आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का?
In reply to १०० by कवितानागेश
मी वाचत नाहीये!त्यामुळे वाचताय! नाहीतर एकतर वात आला असता अथवा पित्त खवळले असते. ;)
In reply to उत्तम by विकास
एकतर वात आला असता अथवा पित्त खवळले असते:)) :D
In reply to काही का असेना by प्रसाद गोडबोले
In reply to अवांतर by प्रसाद गोडबोले
In reply to गवि +१ by साती
In reply to साती, by आनंदी गोपाळ
आयुर्वेद 'पोटेन्शिअल' शास्त्र 'होते' आज ते 'डेड' आहे.नाही समजलं..
In reply to साती, by आनंदी गोपाळ
In reply to हं... by श्रावण मोडक
आयुर्वेद या शब्दाला आक्षेप आहे. औषधाला (ते सिद्ध झाले असेल तर) नाही, असे म्हणायचे आहे का तुम्हाला?हम्म मलापण हेच वाटून राहिलंय आता ही चर्चा वाचल्यावर. :)
In reply to साती, by आनंदी गोपाळ
ज्या क्षणी आधुनिक वैद्यकीय चाचण्या करून अमुक औषध 'सर्वत्र' स्वीकारले गेले, त्या क्षणी ते आयुर्वेदिक न रहाता आधुनिक वैद्यकीय औषध झाले असे मी म्हणतो.मी म्हटलंय तेच अशा पद्धतीने मांडता येईल. या गोष्टीला फायनली आयुर्वेद या नावाने संबोधावं किंवा आणखी काही याच्याशी मला काही देणंघेणं नाही कारण मूळ उद्देश "जुनं ते सोनं" असं सिद्ध करण्याचा नाहीच आहे. माझ्यासारख्या सामान्य माणसाला उपचार लागू पडण्याशी मतलब आहे. ठीक आहे, पोटेन्शियल शास्त्र हा शब्द योग्य बसत नसेल तिथे तर असं तरी म्हणू शकतो की आयुर्वेदाची मूळ तत्वं (कफ,वात पित्त) ही नवीन / शिस्तबद्ध संशोधनाने सिद्ध होऊ शकत नसतील तर "कारणमीमांसा" म्हणून ती बाद करावीत. पण त्यातल्या औषधी (वनौषधी किंवा अदरवाईज) किंवा उपचार (नाकात इरिगेशन, एनिमा पंचकर्म किंवा तत्सम) यांपैकी जी काही उपाय घडवणारी दिसतील अन सिद्ध होतील त्याला मॉडर्न मेडिसिनचा भाग बनवावं. अशा वेळी आयुर्वेदाला "डेड" म्हणणं योग्य नाही. त्याला फारतर दडलेला खजिना म्हणावं. एकेक चीज त्यातून उचलून जशीजशी सिद्ध होईल, तसतसं "मॉडर्न मेडिसिन" प्रगत होण्याकडे एक पाऊल पडेलच. माझ्या आजीची जुनी वही तिच्या पश्चात मला सापडली. तिच्यामधे अगदी वेगळ्या, कधी न ऐकलेल्या पाककृती, स्वेटरच्या अनवट डिझाईनच्या टिपा अशा नोंदी सापडल्या. त्या पाकृ ट्राय करताना मला चुलीऐवजी गॅस वापरावा लागला पण तरी उत्तम पदार्थ बनला तर ही पाककृती पुन्हा मेनस्ट्रीम कुकरीमधे येईल.. पण त्या डायरीला "डेड" पाककला म्हणणं योग्य नव्हे. मला तर वाटतं की सध्याच्या मॉडर्न मेडिसिनलाच "मेनस्ट्रीम मेडिसिन" किंवा "होलिस्टिक" किंवा तत्सम नाव देऊन तो मुख्य प्रवाह असं मानून इतर सर्व ओहोळांतलं जे काही टेस्ट करुन घेण्यासारखं आहे ते त्या मोठ्या प्रवाहात सामील करावं. मग "आयुर्वेद" किंवा "अॅक्युपंक्चर" वगैरे शब्द मागे पडले तरी सामान्यांस चालावं.
In reply to माझ्या लोअर बॅक पेन साठी by मराठी_माणूस
In reply to शास्त्र आणि सायन्स by आनंद घारे
In reply to शास्त्र आणि सायन्स by आनंद घारे
In reply to उत्तम चर्चा. मलाही आनंदी by बंडा मामा
In reply to म्हणजे? by अर्धवटराव
औषध गुण आणते हे ९९% ऑब्सर्वेशन्सनी सिद्ध आहे.क्लिनिकल ट्रायल म्हणजेही दुसरे काही नसते. औषधाला गुण आहे का ह्याची निरिक्षणेच (ऑब्जरवेशन) नोंदवलेली असतात. पण ती काटेकोर पद्धतीने नोंदवली गेली असल्याने ती मानण्यात आपला फायदा असतो. परिभाषेत मांडता येत नाही म्हणजे काय? औषधशास्त्र हे काही अॅब्स्ट्रेक्ट आर्ट नव्हे की अर्थ शब्दांमधे उलगडुन सांगता येणार नाही.
In reply to औषधांचे गुण तपसणार्य चाचण्या by बंडा मामा
In reply to तुमच्या वडीलांना आराम पडला by कवितानागेश
In reply to तुमच्या वडीलांना आराम पडला by कवितानागेश
In reply to शब्दकोश घ्या आणि बघा. http:/ by बंडा मामा
In reply to मी विकी वापरत नाही. तुम्हाला by कवितानागेश
मी विकी वापरत नाही. तुम्हाला विकी शास्त्रीय वाटतो का? नशीब म्हणजे तुम्हाला नक्की काय अभिप्रेत आहे?मी तुम्हाला शब्दकोशात पाहा असेही लिहिले होते. तिथे जो अर्थ आहे तोच मलाही अभिप्रेत आहे. बाकी विकि सारखा मुक्तकोश वापरत नसाल तर त्यात आवर्जुन सांगण्यासारखे (किंवा अभिमानाने सांगण्यासारखे) काही नाही.
In reply to तुमच्या वडीलांना आराम पडला by कवितानागेश
In reply to औषधांचे गुण तपसणार्य चाचण्या by बंडा मामा
In reply to वाट बघणे हेच उत्तम? by अर्धवटराव
चाचण्या केलेल्या असल्या तरच एखादे औषध गुणकारी असेल या मागे काय लॉजीक?चाचण्या केल्या म्हणून औषध गुणकारी नाही तर चाचण्या यशस्वी आल्या म्हणून गुण सिद्ध झालेले औषध. निव्वळ चाचण्या केल्या म्हणून गुणकारी ठरत असते तर सगळीच क्लिनिकल ट्रायल मधली औषधे आज बाजारात असती.
औषधाचा गुण येणं हि प्राथमीकता. ति अमुक एखाद्या चाचणी प्रोसेस मधुन गेली कि नाहि हे (आवश्यक पण) दुय्यम... शिवाय विजातीय शास्त्रांच्या कसोट्या एकमेकांना लावण्याचा अट्टहास म्हणजे तर दुराग्रह.गुण येणं ही प्राथमीकता कशी ठरवायची सांगा. बैलाचं मूत डोळ्यात घातल्याने मोतिबिंदू जातो असे सांगणारे अनेक लोक खेडोपाडी भेटतील मग तुम्ही ते त्यांच्या सांगण्यावरुन बैलाचे मूत हे औषधी आहे असे मानणार की चाचण्या घेऊन मग ठरवणार?
कफ, पित्त, वाताचेच उदाहरण घ्या. आयुर्वेद म्हणते त्या पद्धतीने त्यांना अॅलोपॅथी परिभाषेत मांडणं कदाचीत शक्य होणार नाहि. अॅलोपेथीवाल्याला कफ पित्त वाताचे आयुर्वेदीय भाष्य अॅबस्ट्रॅक्ट वाटणे सहज शक्य आहे. मग त्यानुसार औषधांचे उपाय तर हमखास अॅब्स्ट्रॅक्ट वाटतील.इथेही तुमचा गोंधळ झाला आहे. आयुर्वेदात वात पित्त कफ वगैरे काहीही मानत असोत शेवटी कोणात्याही पथीचे प्रयोजन हे रोगी बरा करणे हे आहे. क्लिनिकल ट्रायल मधे नेमके हेच पाहिले जाते. सदर उपचाराने रोगी बरा होतो की नाही..बस! मग तो वात पित्त सुधारल्याने झाला की कोणत्या रिसेप्टरवर कुठला रेणू चिकटल्याने झाला ह्याच्याशी चाचण्यांना मतलब नाही. त्यामुळे आयुर्वेदातील संकल्पनांचा ट्रायल्स घेण्यात काहीच अडसर येऊ नये. वरती साती ह्यांनी डायबेटीस वरील आयुर्वेदिक औषधची ट्रायल घेतल्याचे लिहिले आहे. ती कशी काय बरे घेतली असेल? जर ह्या सो कॉल्ड पाश्चात्य चाचण्या अयुर्वेदाला लागू होत नसतील तर? पहा विचार करुन.
In reply to चाचण्या केलेल्या असल्या तरच by बंडा मामा
In reply to गुण येणं by अर्धवटराव
In reply to गुण येणं by अर्धवटराव
अॅक्च्युअल औषधीप्रयोग केल्याशिवाय मोतीबिंदु जातो नि नाहि हे तरी कसं कळणार?मग तुम्ही तुमचा डोळा ह्या अॅक्चुअल प्रयोगासाठी वापाराल का? लोक गावाकडचे आहेत म्हणून त्यांची औषधे/उपाय निरुपयोगी ठरवणे योग्य नाही. गावाकडच्या लोकांना अडाणी समजता पण प्युनच्या औषधावर तुम्हाला ऑर्थोपेडिक सर्जनपेक्षाही भरोसा आहे असे तुम्हीच म्हणता ना?
ट्रायल्स घेण्यास कोणि आक्षेप घेतलाय? ट्रायल्स घेण्याला आक्षेप नसला तरी ट्रायल्स आयुर्वेदिक औषधांना अप्लाय होत नाहीत असे सुचवण्यात आले आहे ज्याला सातींचा प्रतिसाद हे खणखणीत उत्तर अहे.
डायबेटीस वरील चाचण्या करण्यापुर्वी आयुर्वेदीक औषधे "शात्रीय" नव्हती, व चाचण्यांनंतर ति "शास्त्रीय" झाली या चमत्कारवर मुख्य आक्षेप आहे.असे कोण म्हणाले? औषधांना गुण होताच चाचण्यांनी तो सिद्ध झाला इतकेच. आता असे सिद्ध होण्यापुर्वी घेण्याची घाई काही जण करू शकतात पण मग त्यांना नशिबात असेल तर गुणही मिळेल. पण इथे लोकांच्या अरोग्याशी खेळ होत असल्याने समजा उद्या एखाद्या कंपनीने मोटार बनवण्याचे नविन तंत्रज्ञान विकसित केले. जे खूप उपयुक्त असले तरी त्यात अनेक रहदरी सुरक्षा धोके असू शकतात. सदर कंपनीने सेप्फ्टी सर्टिफिकेशन घेऊन असा धोका नसल्याचे सिद्ध केल्यास लगेच ह्या मोटारी रस्त्यावर धावू लागतील. पण असे सर्टिफिकेशन न घेता भले कितीही उपयुक्त तंत्रज्ञान असले तरी ते रस्त्यावर येण्यास परवानगी देऊ नये. आयुर्वेदिक औषधांना असे कसलेही सर्टिफिकेशन नाही (त्यांची स्पेफ्टी किंवा इतर क्लेम्स सपोर्ट करणारा ट्रायल्स डाटा नाही). विक्री करण्यावर कसलेही निर्बंध नसल्याने विक्रेत्यांनाही ट्रायल्स घ्यायची जरूर वाटत नाही. तेव्हा एक ग्राहक म्हणून आपणच काय ते ठरवावे.
In reply to अॅक्च्युअल औषधीप्रयोग by बंडा मामा
In reply to आयुर्वेदीक औषधे-तुमच्या ताज महालाला आमची एक वीट by सुबोध खरे
In reply to एक बारीक शंका: by शिल्पा ब
माझी मते