नाही या गृहितकावर अवलंबून असल्याचे मला दिसले. त्या इंजिनियरला इतर काही येते की नाही याबाबचा अधिक डेटा तुम्ही दिलेला नाही. जर त्या इंजिनियरला दुसरे काही येत नसेल तर त्याला ही कामे देणे अंडरयुटिलायझेशन नाही.
In reply to अगदी by आजानुकर्ण
In reply to नेहमीच नाही. by मैत्र
In reply to पेटलाय धागा... आय.टी. वाले by नानबा
In reply to मागुन पण देत नाहीत हो बेंच :) by जातवेद
मी >१,००,००० कर्मचारी वाल्या कं.त आहे.तुम्हाला बेंचवर येऊ देत नाहीत तेच चांगलं आहे. एकदा आलात की कुठून झक मारली आणि प्रोजेक्टमधून रिलीज घेऊन बेंचवर आलो असं होऊन जाईल. :) > १,००,००० कर्मचारीवाल्या कंपन्यांचा बेंच २५,००० च्या आसपास असतो. या पंचवीस हजारात माणूस कुठे हरवून जातो त्याचं त्यालाच कळत नाही.
In reply to मी >१,००,००० कर्मचारी वाल्या by धन्या
या पंचवीस हजारात माणूस कुठे हरवून जातो त्याचं त्यालाच कळत नाही.एकदम बरोबर.
In reply to मस्त! by पिवळा डांबिस
In reply to मस्त रे ! by मालोजीराव
In reply to येवढे पर्तिसाद आसूनही by चौकटराजा
In reply to काय हे काका... by धन्या
In reply to माझी कंपनी बेंच एरिया सारख्या by विश्वनाथ मेहेंदळे
माझी कंपनी बेंच एरिया सारख्या unproductive गोष्टींवर खर्च करत नाही.आनंदाची गोष्ट आहे.
आधी तर बेंच वर असताना ऑफिसला जायची गरजच नसायची. हल्ली दिवसातून एकदा तोंड दाखवायला सांगतात म्हणे.तुम्ही भाग्यवान आहात.
मला तर ते ही सांगितले नव्हते. सांगितले असते तर थोडा दंगा घातला असता, लॉगिक सांगा म्हणून.कंपनी तुम्हाला चांगलीच ओळखून असणार. (आम्ही तर तुमच्या मुद्देसुद प्रतिसादांना घाबरुन मिपावर लिहणंही बंद केलं होतं.)
त्यातून आमच्या इथे ना डॉर्म असते ना खेळाचे मैदान. जाऊन टाईमपास करणार तरी कुठे?एकदा ऑफीसमध्ये रिकाम** नऊ तास काढायचे नाहीत म्हटल्यावर या गोष्टींची गरजच नाही. व्यनीतून तुमचा ईमेल आयडी कळवा. माझा रीझ्युमे पाठवून देतो. आणि हो, तेव्हढं ईंटरव्ह्यू पॅनलवर कृपा करुन दुसर्या कुणाला तरी बसवा. तुम्ही नको. इथं सॉर्टींग आणि सर्चिंग अल्गोरिदम कुणाच्या बाला येत आहेत. ;)
In reply to माझी कंपनी बेंच एरिया सारख्या by धन्या
तुम्ही भाग्यवान आहात.व्यनितून CTC आणि total exp सांगतो. मग परत हेच बोलून दाखव ;-)
आम्ही तर तुमच्या मुद्देसुद प्रतिसादांना घाबरुन मिपावर लिहणंही बंद केलं होतंफाडा बिले गरिबावर...
व्यनीतून तुमचा ईमेल आयडी कळवा. माझा रीझ्युमे पाठवून देतो. आणि हो, तेव्हढं ईंटरव्ह्यू पॅनलवर कृपा करुन दुसर्या कुणाला तरी बसवा. तुम्ही नकोआनंदाने :-)
इथं सॉर्टींग आणि सर्चिंग अल्गोरिदम कुणाच्या बाला येत आहेत.मग आजानुकर्णांची टीम जॉईन कर ;-)
In reply to तुम्ही भाग्यवान आहात. by विश्वनाथ मेहेंदळे
मग आजानुकर्णांची टीम जॉईन कर.यातला विनोदाचा भाग बाजूला ठेवूया. पण आयटीत काही जॉब प्रोफाईल असे आहेत की त्यासाठी विशेष शिक्षणाची मुळीच गरज नाही. कामचलाऊ ईंग्रजी लिहिता आणि बोलता आलं तरी पुरेसं असतं. सर्व्हीस बेस्ड आयटी कंपन्यांमधील सपोर्ट प्रोजेक्टसमध्ये नक्कीच काही जॉब प्रोफाईल असे असतात. उदा. एका प्रसिद्ध जागतिक औषध निर्माण कंपनीला एक तितकीच प्रसिद्ध भारतीय सर्व्हीस बेस्ड आयटी कंपनी संगणकीकरण सेवा पुरवते. या औषध निर्माण कंपनीची कामे जगभरात २४x७ तास चालू असतात. या ऑपरेशन्ससाठी काही अतिमहत्वाच्या संगणक प्रणाली अचूक आणि अविरत चालू असणे गरजेचे असते. अर्थात संगणक प्रणालींच्या आजवरच्या अनुभवांतून एक गोष्ट लक्षात आलेली आहे की ती संगणक प्रणाली बनवत असताना कितीही काळजी घेतली असली, तिच्या कितीही चाचण्या केलेल्या असल्या, तरी प्रत्यक्ष वापराच्या वेळी त्या त्या वेळच्या हार्डवेअर, सॉफ्टवेअर, नेटवर्क कनेक्टीव्हीटी ईत्यादींच्या परिस्थितीनुसार संगणक प्रणाली तिच्या अपेक्षित वागण्यापेक्षा थोडी वेगळी वागू शकते. (अनएक्स्पेक्टेड रीस्पॉन्स). काही वेळा संगणक प्रणाली ठप्पही होऊ शकते. (अनअवेलिबिलीटी). अशा वेळी संगणक प्रणाली आणि कंपनीचे कामकाज जर एकमेकांशी खुपच जखडलेले असतील (टाईटली कपल्ड) तर मग अपेक्षित प्रतिसाद न देणार्या / बंद पडलेल्या संगणक प्रणालीमुळे कंपनीचे प्रत्यक्ष कामकाज (उदा. कच्चा माल एका विशिष्ट प्रमाणात एकमेकांत मिसळणे, तयार झालेल्या औषधी गोळ्या बाटल्यांमध्ये भरणे, ठराविक संख्येच्या बाटल्यांचे खोके भरणे ई.) असा काही संगणक प्रणालीचा बिघाड झाला की फ्लोअरवरचे कामगार किंवा त्यांचा सुपरवायझर कुणीतरी त्यांना उपलब्ध करुन दिल्या गेलेल्या समस्या व्यवस्थापन प्रणाली (इन्सिडंट मॅनेजमेंट सिस्टीम) मध्ये तो त्या समस्येची (इन्सिडंटची) नोंद करतो. जगाच्या पाठीवर कुठेतरी त्या औषध निर्माण कंपनीच्या आयटी सर्व्हीस प्रोव्हायडर कंपनीचे लोक या समस्या व्यवस्थापन प्रणालीवर २४x७ तास लक्ष ठेवून असतात (इन्सिडंट मॉनिटरींग). सर्व्हीस बेस्ड आयटी कंपन्यांच्या सपोर्ट प्रोजेक्टसमध्ये तीन शिफ्टसमध्ये काम चालते ते याचमुळे. तिकडे फ्लोअरवरच्या कामगाराने त्याच्या समस्येची नोंद केली की अगदी पुढच्या क्षणी त्या सम्स्येची माहिती इकडे आयटीवाल्यांना दिसू लागते. ही माहिती वर्गीकृत (क्लासिफाईड) असते. कुठल्या संगणक प्रणालीत बिघाड झाला आहे, हा बिघाड झाला तेव्हा कामगार प्रणालीच्या नेमक्या कोणत्या सुविधेचा वापर करत होते ईत्यादी माहिती त्या इन्सिडंटमध्ये नोंदवलेली असते. आता आयटी कंपनीत जी कुणी व्यक्ती मॉनिटरींग करत असते तिला स्वत:ला त्या समस्येवर काम करायचे नसते. त्या व्यक्तीने फक्त ती समस्या कोणत्या टीमकडे पाठवायची आहे हे तपासायचं, त्या टीममधला कोण ईंजिनीयर पाहायचं आणि तो इन्सिडंट त्या शिफ्टमधल्या ईंजिनीयरच्या नावे करुन टाकायचा. कधी कधी नेटवर्क डाऊन असेल तर सार्याच यंत्रणा ठप्प होतात अशा वेळी नेटवर्क कनेक्टीव्हीटी पुर्ववत करणं हाच एक क्रिटीकल इन्सिडंट असतो. कुठलीच संगणक प्रणाली उपलब्ध नसल्यामुळे फ्लोअरवरचे काम इंन्सिडंट मॉनिटरींग टीमला फोन करतात. इन्सिडंट टीमने मग तो इन्सिडंट नेटवर्क टीमला फोन कॉल करुन असाईन करायचा असतो. ईथून पुढे आयटी ईंजिनीयर लोकांचे काम सुरु होते. त या सार्या इन्सिडंट मॅनेजमेंट प्रकारात कुठलेच विशेष ज्ञान लागत नाही. जे लोक समस्या व्यवस्थापन प्रणालीवर लक्ष ठेवून असतात, त्यांना ईंग्रजी समजणं, लिहिता, वाचता आणि बोलता येणं एव्हढंच पुरेसं असतं. कुठली समस्या कुठल्या टीमकडे पाठवायची ही माहिती वर्ड किंवा एक्सेल फाईलमध्ये असते. सर्व्हीस बेस्ड आयटी कंपन्या उपरोल्लिखित जॉब प्रोफाईलसाठी बीएस्सी आयटी/कॉम्प्युटर, बीसीए अशी शै़क्षणिक पात्रता असलेली मुले/मुली या जॉब प्रोफाईलसाठी घेतात. पगारही विशेष नसतो (दहा हजाराच्या आसपास). शिफ्टस कराव्या लागतात. कामाच्या गरजेनुसार दर आठवडयाला किंवा महिन्याला शिफट्स बदलातात. तरीही पोरं आपण आयटीतल्या एका बडया कंपनीत काम करतो म्हणून खुश असतात. तुमच्या घरी, शेजारी पाजारी कुणी बीएस्सी आयटी/कॉम्प्युटर किंवा बीसीए झालेला तरुण/तरुणी एखाद्या बडया आयटी कंपनीत शिफ्टसमध्ये काम करत असेल तर तो/ती इन्सिडंट मॉनिटरींगचं काम करतो/करते असं बिनधास्त समजावे. कारण या प्रोफाईलवर दुसरी कुठली शैक्षणिक पात्रता असलेलं सहसा कुणी नसतं.
In reply to मग आजानुकर्णांची टीम जॉईन कर. by धन्या
In reply to या प्रकाराला लेवल-१ सपोर्ट by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to बेसिक्स कच्चेपेक्षाही L1 ला by यशोधरा
In reply to माफ करा. माझी प्रतिसाद by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to बेसिक्स कच्चेपेक्षाही L1 ला by यशोधरा
एखाद्या नावाजलेल्या outsourcing वाल्या कंपनीत किती टक्के लोक L१ ला असतात रे ?एकुण आयटीवाल्यांच्या संख्येच्या मानाने खुपच कमी.
बेसिक्स कच्चे असल्याने मी म्हणतो त्या लोकांना efficient solutions देत येत नाहीत. मग धेडगुजरी पद्धतीने काम होते. आणि त्यात काही चूक आहे असे कुणालाच वाटत नाही. मुळात आपल्या अज्ञानामुळे आपल्याला जास्त काम करावे लागत आहे हेच कळत नाही. एक प्रॉब्लेम दहा प्रकारे सोडवता येतो पण ज्याला त्यातले ज्ञान आहे त्याला, इतरांना ते दहा options दिसणारच नाहीत.बेसिक कच्चं असण्यापेक्षा मुळात त्यांचं शिक्षण आणि प्रशिक्षण तितकं खोलवर झालेलं नसतं. मुळात कंपनीला पैसे वाचवायचे असल्यामुळे कंपनीही अशीच माणसं निवडते. मग कुणीतरी त्यांना नॉलेज ट्रान्स्फरच्या नावाखाली "हे असं करायचं, ते तसं करायचं" अशी जुजबी माहिती देतं. आणि ते पब्लिकही ते तसंच करत राहतं. आणि मग हे तुम्ही म्हटल्याप्रमाणे प्रॉब्लेम्स होतात. विमे, The Blub Paradox हे अफलातून आर्टीकल शेअर करण्यासाठी धन्यवाद.
In reply to दोघांनीही छान माहिती दिलीय. by धन्या
विमे, The Blub Paradox हे अफलातून आर्टीकल शेअर करण्यासाठी धन्यवाद.Blub Paradox च्या मागचा फंडा बऱ्याच ठिकाणी वापरता येतो. मागे एका अध्यात्मिक वादात माझा मुद्दा समजावून सांगण्यासाठी मी त्या सारखे एक उदाहरण वापरले होते. पॉल ग्राहम चा पूर्ण ब्लॉग बघ. अत्यंत सुंदर आहे. त्या माणसाचा करीअर ग्राफ पण रोचक आहे. त्याने एकेकाळी वेब स्टार्टअप सुरु केली, ती कालांतराने याहू ला विकली आणि याहूत नोकरी करायला लागला. आता ती नोकरी सोडली आणि फंडींग देतो इतर स्टार्टअप्स ना. Dropbox आणि Airbnb या दोन्हींना त्याचे फंडिंग आहे. १० बिलियन चा पोर्टफ़ोलिओ आहे त्याच्या कंपनीचा. या सगळ्या अनुभवामुळे ब्लॉग ला वजन आहे :-)
In reply to काय हे काका... by धन्या
In reply to बेंचवर बसलेले आयटीतले नवरे. by लौंगी मिरची
In reply to सकु आणि संखंचं ' स्पायडरमॅन by ५० फक्त
In reply to लिंक मिळु शकते का ? by लौंगी मिरची
In reply to बेंचवर बसलेले आयटीतले नवरे. by लौंगी मिरची
आईशी गप्पा मारुन नको नको त्या न्युझ घरी आणेल ..कुणाच्या आईशी? नको नको त्या न्युज म्हणजे काय?
In reply to लै लोकं बसले बेंच मोडला तर नै by नाना चेंगट
In reply to हत्ती आणि अनेक डोळस by मैत्र
(अनेक वर्षे आयटी कंपन्यामध्ये काढलेला / कुठल्याही स्किल्सचा अभाव नसताना साडेचार महिने सलग बेंच पाहिलेला / इंप्लिमेंटेशन्स / सपोर्ट आणि सीआर सर्व प्रकार पाहिलेला पण आजवर एकही 'कोड' न लिहिलेला) मैत्रतुम्ही तर खुप मोठी हस्ती दिसता आयटीमधील. आपल्याबद्दल आदर आहे.
हत्ती आणि चार आंधळे या गोष्टीप्रमाणे चर्चा चालू आहे असं वाटतंय. महत्त्वाचा फरक हा की इथे अनेक डोळस आहेत आणि समोर येणारे सोंड / पाय/ शेपूट / कान असे अवयव पाहून हा महाकाय प्राणी असाच आहे असे दावे प्रतिदावे सुरू आहेत.चर्चा चालू आहे हे महत्वाचे नाही का?
चर्चा आणि काही मुद्दे उत्तम आहेत आणि नॉन आयटी वाचकांना बरीच माहिती मिळेल यात शंका नाही पण खूप काही एकांगी लिखाणही दिसते आहे.याची शक्यता मी नाकारत नाही. किंबहूना, पहिल्या भागात मी तसा उल्लेख केलाच आहे:
कमी अधिक अशा साडे सात आठ वर्षांच्या माझ्या आयटी करीयरमध्ये खुप काही गोष्टी पाहील्या, अनुभवल्या. काही आनंद देणार्या, काही आपल्या क्षमतेचा कस पाहणार्या, काही मनस्वी चीड आणणार्या, तर काही नैराश्येच्या खोल गर्तेत फेकून देणार्या. या सार्याबद्दल लिहिण्याचा हा प्रयत्न असेल. मिपावर आयटीमधील रथी महारथी आहेत. ते माझ्या लेखनात काही चुका झाल्या तर दाखवून देतीलच. तसेच ते प्रतिसादांमधून आपले अनुभवही सांगतील, वाचकांच्या प्रश्नांना उत्तरेही देतील याची मला खात्री आहे.नाऊ ईट्स युअर टर्न सर. माझं लेखन एकांगी कसं आहे हे पटवून देणार्या तुमच्या प्रतिसादाची मी वाट पाहतोय. तुमच्या प्रतिसादाने माझ्या आणि माझ्या या लेखमालेच्या वाचकांच्या ज्ञानात नक्की भर पडेल अशी मला आशा आहे.
In reply to (अनेक वर्षे आयटी कंपन्यामध्ये by धन्या
In reply to छान माहिति by कुळाचा_दीप
श्री. धन्याश्वर राव, सांगाच ओ