माणूस
लेखनविषय:
काव्यरस
खगांचे थवे, पाखरे ही निरागस
काय कसे रज, कण संचिताचे
थकेनात पंख, खळे ना भरारी
रिते मोकळे सोस, निळ्या अंबराचे
न हेवे न दावे, न साठे कशाचे
हवेसे नितळ, पारदर्शी उसासे
ढळे दिवस कोरा, रात्र आणि काळी
जगाची तमा ना, असे खेळ सारे
माणूस मी, भूक, व्याधी उपाधी
मुळी मूढ ईर्षा, अंध, अंग जाळी
परा, बुद्धी-प्रज्ञा, असूनी उपाशी
अवकाळ मोठा, सदा मोह पाशी
.........................अज्ञात
वाचने
1619
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
आवडली कविता !!
परत एक सुंदर रचना
माणूस मी, भूक, व्याधी उपाधी मुळी मूढ ईर्षा, अंध, अंग जाळी परा, बुद्धी-प्रज्ञा, असूनी उपाशी अवकाळ मोठा, सदा मोह पाशीसुरेख!!
:) सुरेख
खगांचे थवे, पाखरे ही निरागस काय कसे रज, कण संचिताचे थकेनात पंख, खळे ना भरारी रिते मोकळे सोस, निळ्या अंबराचेसुंदर! अहो तो पशुपतीनाथ आहे पक्ष्यांची काळजी घायला.
कविता आवडली.
हवेसे नितळ, पारदर्शी उसासे
हे विशेष आवडले.
सर्वांचे मनापासून आभार :)
छान
छान !!