सभ्यतेची अभिरूची : नागपुरी तडका
लेखनविषय:
काव्यरस
सभ्यतेची अभिरूची : नागपुरी तडका
छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं
हात्तीच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!
चॅनल पाहावं कोणतंय तं उघडेबंब नाचते
टीव्ही पाह्यतांना पोरासंग, मायबाप लाजते
सभ्यतेची अभिरूची लईच दिसते न्यारी
अब्रू गेली ढोड्यात अन नोट झाली प्यारी
आता उघडं काय, झाकलं काय, सारखंच झालं
हात्तीच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!
जलश्यातल्या पोरी कशा टगरबगर पाहे
चार लोकामंधी मात्र झाकूनझुकून राहे
जे काही करे ते अंधारात करे
उजेडात मात्र इज्जतीले मरे
आता उजेड काय, अंधार काय, सारखंच झालं
हात्तीच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!
कालेजचे तोतामैना वर्गात नाय दिसत
आडमार्गी झाडाखाली बसते दात किसत
जनाची लाज ना मनाले खंत
खुलेआम प्रेमलीला, नाही त्याले अंत
आता दिवस काय, रात्र काय, सारखंच झालं
हात्तीच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!
शायण्याने बगीच्यात जाऊ नये म्हणतात
बिनावार्यानं झुडपं तिथं, खल-खल हालतात
झुडपाच्या आडोशाला दोन पाखरं बसते
"प्रेम" या शब्दाचे धिंडवडे नुसते
आता भय काय, अभय काय, सारखंच झालं
हात्तीच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!
. गंगाधर मुटे
------------....--------------....--------------
..ही कविता ऐकण्यासाठी क्लिक करा..
------------....--------------....--------------
वाचन
9835
प्रतिक्रिया
25
शायण्याने बगीच्यात जाऊ नये
भाषा काय लाजवाब जमून आलीये.
हात्तीच्या बैनमाय, गंगाधरराव
छान! पुलेशु!
नागपूरी तडक्याचा..
लाजबाब प्रतिसाद.
एकदम क ड क!!
अजून येऊ द्या !
नागपुरी तडका.
मस्त
In reply to मस्त by Pain
धन्यवाद.
सुंदर कविता...
In reply to सुंदर कविता... by मदनबाण
धन्यवाद.
जे काही करे ते अंधारात
जबरदस्त कविता आणि तडकाही लगेच
खुप सुंदर कविता गंगाधर
झकास!
झकास!
तडका वर आणते आहे.
मस्त
मस्त
दात कीसणे हा नवीन वाक्यप्रचार
बोम्ली
In reply to बोम्ली by तिमा
बेंबी..
वाचताना मजा आली. सोळा