राष्ट्रपती - इंग्रजी संज्ञांचे भारतियीकरण
राष्ट्रपिता या संबोधनामुळे अंमळ हळवेपण आल्याचे कांही ठिकाणी दिसून आले. या निमित्ताने राष्ट्रपती या संबोधनाबद्दल ज्ञानात भर पडावी असे वाटतेय. मूळ शब्द शोधण्यासाठी इंग्रजीचा आधार घ्यावा लागत असल्याने तसे केले. त्या शब्दास अध्यक्ष असे म्हणत असावेत अशी एक शंका मनात येऊन गेली. जर प्रेसिडेण्ट = ....पती हे बरोबर असेल तर घराघरातून अध्यक्षमहाराज, जेवायला चला असा हाकारा ऐकू यायला काहीच हरकत नाही. इकडून तिकडून पेक्षा आमचे अध्यक्ष आज दुचाकीवरून मार्गस्थ झाले हे म्हणायला आणि ऐकायलाही सुटसुटीत वाटते. असो.
मुद्दा असा, प्रेसिडेण्ट म्हणजे पती असे भाषांतर कुणी केले असावे ? सरकार दरबारी त्यास मान्यता कशी मिळाली यावर चर्चा व्हावी हा प्रस्ताव ठेवला आहे. आपल्याकडे अस्तित्वात नसलेल्या बाबींना इंग्रजी प्रतिशब्द नसताना अनेक इंग्रजी शब्दांचे अट्टाहासाने केलेले भाषांतर आजही कालसुसंगत ठरावे का ? चेंडू हा शब्द अस्तित्वात असल्याने त्या शब्दाच्या वापराबाबत शंका नाही पण क्रिकेट हा खेळच परकीय असताना विकेट या संपूर्ण नव्या प्रकारासाठी यष्टी सारखे शब्द योजणे, रूजवणे हा अट्टाहास देखील योग्यच आहे का ?
( या विषयावर आधीच चर्चा झालेली असल्यास ती शोधण्याचा प्रयत्न केला. पण तसे न आढळल्याने प्रस्ताव ठेविला ऐसे )
वाचने
4690
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
या निमित्तानेराष्ट्रपिता
माझ्या मते संज्ञांचं
हाहाहा!
पती = प्रमुख
In reply to पती = प्रमुख by श्रीरंग_जोशी
केवळ मराठीच नव्हे
In reply to केवळ मराठीच नव्हे by श्रीरंग_जोशी
पती या शब्दाचा अर्थ काय आहे ?
In reply to पती या शब्दाचा अर्थ काय आहे ? by सांजसंध्या
अनेक अर्थ आहेत
In reply to अनेक अर्थ आहेत by श्रीरंग_जोशी
तुम्ही दिलेल्या सर्व उदाहरणात
In reply to तुम्ही दिलेल्या सर्व उदाहरणात by खटासि खट
हा अर्थ
In reply to हा अर्थ by श्रीरंग_जोशी
म्हणजे आपणच का ते ?
In reply to पती = प्रमुख by श्रीरंग_जोशी
जोशिबुबा
In reply to पती = प्रमुख by श्रीरंग_जोशी
होय होय!
यावरून सुचले
...
In reply to ... by मनीषा
पत्नी'चा अर्थ माहीत नाही..
In reply to पत्नी'चा अर्थ माहीत नाही.. by खटासि खट
तुम्ही तुमचा अनुभव सांगीतला .
In reply to ... by मनीषा
'पत्नी'चा अर्थ माहीत नाही...
यष्टी?
अरे आमच्या आडनावाबद्दल उल्लेख
"टाय" या शब्दाचे मरठीकरण
मराठीकरण जरून करावे. जितके