अनुनय
लेखनविषय:
असतात रंग ढंगहि वेडे
झरतात छटा रत रुधिराच्या
हृदयात बंदिशी अनोळखी
डोळ्यांकाठी रति भावुकशा
खल मदन उरी रण रिपुकांचे
ओठांवरती नित शब्द मुका
काया माया बहु काटेरी
ओढाळ मती अस्वस्थ सखा
चंद्रास न कळते झिजलेले
पाण्यास व्यथा परि आकळते
फेसाळ शिरी कल्लोळे जळ
एकांत कुंद साहतो कळा
सारेच कसे हे अवरोही
तळ नितळ सकळ ढवळे गात्री
आभाळ दूर दूरच सरके
मग श्वास फिरे नत माघारी
डोहात बंद अगणित रात्री
गंधर्व क्षणांच्या गंध कुपी
अस्पर्शधुंद हा ओलावा
अनुनय समिधांचा मापारी
........................अज्ञात
वाचने
2763
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
अनुनय समिधांचा मापारी
In reply to अनुनय समिधांचा मापारी by स्पंदना
मापारी म्हणजे मोजमाप करणारा.
In reply to मापारी म्हणजे मोजमाप करणारा. by अज्ञातकुल
वाटलच होतं. पण आम्ही मापाड्या
छान
In reply to छान by शुचि
धन्यवाद
ओढाळ मती अस्वस्थ सखा
In reply to ओढाळ मती अस्वस्थ सखा by इन्दुसुता
अनुभव आहे.. जीवघेणा.. इथे मला
छान.
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद बिरुटे सर
आपल्या
मिका,
प्रत्येक कडव्यातून वेगवेगळ्या
छान आहे कविता ......