मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फुलांच्या रांगोळ्या-गुलछडी स्पेशल

अत्रुप्त आत्मा · · कलादालन
यापूर्वी इथे प्रदर्शित केलेल्या फुलांच्या रांगोळ्या... http://www.misalpav.com/node/19262 http://www.misalpav.com/node/20308 http://www.misalpav.com/node/21612 खरं तर शीर्षकातच सर्व काहि आलेलं आहे. पण तरी गणपती पूजना सारखी थोडी प्रस्तावना करतोच...मी या पूर्वी फुलांच्या रांगोळ्यांचे जे ३ धागे टाकले.त्यातला पहिला धागा नवोदित होता.दुसरा अगदी '' तयार '' नसला तरी बराच शिकलेला होता.त्यानंतरचा ''सप्तपदी विशेष'' हा विशेष...नावातच होता,(कारण त्यात सगळ्या/जास्तीत जास्त-सप्तपदीच्या रांगोळ्या नव्हत्या). अता (इथुन पुढच्या भागांमधून) मला तोच तो पणा टाळावासा वाटतोय... अर्थात ह्या फुलांच्या रांगोळ्या माझ्या कामाच्या '' रेट्यात '' तयार होत असल्यानी,कित्तीही नाही म्हटलं तरी त्यात थोडाफार पुनःप्रत्यय येणारच...नाइलाज आहे.पण जमेल तेवढं वेगळेपण द्यायचा मी प्रयत्न करतोय...यावेळच्या रांगोळ्यामधे प्रामुख्यानी गुलछडीच्या फुलांची-कट-कनेक्ट पद्धत,मुख्य आकार बनवण्यासाठी वापरली आहे... कश्या वाटतायत या रांगोळ्या...? पहा बरं :-) १)वरती गणपती पूजनाचा उल्लेख केलाच आहे,तर सुरवात मोदकानी करावी , हे उत्तम ;-) https://lh4.googleusercontent.com/-TgaZWSTcBR4/UQ-LVlO2tSI/AAAAAAAACEs/CZ1kRfgpzts/s512/Photo-0022.jpg २) https://lh5.googleusercontent.com/-HKAJASPN_CA/UQ-LJSbU4hI/AAAAAAAACEk/2UkWkjcpWuo/s512/Photo-0019.jpg ३) https://lh4.googleusercontent.com/-emvxK06CosE/UQ-QD0I1_RI/AAAAAAAACG0/g_pUvODsr9Y/s576/Photo-0031.jpg ४) https://lh3.googleusercontent.com/-79OwEAm93Eo/UQ-QtrzJ8dI/AAAAAAAACG8/NunxH9CbccY/s576/DSCF0055.JPG ५) https://lh5.googleusercontent.com/-MVBqZzXCIUc/UQ-RNQ6ITfI/AAAAAAAACHE/k9FshgWomVQ/s576/DSCF0059.JPG ६) https://lh4.googleusercontent.com/-D-OkVDpt7sk/UQ-U64tF22I/AAAAAAAACIA/grcWuLyjoWI/s576/DSCF0061.JPG ७) https://lh6.googleusercontent.com/-iHL6i_AyNyQ/UQ-VoJ3imRI/AAAAAAAACII/wuqcksjpahE/s576/DSCF0166.JPG ८) https://lh4.googleusercontent.com/-rzvh63Wms9o/UQ-WFXU3c5I/AAAAAAAACIQ/MMdtf2hUCvQ/s576/DSCF0168.JPG ९) https://lh4.googleusercontent.com/-4jRwrTef-pc/UQ-XTxEpAJI/AAAAAAAACI0/30KwhhPq7nM/s576/DSCF0077.JPG १०) https://lh3.googleusercontent.com/-VWbBqVsURjM/UQ-dmSFWcRI/AAAAAAAACKM/x-CPtB0G9_4/s576/Photo-0010.jpg ११) https://lh6.googleusercontent.com/--wuoy4U2sB0/UQ-dV5-vGMI/AAAAAAAACKE/hy3D9AQBvRc/s576/Photo-0004.jpg ========================================================================= सर्व फोटोज.-कॅमेरा-फुजिफिल्म-एस.२९५० =========================================================================
लेखनविषय:

वाचने 54148 वाचनखूण प्रतिक्रिया 71

दिपक.कुवेत Mon, 02/04/2013 - 19:35
सगळे फोटो फार सुंदर आलेत. समईची रांगोळि (नं ९) विशेष आवडली. साध्या रांगोळ्यामुळे फुलांच्या रांगोळ्या अजुन उठावदार झालेत.

जेनी... Mon, 02/04/2013 - 19:38
अमेझिंग गुर्जि .... लाजवाब .... एकसो एक रांगोळ्या आहेत ... डीझाइन चोर्नार आणि थोडी कला पण ... खुपच सुंदर आहेत :)

तर्री Mon, 02/04/2013 - 19:39
सौंदर्य पूर्ण , भक्तीमय , मंगल , पवित्र अश्या सगळ्या भावना दाटून आल्या, ना खाताच "प्रसाद " खाल्ल्याचे समाधान. धन्यवाद मालक.

In reply to by तर्री

@सौंदर्य पूर्ण , भक्तीमय , मंगल , पवित्र अश्या सगळ्या भावना दाटून आल्या, ना खाताच "प्रसाद " खाल्ल्याचे समाधान.>>> अतीशय निर्मळ दाद... मनः पूर्वक धन्यवाद.

In reply to by तर्री

स्पा Tue, 02/05/2013 - 13:05
सौंदर्य पूर्ण , भक्तीमय , मंगल , पवित्र अश्या सगळ्या भावना दाटून आल्या, ना खाताच "प्रसाद " खाल्ल्याचे समाधान. धन्यवाद मालक.
ह्येच बोलतो बुवा झिंदाबाद

In reply to by तर्री

स्मिता. Tue, 02/05/2013 - 14:49
अगदी असेच वाटले. मी तर गुर्जींनी काढलेल्या फुलांच्या रांगोळ्यांची फॅन आहे. वेगवेगळ्या फुलांचे रंग, आकार, पोत ध्यानात घेऊन अश्या सुरेख रचना करणं सोपं काम नाही.

प्रभाकर पेठकर Mon, 02/04/2013 - 20:06
भरघोस ताजी फुले आणि मनस्वी कलात्मकता. खास पर्यावरणप्रेमी रांगोळ्यांनी मनाला अगदी भुरळ पाडली आहे. अभिनंदन.

In reply to by मोदक

प्यारे१ Tue, 02/05/2013 - 14:04
हे एक मस्तच झालं. आता मुलगा लग्नाळू झालेला आहे हे उच्चरवाने सांगण्यास हरकत नाही. हल्ली सोत्ताचं घर आहे ही मिनिमम एलिजिबिलिटी आहे. नाही का? येणारी मुलगी काय आयत्या पीठावर... वगैरे. असो! तर मोदकाचं नवीन घराबद्दल अभिनंदन!

सूड Mon, 02/04/2013 - 20:17
सगळ्याच रांगोळ्या मस्त!! सातव्या नंबरची त्यातल्या त्यात ओळखीची वाटतेय.

चौकटराजा Mon, 02/04/2013 - 20:25
अ आ इथं काहीच दिसत नाहीये तरी तुमच्या कंपूत दिवस काढायचे आहेत आमास्नी ... सबब मस्त च रे आत्त्मू असा प्रतिसाद देतो. ( मिचकावी स्माईली )

जयवी Mon, 02/04/2013 - 20:29
अहाहा....... इतकी प्रसन्न आरास बघून खरंच खूप पवित्र आणि तृप्त वाटलं. तुमच्या प्रत्येक रांगोळीला अगदी मनापासून दाद !!

अभ्या.. Mon, 02/04/2013 - 20:46
गुर्जी तुमची कला निर्विवाद श्रेष्ठ आहे. उपलब्ध रंगाची फुले त्यांचे आकार आणि पोत लक्षात घेऊन असे सुशोभन करणे सोपे नाही. त्यातल्या त्यात ७ आणि ८ नं. च्या रांगोळीत फरशीच्या रंगाचा पण करुन घेतलेला वापर अगदी ब्येस्ट. अत्यंत नेत्रसुखद रंगसंगती व काम्पोझीशन. अप्रतिम केवळ अप्रतिम, गुरुजी. आता अवांतरः यजमान खुष होत असणारच पण त्यांची खुषी पैशाच्या स्वरुपात मिळते का हो गुरुजी? का स्वान्तसुखाय?

प्रचेतस Mon, 02/04/2013 - 21:51
खूप सुंदर. हातात कला आहे तुमच्या. मोदकाकडची ७ नं. ची तर लगेच ओळखलीच पण ९ नं. ची पण. ती राजेच्या चिंचवडमधल्या पुस्तक प्रदर्शनातली आहे. :)

सोत्रि Mon, 02/04/2013 - 23:38
हातात कला आहे बर का तुमच्या... (अंतू बर्व्याच्या 'नरड्यात मजा आहे हं तुमच्या' ह्या चालीत वाचावे) - (गुर्जींच्या फुलांच्या रांगोळ्यांचा पंखा) सोकाजी

नाखु Tue, 02/05/2013 - 09:07
भाविकांचे मन प्रसन्न ! होता फुल्-रांगोळी दर्शन ! नाद असावा ऐसा (बुवांसारखा) जो "खुळा" करी सार्‍या जगा...

In reply to by मनराव

@बालिका>>> डीझाइन चोर्नार आणि थोडी कला पण ...>>> =)) बालिका....,,,ते तुला माझ्याकडे क्लास लावल्याशिवाय जमायचं नै =)) ========================================================================= @प्यारे १>>> ह्या रांगोळीसाठी परत एकदा .... सत्यनारायण घालावा म्हणतो!>>> म्हणजे??? यापूर्वी कधि केलावता सत्य?नारायण आमचे कडून ????? http://www.sherv.net/cm/emoticons/confused/confused-face-smiley-emoticon.gif =========================================================================== @अभ्या..>>> आता अवांतरः यजमान खुष होत असणारच पण त्यांची खुषी पैशाच्या स्वरुपात मिळते का हो गुरुजी? का स्वान्तसुखाय?>>> थोडिफार पैश्याच्या स्वरुपात,पण तसे जवळ जवळ,स्वान्तःसुखायच...! आपल्याकडे अजुनही कलेला मान मिळतो,पैसा म्हणावा तसा नाही... असो. :-) ============================================================================= @वल्ली>>> मोदकाकडची ७ नं. ची तर लगेच ओळखलीच पण ९ नं. ची पण. ती राजेच्या चिंचवडमधल्या पुस्तक प्रदर्शनातली आहे.>>> बरोब्बर पैचान्या :-) ============================================================================= @लीमाऊ>>> तुमची परवाची फळांची रांगोळी पण छान होती. ;-) >>> =)) अस्सं काय??? ब्वार ब्वार...! पुढच्या वेळेस रांगोळीचाच केक देतो....... :-p =============================================================================
अत्तापर्यंत... आलेल्या-सर्व वाचक/प्रतिसादकांना...मनःपूर्वक धन्यवाद
https://lh5.googleusercontent.com/-z8Xljmgekpw/T6pOHdR1HMI/AAAAAAAABSA/jQEPWB6HN7g/s512/Photo-0137_e1.jpg

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस Tue, 02/05/2013 - 12:35
वरील रांगोळी लग्नानिमित्त झालेल्या सत्यनारायणातील आहे काय? नाही....बदामाची नक्षी काढलीय म्हणून विचारले.

In reply to by प्रचेतस

@बदामाची नक्षी काढलीय म्हणून विचारले.>>> आपला होरा चुकेल काय??? पुन्हा तीच प्रतिक्रीया देतो...बरोब्बर पैचान्या ;-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

अभ्या.. Tue, 02/05/2013 - 15:49
गुर्जी तुम्ही या स्पेशल आर्टची अ‍ॅप्लाईड आर्टच करुन टाका. कलेला मान मिळतो पण पैसा नाही हे जरी अगदी खरे असले तरी बदलत्या काळात घ्या वसूल करून. अगदी धर्मकार्य म्हणून जरी पाहात असाल तरी कष्ट खूप आहेत हो. निदान याचा यूएसपी म्हणून फायदा होत असेल तरी नसे थोडके.

In reply to by अभ्या..

अ‍ॅग्री.... आणी तसंही कोणी फक्त फुलाची रांगोळी/सप्तपदी किंवा गोल चौकोनी नुस्ता गालिचा काढायची ऑर्डर दिलि,तर मी त्याचे पुरेपुर पैसे लावल्याशिवाय रहातच नाही, कारण सदभावनेनी काम करून हात पोळून घेतलेत मी बर्‍याचदा.

चिगो Tue, 02/05/2013 - 12:38
सुंदर रांगोळ्या, अआ.. अत्यंत प्रसन्न वाटलं बघून.. मनीच्या बात : साल्या चिन्म्या, देव कला, रसिकता इ. गुण वाटत होता, तेव्हा काय हातात चाळणी घेऊन गेला होतास का काय त्याच्याकडे? :-(

kanchanbari Fri, 02/08/2013 - 19:59
अतिशय सुंदर आहे रांगोळ्या, पण एक प्रश्न पडला कि या मंगल कार्याची शोभा वाढवणार्‍या या सुंदर फुलांचे उपयोग झाल्या नंतर आपण या फुलांचे करतात काय?

In reply to by kanchanbari

@या सुंदर फुलांचे उपयोग झाल्या नंतर आपण या फुलांचे करतात काय? >>> आंम्ही काहीच करित नाही...जे काय करायचं ते यजमानच करतात... ;-) अता खरोखर काय करतात ते सांगतो... ज्या ज्या ठिकाणी मी आजपर्यंत या रांगोळ्या काढल्या.. त्या पैकी काहिं(चे) अपरिहार्य अपवाद वगळता.. बाकि सर्वांनी चौरंगावरच्या पुजा उचलून/आवरुन तिथे देवांचे फोटो/फ्लॉवरपॉट असे काहितरी ठेवून जितके दिवस राहतील,तितके दिवस रांगोळ्या राहू दिल्या,हेच माझ्या पहाण्यात आहे. :-)