(मी कॉपी केली नाही, मी पेस्टही केले नाही)
लेखनविषय:
काव्यरस
खुप दिवसांनी काही ओळी सुचल्या आणि ते ही कॉपी पेस्ट न करता . अस्सल स्वतःच्या . बघा आवडतात का
अल्बम - कॉपीपेस्ट वर बोलू काही
मी कॉपी केली नाही, मी पेस्टही केले नाही
मी राईट क्लिक साठी ,कधी माऊस घेतला नाही.....
भवताली सतत चाले, ते इंटरनेट बघताना
कुणी धाग्यातून चिडताना, कुणी एकट्याने लढताना
मी सदस्य होउनी बसलो, फेसबूकवरती जेंव्हा
ते पहायला देखील, मग कुणी राहिले नाही.....
एकच ब्लॉग मी पाहे, मूळ लेखन जिथल्या तेथे
काढूनी प्रिंटही त्याची वेळीच टॅगली पाने
पण झोपेतून एकदम, जागच आली नाही
कुणी लाईकही केले नाही, कुणी लाईटली घेतले नाही......
काढलेला एकच धागा, चाहत्यांची उलटी मुंडी
जालावर अजुनी दिसती, डिलीट पोस्टच्या नोंदी
मी सोम्यालाही भ्यालो, मी गोम्यालाही भ्यालो
मी मनाशी सुध्दा माझ्या,कधी पंगा घेतला नाही
मज जन्म स्थळाचा मिळता, मी ‘याहू’ झालो असतो
वाढवायची असती यादी तर ‘हॉटमेल झालो असतो
मज डिलीट करता कोणी रडलो वा हसलो नाही
मी फॉलो केले नाही अन करुन घेतले नाही
अमोल केळकर
मला इथे भेटा
वाचने
4595
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
छान आहे
मी राईट क्लिक साठी ,कधी माऊस घेतला नाही.....Ctrl+C आणी Ctrl+V पण चालतो हो ;) छान वाटल वाचुन
मी राईट क्लिक साठी ,कधी माऊस घेतला नाही.....Ctrl+C आणी Ctrl+V पण चालतो हो ;) छान वाटल वाचुन
मजेशीर!!!
मी भरपूर केली कॉपी,मी भरपुर केले पेस्टींग
ही कविता तुमची मजला,लै वाटते हो विंट्रेस्टींग ;-) ॥
In reply to मी भरपूर केली कॉपी,मी भरपुर by अत्रुप्त आत्मा
हा हा हा मस्तच
सर्वांचे धन्यवाद :)
अमोल केळकर
मला इथे भेटा
एकदम फ्रेश!
कधी काव्यही केले नाही, कधी कथाही स्फुरली नाही,
तरीही...
दिन एकही न ऐसा आला की, मिसळपाव क्लिकले नाही!!
मी सोम्यालाही भ्यालो, मी गोम्यालाही भ्यालो मी मनाशी सुध्दा माझ्या,कधी पंगा घेतला नाहीटू गुड!!!!
हाउर आंदो
मस्तच अमोल! आवडले.
हया कवितेस " जालीय " संदर्भ आहे से वाटते !
कविता जेथे पेष्ट करायला हवी तिथे झाल्यास उद्रेक होणार .
कविता - विडंबन - चिमटे आवडून राहिले.
In reply to हया कवितेस " जालीय " संदर्भ आहे से वाटते ! by तर्री
:)
अमोल केळकर
मी कॉपी केली नाही, मी पेस्टही केले नाही
तुझे मिर्ची लगी तो मै क्या करु???????
एकदम भारी. :)
एकदम आवडली!
मी काहिच पहिले नाहि .. मी अजिबात वाचले नाहि =))
भारीये .
विडंबन आवडले.
मी सोम्यालाही भ्यालो, मी गोम्यालाही भ्यालो
मी मनाशी सुध्दा माझ्या,कधी पंगा घेतला नाही
हा हा हा.... जबरी :) :)
मी सोम्यालाही भ्यालो, मी गोम्यालाही भ्यालो
मी मनाशी सुध्दा माझ्या,कधी पंगा घेतला नाही
फेसबुक आर्कुट यांचा चेहरा म्हणजे या दोन ओळी आहेत. आता तर पालघर प्रकरणापासून लाईक व अनलाईक करायलाही
बोटे थरथरतात !
या चोप्य-पस्तेमधे बुद्धीचे बळ दिसले.
छान आहे